आपल्या PF अकाऊंटमधून ‘या’ APPद्वारे काढा हजारो रुपये! प्रक्रिया जाणून घ्या
UMANG मोबाईल अॅप केंद्र सरकारकडून लॉन्च करण्यात आलं आहे. umang.gov.in या पोर्टलनुसार हे अॅप अनेक सेवा पुरवतं.
मुंबई: तुम्ही आपल्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी सतत कार्यालयाच्या चकरा मारण्याची आता गरज नाही. कारण आता तुम्ही एका अॅपद्वारे आपल्या PF खात्यातून हजारो रुपये काढू शकणार आहात. UMANG असं या अॅपचं नाव आहे, ज्याद्वारे तुम्ही आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.(Withdraw thousands of rupees from your PF account through the UMANG app)
हे मोबाईल अॅप केंद्र सरकारकडून लॉन्च करण्यात आलं आहे. umang.gov.in या पोर्टलनुसार हे अॅप अनेक सेवा पुरवतं. या अॅपद्वारे तुम्ही आधार, ईपीएफ, एनपीएस, डिजीलॉकर आणि अन्य सेवांचा लाभ घेऊ शकता. तेव्हा हे अॅप तुम्हाला पैसे काढण्यासाठी कसं उपयुक्त ठरु शकतं, पाहूया
>> सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवरुन UMANG अॅप डाऊनलोड करुन लॉग इन करा. तुमचं अकाऊंट नसेल तर त्यात अकाऊंट बनवा. >> त्यानंतर EPFO निवडून Employee Centric Services चा पर्याय निवडा >> पुढे Raise Claim चा पर्याय निवडा >> त्यानंतर तुम्हाला UAN ची माहिती देऊन ‘GET OTP’ वर क्लिक करा >> तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून LOGIN करा >> त्यानंतर आपल्या बँक खात्याचे शेवटचे 4 नंबर टाकून Member ID सिलेक्ट करुन Proceed for claim वर सिलेक्ट करा >> आता तुम्हाला Address टाकण्यास सांगितलं जाईल. त्याची नोंद करुन NEXT वर क्लिक करा आणि तुमच्या चेकचा फोटो अपलोड करा. >> आता तुमच्या खात्यात ठराविक वेळेत पैसे ट्रान्सफर केले जातील
काय आहे UMANG अॅप?
इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयानं हे UMANG अॅप तयार केलं आहे. हे अॅप IOS आणि अॅन्ड्राईड दोन्ही यूजर्स डाऊनलोड करु शकतात. त्याचबरोबर तुम्ही याचं वेब व्हर्जन umang.gov.in चाही वापर करु शकता. हे अॅप 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि यावर 127 विभागांच्या 841 स्वर्व्हिसेची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
बचत खात्यात महिन्याला जमा करा फक्त 1 रुपया, 2 लाखांचा होईल फायदा
IRCTC IPO च्या भरघोस कमाईनंतर रेल्वे आणतोय आणखी एक IPO; कमाई करण्याची उत्तम संधी
Withdraw thousands of rupees from your PF account through the UMANG app