WITT 2025: पूजेची पद्धत बदलल्यामुळे पूर्वज…, भारतातील मुस्लिमांबद्दल संघाचं मत काय?

| Updated on: Mar 29, 2025 | 12:27 PM

'टीव्ही9' नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हमध्ये, आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भारतातील मुस्लिमांबद्दल आरएसएसचे मत स्पष्ट केलेत. स्वातंत्र्याच्या काळाच्या संदर्भात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राहण्याविषयी वक्तव्य केलं.

WITT 2025:  पूजेची पद्धत बदलल्यामुळे पूर्वज..., भारतातील मुस्लिमांबद्दल संघाचं मत काय?
Follow us on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘टीव्ही9’ नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतला. यावेळी सुनील आंबेकर अनेक विषयांवर स्वतःचे विचार मांडले. संघ भारताती मुस्लिम बांधवांबद्दल काय विचार करतो… याबद्दल सुनील आंबेकर यांनी सविस्तर सांगितलं आहे. शिवाय यावेळी पूजा पद्धतीबद्दल देखल संघ प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना जेव्हा विचारण्यात आलं की संघाचे मुस्लिमांबद्दल काय मत आहे? यावर सुनील आंबेकर म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या वेळीही संघाने देशाची फाळणी होऊ नये असं म्हटलं होतं. याचा अर्थ असा होतो की आपण सगळे एकत्र राहू.’

सुनील आंबेकर म्हणाले की, संघ-भारत आणि हिंदूंची श्रद्धा आहे की पूजेची पद्धत बदलून तुमचं राष्ट्र आणि तुमचे पूर्वज बदलत नाहीत. हेच संघाचे देखील विचार आहेत… हिच संघाची मान्यता आहे. संघ स्मृती जागृत करण्याचं काम करत आहे. आधी हिंदूंचं होईल, मग इतर लोकांचंही होईल. ते इतर कोणत्याही देशातून आलेले नसून याच देशाचे आहेत आणि त्यांच्या पूर्वजांचेही मोठे योगदान आहे आणि आपण कोणत्याही देवाची पूजा करू शकतो.

हे सुद्धा वाचा

‘ही माती आपली आहे, हा देश आपला आहे, यालाच सोबत घेऊन चालायचं आहे. येथे प्रत्येकाचं खूप महत्वाचं योगदान आहे. जर आपण एका शब्दात संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर, सर्वांनी एकत्र राहावं हिच आपली संस्कृती आहे… असं देखील सुनील आंबेकर म्हणाले.

नमाजच्या वादावर काय म्हणाले सुनील आंबेकर?

नमाज वादावर आरएसएस नेते सुनील आंबेकर म्हणाले, आपण सर्व संविधानाने बांधील आहोत. त्यामुळे आपल्याला एका चौकटीत राहणं गरजेचं आहे. शिस्त सर्वांसाठी समान असावी… याकडे सर्वांनी सारख्या दृष्टीने पाहायला हवं… असं देखील सुनील आंबेकर म्हणाले.

‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2025 ची जोरदार सुरुवात झाली. या दोन दिवसीय ग्लोबस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये सहभागी होण्यासाठी राजकारण, कला आणि व्यवसाय क्षेत्रातील लोक दिल्लीतील भारत मंडपममध्ये पोहोचले. यावेळी कलाविश्वाशी निगडित प्रसिद्ध कलाकारांनीही समिटमध्ये सहभाग घेतला.