WITT 2025: संघ प्रमुखांचे म्हणणे पटतेय की योगी आदित्यनाथ यांचे ? काय म्हणाले चिराग पासवान ?
टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावरुन आज सकाळी राजकारणातील अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली. त्यात भूपेंद्र यादव, पियूष गोयल पासून ते जी. किशन रेड्डी पर्यंत दक्षिण भारत ते उत्तर भारतातील राजकारणावर चर्चा झाली. बिहारच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आपले म्हणणे मांडले.

टीव्ही ९ न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर आज सत्ता संमेलनाचा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कॉनक्लेव्हचे उद्घाटन झाले. आज सकाळपासून भूपेंद्र यादव, पियुष गोयल ते यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंतच्या राजकारणावर बोलताना दिसले. किशन रेड्डी यांनी देखील दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंतच्या राजकारणावर संभाषण केले. बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असलेले केंद्रिय मंत्री चिराग पासवान यांनीही भारत मंडपम येथे आयोजित परिषदेला हजेरी लावली आणि केंद्रा ऐवजी बिहारात राजकारण करायचे असल्याचे सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला २४३ पैकी २२५ जागा मिळत आहेत असा दावा चिराग पासवान यांनी केला आहे. प्रत्येक मशिदीत शिवमंदिर शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ नये असे संघ प्रमुखांनी म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिथे जिथे खुणा, चिन्हे सापडतील तिथे तिथे खोदकाम केले जाईल असे म्हटले आहे. यापैकी कोणाचे म्हणणे पटतेय यावर चिराग पासवान यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की आपल्याला संघ प्रमुखाचे विचार पटतात….लोक केवळ जाती आणि धर्माबद्दल बोलतात याचा मला त्रास होतो असे केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले.
बिहार फर्स्ट – बिहार फर्स्टचा नारा
योगी किंवा संघप्रमुख यापैकी कोणाचे मत आवडते असे विचारले असता चिराग म्हणाले की, इतिहासाच्या पाने उलगडण्याची गरज नाही या संघ प्रमुखाच्या मताशी मी सहमत आहे. आपण सपा खासदारांनाही असेच प्रयत्न करताना पाहिले आहे. आमच्या युतीतील लोकही हेच करतात. जर आपल्याला भविष्याकडे जायचे असेल तर आपल्याला वर्तमानाकडेच पहावे लागेल.
२०४७ मध्ये भारताला विकसित करण्याच्या प्रवासात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मला बघायचे आहेत. चिराग पासवान यांनी असेही स्पष्टपणे सांगितले की, निवडणुका आल्या की बिहारमध्ये लोक जाती आणि धर्माबद्दल बोलू लागतात. मी ‘बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट’ बद्दल बोलतो आणि मी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला माहित नाही की मी यात किती यशस्वी होईन ? असेही पासवान म्हणाले.