राहुल गांधी तर एकदम फिट! आता या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करा, रामदेव बाबांचा मिश्किल चिमटा
What India Thinks Today | रामदेव बाबा, यांनी योगाला मोठा मंच मिळवून दिला आहे. त्यांनी देशात काँग्रेसच्या काळात मोठे आंदोलन छेडले होते. तर ते योगासह राजकीय विषयाचा योग्य जुळवून आणतात हे वेगळं सांगायला नको. त्यांनी देशातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना TV9 च्या WITT सत्ता संमेलनात तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना एक अनाहूत सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली | 27 February 2024 : रामदेव बाबा केवळ योगासाठीच प्रसिद्ध नाहीत, तर एक यशस्वी उद्योग उभारणी त्यांनी केली आहे. राजकीय घडामोडींवर चिमटे काढायला पण ते विसरत नाहीत. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या WITT सत्ता संमेलनात त्यांनी राजकीय विचारांची पुन्हा झलक दाखवली. यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मंचावरुन त्यांचे विचार देशांनी ऐकले आहेत. जगभरात भारतीय राजकीय नेत्यांचे वर्चस्व वाढत असल्याची चर्चा त्यांनी केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. TV9 च्या WITT सत्ता संमेलनात त्यांनी तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना असा अनाहूत सल्ला दिला.
काय म्हणाले रामदेव बाबा
बाबा रामदेव यांनी तेजस्वी यादव ते राहुल गांधी यांच्याबाबत मत व्यक्त केले. तेजस्वी याद हे राजकीय दृष्ट्या परिपक्व होत असल्याचे कौतुक त्यांनी केले. म्हणजे तेजस्वी चांगला योग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेजस्वी यात्रा काढत आहेत आणि हजारो लोक त्यांना ऐकायला येत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी शाब्दिक कोटी केली. राहुल गांधी हे फिजिकली फिट आहेत. पण राजकीयदृष्ट्या त्यांना फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे असल्याचा चिमटा त्यांनी काढला.
पुरुषार्थाचे फळ मिळाले
रामदेव बाबा यांनी भारत जोडो यात्रेविषयी चर्चा केली. राहुल गांधी यांनी दक्षिणेतून यात्रा सुरु केली आणि ते उत्तर भारताकडे आले. त्याचा त्यांना फायदा झाला. त्यामुळेच काँग्रेस कर्नाटक आणि तेलंगाणात सरकार आणू शकली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एक संस्कृत श्लोक पण वाचून दाखवला. जो पुरुषार्थ करेल, त्याला फळ जरुर मिळते, असे ते म्हणाले. पण राहुल गांधी यांना अजून मेहनत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शून्य ते 5 लाख कोटींची भरारी
रामदेव बाबा यांनी सत्ता संमेलनात त्यांचा जीवन प्रवास उलगडला. 35 वर्षांपूर्वी हरिद्वार येथे आलो तेव्हा आपण केवळ एक बाबा होतो. आपल्याकडे काहीच नव्हते. त्यानंतर योगाची सुरुवात केली. हळूहळू पंतजलीचे साम्राज्य उभे राहिले. त्यांनी योग, त्यानंतर आयुर्वेदिक उत्पादने तयार करुन त्यांची विक्री केली. जर एक बाबा इतके काम करु शकतो, तर लोकांनी यापेक्षा अधिक काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
18-20 तासांचे काम
रामदेव बाबा यांनी त्यांची दिनचर्या समोर आणली. त्यानुसार, ते भल्या पहाटे 3 वाजता उठतात. तेव्हापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. रामदेव बाबा पूर्ण दिवस त्यांचे काम करतात. रात्री 10 वाजेनंतर झोपतात. ते दिवसभर 18 तास कार्यरत असतात. त्यानंतरच ते आराम करतात असे ते म्हणाले.