20 वर्षांपासून बंद रुग्णालयात आता 300 रुग्णांवर उपचार, भाजप-संघ स्वयंसेवकांची कमाल; 15 दिवसात उभारलं कोविड सेंटर
भाजप आणि आरएसएसच्या स्वयंसेवकांनी 300 कोरोना रुग्णांवर उपचार करता येईल असे कोविड सेंटर उभारले आहे. (karnataka rss bjp workers build covid center)
कोलार : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. देशामध्ये रोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. लाखो रुग्णांवर एकाच वेळी उपचार होत असल्यामुळे देशात आरोग्यव्यवस्थेवर ताण पडतो आहे. रुग्णालये रुग्णांनी गच्च भरली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन देशात अनेक सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे येतायत. कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड येथे आरएसएस आणि भाजपनेसुद्धा (RSS and BJP workers) मोठे योगदान दिले आहे. त्यांनी एकाच वेळी 300 कोरोना रुग्णांवर उपचार करता येईल असे कोविड सेंटर (Covid center) उभारले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी मागील वीस वर्षांपासून बंद पडलेल्या रुग्णालयाची अवघ्या 15 दिवसांत डागडुजी केली आहे. (within 15 days RSS and BJP workers build 300 bed capacity Covid center in Karnataka Kolar district)
रुग्णालय 2001 पासून बंद, आता कोविड सेंटर
कर्नाटकमध्ये कोलार गोल्ड फिल्ड (KGF) येथे भाजप आणि आरएसएसच्या काही कार्यकर्त्यांनी एक कोविड सेंटर सुरु केले आहे. हे कोविड सेंटर बंगळुरुपासून 100 किमी दूर असून त्याच्या उभारणीमागची गोष्ट मोठी रंजक आहे. या कोविड सेंटरसाठी जवळपास 300 स्वयंसेवकांनी मेहनत घेतलीये. याविषयीची अधिक माहिती कोलार जिल्ह्याचे भाजपचे खासदार एस. मुनीस्वामी ( S. Muniswamy) यांनी दिलीये. “कोलार येथील भारत गोल्ड माईन लिमीटेड हॉस्पीटल तसे खूप जुने आहे. या रुग्णालयामध्ये खाणीमध्ये काम करणाऱ्यांवर उपचार केले जायचे. मात्र, नंतर हे रुग्णालय 2001 मध्ये बंद पडले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या KFG शहराध्यक्षांनी या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याविषयी कल्पना दिली. त्यांतर आम्ही कामाला लागलो,” असे मुनीस्वामी यांनी सांगितले.
जवळपास 300 स्वयंसेवकांची दिवसरात्र मेहनत
भारत गोल्ड माईन लिमीटेड रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांवर उपाचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी संघ परिवाराच्या स्वयंसेवकांनी कशी मेहनत घेतली याबद्दल एस. मुनीस्वामी यांनी विस्ताराने सांगितले आहे. BGML या हॉस्पिटलवर यापूर्वी 1200 लोक अवलंबून होते. या रुग्णालयात 800 बेड्स होते. मात्र, हे रुग्णालय 2001 साली बंद पडले. सध्या बेड्स कमी पडत असल्यामुळे आमच्या संघ परिवाराने याच ठिकाणी 300 रुग्णांवर उपचार करता येईल, असे कोविड सेंटर उभे करण्याचे ठरवले. त्यासाठी जवळपास 250 लोकांनी दिवसरात्र काम केले. त्यानंतर न थकता काम केल्यामुळे अवघ्या 15 दिवसांमध्ये येते कोविड सेंटर उभे आहे. या ठिकाणी एकाच वेळी 220 रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. हे कोविड सेंटर येत्या सोमवारी सुरु होईल,” असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांकडून 30 Oxygen Concentrator
दरम्यान, या BGML रुग्णालय परिसरातील सर्व कचरा साफ करुन त्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच येथे आता 220 रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून आगामी काळात या कोविड सेंटरला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ्था नारायणा (Dr C.N. Ashwatha Narayana) हे 30 Oxygen Concentrator पुरवणार आहेत. तसेच, येथे एक्स रे, लॅब्स तसेच इतर सुविधासुद्धा सुरु करण्यात येणार आहेत.
इतर बातम्या :
मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!
Corona vaccine : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा
(within 15 days RSS and BJP workers build 300 bed capacity Covid center in Karnataka Kolar district)