काँग्रेसमध्येच असंतोष, त्याला आम्ही काय करणार; हिमाचलमधील काँग्रेसच्या फुटीवर अमित शाह यांचं मोठं विधान

आगामी लोकसभा निवडणूकीआधी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली होती. मात्र अंतर्गत फुटीमुळे इंडिया आघाडीला धक्के बसू लागलेत. अशातच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हिमाचल प्रदेश आणि काँग्रेसमधील अंतर्गत फुटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसमध्येच असंतोष, त्याला आम्ही काय करणार; हिमाचलमधील काँग्रेसच्या फुटीवर अमित शाह यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 9:25 PM

नवी दिल्ली :  TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते. आगामी लोकसभेआधी अमित शहा यांनी इंडिया आघाडी आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील काँग्रेसच्या फुटूीवर मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाहा नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

मी तर माझ्या पक्षाच्या सिद्धांताच्या आधारावरच काम करतो. कठोर परीश्रम हा माझा स्वभाव आहे. माझ्या पक्षाने जे लक्ष दिलं ते गाठण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो. यश अपयश हे ईश्वराच्या हाती असतो. त्यामुळे निराश होऊ नये आणि खूश होऊ नये. माझा पक्ष अनेक पराजय सहन करून इथपर्यंत आला आहे. पराजय सहन करण्याची आम्हाला सवय आहे. आता मोदींच्या नेतृत्वात विजयाची सवयही पडली असल्याचं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.

कोणतीही रणनीती नाही. संपूर्ण काँग्रेसमध्ये फूट आहे,  इंडिया आघाडीत फूट आहे. ते आपल्या पक्षाला व्यवस्थित ठेवू शकत नाही. त्यात विरोधकांची कलाकारी आहे असं वाटत नाही. मतदान विधानसभेत झालं आहे,  कोणी कसं अपहरण करेल. आजच्या काळात विधानसभेतून अपहरण शक्य आहे का. कॅमेरे लावले आहे. व्होट कुठे गेले त्याचा विचार करत नाही आणि आमदारांची गोष्ट बोलत आहे. तुमचे व्होट गेले अन् तुम्हाला माहितही नसल्याचं म्हणत शाहा यांनी टोला लगावला.

इंडिया आघाडी नव्हतंच. ते मीडियाचं क्रिएशन होतं. मी देशातील लोकांना सांगतो. कुठेच इंडिया आघाडी झालं नाही. इंडिया आघाडीतील दोन सदस्य केरळात निवडणूक लढत होते. पश्चिम बंगलमध्ये लढत होते. महाराष्ट्रात फूट पडली. पंजाबमध्ये आता झालं आहे. इतर ठिकाणी कुठेच नाही. एखाद्या सिद्धांताच्या आधारेवर चालणारा पक्ष असेल तर आघाडी टिकते. पण सत्तालोलूप पक्षांची ही आघाडी होती. मुलांना, स्वताला मुख्यमंत्री पंतप्रधान बनण्यासाठी ते निघाले होते. त्यांना भारताचं काही पडलं नाही. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हेच सोनिया गांधींचं लक्ष आहे. २१वेळा त्यांनी प्रयत्न केले, आताही त्यांचा तोच प्रयत्न असल्याचं शाहा यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.