Monsoon : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, आगामी 5 दिवसांमध्ये बदलणार का चित्र?
ज्या वातावरण बदलाची अपेक्षा हवामान विभागाला होती तो बदल आता झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली आहे.
मुंबई : (Maharashtra) राज्यात आगामी 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वत्र समप्रमाणात पाऊस होत नाहीतर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजून आगमनही झालेले नाही. तर राज्यात सरासरीच्या तुलनेत 56 टक्के कमी (Rain) पाऊस झाल्याचे वास्तव आहे. असे असताना हवामान विभागाकडून पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाला जे अपेक्षित वातावरण होते ते आता पश्चिम किनारपट्टीवर तयार झाले आहे. त्यामुळे आगामी 5 दिवसांमध्ये राज्यातील चित्र बदलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरण असले तरी मुंबई, उपनगरे, ठाणे, कोक, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
वातावरणातील बदलाने अपेक्षा वाढल्या
ज्या वातावरण बदलाची अपेक्षा हवामान विभागाला होती तो बदल आता झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विदर्भातही पाऊस चांगला सक्रीय झाला असून येत्या 5 दिवसांमध्ये उर्वरीत महाराष्ट्र व्यापणार तर आहेच परंतु आता मान्सून बरसेल असाही दावा करण्यात आला आहे.
20 jun:राज्यात मान्सून सक्रिय: IMD कडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा.#मुंबई ठाणे व अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम. Monsoon Active over Mah state:Severe weather alerts for 5 days by IMD.Heavy RF alerts cont including Mumbai Thane. Watch IMD updates pl pic.twitter.com/ejuzWm3HvF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2022
मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस
राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट दिल्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सकाळी उजाडल्यापासून पावसाला सुरवात होत आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर जी अवकृपा राहिलेली आहे ती देखील आगामी 5 दिवसांमध्ये दूर होईल असा विश्वास आहे.
राज्यभर ढगाळ वातावरण
राज्यात पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी ढगाळ वातावरण सर्वत्रच आहे. मराठावड्यात पावसातील अनियमितता अधिक तीव्रपणे जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आगामी 5 दिवसांमध्ये चित्र बदलले तर खरिपातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकरणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या खरिपाला सध्या ब्रेक लागले आहे. लवकरच सर्वकाही सुरळीत होईल असा आशावाद बळीराजाला आहे.