WITT 2025 : रस्ते आणि छतावरील नमाजाचा वादंग फालतू आहे, विकासावर चर्चा व्हावी – चिराग पासवान
WITT 2025: टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉनक्लेव्हमध्ये चिराग पासवान देखील सहभागी झाले होते. चिराग यांनी बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वापासून ते धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल देखील आपले मत मांडले..

टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर बोलताना केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी – रामविलास ( एलजेपी – आर ) चिराग पासवान यांनी सडेतोड मते मांडली. ते म्हणाले मी कोणत्याही जात आणि धर्माच्या अंगाने विचार करीत नाहीत आणि अशा कोणत्याही राजकारणाचे समर्थन देखील करीत नाही. चिराग पासवान पुढे म्हणाले की मला केंद्रीय राजकारणाऐवजी राज्याचे राजकारण करायचे आहे आणि आपण बिहार विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत असेही ते म्हणाले. बिहारात एनडीएमध्ये असलेले पाच पक्ष नितीश कुमार यांच्या बॅनरखाली निवडणूक लढवतील आणि २४३ पैकी किमान २२५ जागा जिंकतील असेही पासवान यांनी सांगितले.
चिराग पासवान यांना वक्फ विधेयकावर त्यांचे मत विचारले तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सांगितले की मुसलमान लोकातही अनेक लोक असे आहेत ज्यांचा या सुधारणेला पाठींबा आहे. चिराग यांनी सांगितले की माझी ही इच्छा होती हे विधेयक जेपीसीकडे जावे. परंतू जेव्हा लोकांनी या विधेयकावर आपले म्हणणे मांडले तेव्हा समजले की मुस्लीमांमध्येही अनेक लोक या विधेयकाच्या बाजूचे आहेत. तीन तलाक बाबत देखील समज पसरविण्यात आला की संपूर्ण समाज तीन तलाकच्या विरोधात आहे. परंतू असे नव्हते. मी त्यांचा आवाज बनणार आहे जे अल्पसंख्यांकातील अल्पसंख्याक आहेत असे चिराग पासवान यावेळी म्हणाले.




धार्मिक राजकारणाशी घेतली फारकत
चिराग पासवान यांना जेव्हा नमाज आणि औरंगजेब होणाऱ्या राजकारणावर आपले मत काय असा सवाल केला तेव्हा ते म्हणाले की रस्ते आणि छतावर नमाज व्हायला हवा की नको याची चर्चा फालतू आहे. याऐवजी विकासावर बोलले पाहीजे. चिराग याने सांगितले की धर्म व्यक्तीगत श्रद्धेचा विषय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की जात – धर्माच्या नावाने वाद घालणे बेकार आहे. धर्म लोकांच्या घरापर्यंतच मर्यादित राहीला पाहीजे. चिराग यांनी मंदिर- मस्जिद वादावर योगी आदित्यनाथ यांच्या ऐवजी मोहन भागवत यांच्या वक्तव्यांशी सहमती दाखविली.