WITT 2025 : औरंगजेब कबरीचा वाद; RSS नेते सुनील आंबेकर यांचे चर्चेत ते विधान, म्हणाले हे गौरवगानच तर….
RSS Leader Sunil Ambekar : आरएसएसचे नेते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाच्या मुद्दावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी वाद होण्यामागे एक मोठे कारण पुढे आणले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी मोठे भाष्य केले. काय म्हणाले आंबेकर?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाला आक्रमक म्हटले. त्याचे गुणगान करणे, त्याचा गौरव करण्याच्या वृत्तीची निंदा केली. कोणत्याही आक्रमणकर्त्याचे गुणगान केल्यावर समाजात वाद, तणाव निर्माण होतो. औरंगजेबावरची चर्चाच निरर्थक असल्याचे आंबेकर म्हणाले. समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या सारख्या राष्ट्रभक्तांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मुघल शासक औरंगजेबासंबंधीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. टीव्ही-9 भारतवर्षच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) या कार्यक्रमात सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाला आक्रमक म्हटले. देशात अशा कोणत्याही आक्रमकाचे गुणगान करणे, स्तुती करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. जर एखादा लुटारू देशात आला नि त्याने देशाला लुटले तर त्याचा गौरव कसा होऊ शकतो? असा सवाल करत त्यांनी यामुळेच समाजात वाद आणि तणाव वाढत असल्याचे म्हटले.
औरंगजेबवर चर्चाच चुकीची




आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी औरंगजेबावरील चर्चाच चुकीची असल्याचे म्हटले आहे. मुद्दामहून अशा मुद्यांना हवा देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. आक्रमणकर्त्यांची चर्चा करून मुद्दाम जनभावनांना भडकवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
त्याऐवजी समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी, त्यांच्या देशभक्तीविषयी चर्चा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ते दोघे राष्ट्रभक्त होते. औरंगजेबाची कबर खोदावी की नको, याविषयीचा खुलासा त्यांनी केला आहे. याविषयीचा वाद घटनेच्या चौकटीत सोडवण्यात यावे असे ते म्हणाले.
नागपूरमधील हिंसा चुकीचीच
सुनील आंबेकर यांनी नागपूरमधील हिंसेवर सुद्धा मत व्यक्त केले. त्यांनी ही हिंसा चुकीची असल्याचे म्हटले आहे. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या हिंसेमुळे शहरातील लोक चिंतेत आहे. हिंसेचे समर्थन करताच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अधिवेशनाच्या काळात राज्यात औरंगजेब कबर हटवण्यावरून राज्यात वातावरण तापले होते.