तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध सुधारणार नाही; राजनाथ सिंह यांचा पाकला सज्जड इशारा

What India Thinks Today | देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या मंचावरुन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानची चांगलीच कानउघडी केली. त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर थेट भाष्य केले. पाकिस्तानची सध्यस्थितीवर तिखट प्रतिक्रिया देत त्यांनी या देशाच्या नांग्या ठेचल्या.

तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध सुधारणार नाही; राजनाथ सिंह यांचा पाकला सज्जड इशारा
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 12:00 PM

नवी दिल्ली | 27 February 2024 : जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. युक्रेन-रशिया आणि हमास आणि इस्त्राईल यांच्यात युद्ध सुरु आहेत. या दोन युद्धाचा जगावर परिणाम होत आहे. अशात भारत आणि पाकिस्तानचे संबंध पण ताणलेलेच आहेत. पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तर भारताने गेल्या दहा वर्षात मोठी झेप घेतली आहे. भारताचा डंका जगभर वाजत आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या मंचावर भारत-पाकिस्तानच्या संबंधावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तानची चांगलीच कान उघडणी केली आहे. पाकिस्तानच्या सध्यस्थितीवर पण त्यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवली. काय म्हणाले संरक्षण मंत्री…

दहशतवादावर खडे बोल

पाकिस्तान शेजारी देश आहे. जेवढे शेजारी देश आहेत तिथे शांतता असावी. लोक शांतते राहावे. पण पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती नाही. दहशतवादाचा बोलबाला आहे. तिथे सतत जन आंदोलन होत असतात. पाकिस्तानची जनतेबाबत मी कधीच बोलत नाही. मी त्यांना दोषी ठरवत नाही. पण सत्ताधारी सत्तेत राहण्यासाठी नापाक गोष्टी करतात. त्यामुळे भारतासोबतचं नातं खराब होतं. सत्तेत राहण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात आहे. जोपर्यंत ही प्रवृत्ती राहील आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जातं, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

शेजारी बदलता येत नही

जेव्हा पाकिस्तानने उघडपणे बोलावं आणि त्याची अंमलबजावणीही केली पाहिजे. दहशतवादाला बळ देणार नाही, त्यांची ठिकाणे नेस्तनाबूत करू, प्रशिक्षण केंद्र चालू देणार नाही. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानची स्थिती सामान्य होण्यासाठी चर्चा होऊ शकते. वाजपेयी म्हणायचे, समाज जीवनाची आणि मनुष्य जीवनाचं वास्तव हे आहे की, मित्र बदलता येतील. पण शेजारी बदलता येत नाही. त्यामुळे शेजाऱ्यांशी नातं चांगलं राहिलं पाहिजे.

भारताची भूमिका निर्णायक

देशाची सुरक्षा हे आव्हान मोठं दिसत नाही. जग सध्या संकटातून जात आहे. दोन युद्ध सुरू आहेत. हे युद्ध शांत करण्यासाठी प्रभावी भूमिका केवळ भारतच निभावू शकतो. मोदींची मान्यता जवळपास जगातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं. तेव्हा भारतातील विद्यार्थी तिकडे होते. जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी जे केलं नहाी ते मोदींनी केलं. त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली. अमेरिकेशी संवाद साधला. साडेचार पाच तासासाठी रशिया आणि युक्रेन युद्ध थांबलं आणि भारताचे विद्यार्थी भारतात आले. हे काम तोच नेता करू शकतो ज्याच्या प्रती विश्वास आणि भरोस असेल. जगात शांतता निर्माण करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा भारतच मोठी भूमिका निभावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.