नागरिकांनो पावसात सावधान, पोलला हात लावल्याने रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना

पावसाळ्यात खुल्या वीजेच्या तारा आणि डीपी पासून लांबच रहायला हवे, पावसाच्या सुरुवातीला खुल्या सोडलेल्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह वाहत असल्याने अनेकांचे अपघाती मृत्यू दरवर्षी होत असतात.

नागरिकांनो पावसात सावधान, पोलला हात लावल्याने रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना
water loggingImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 3:17 PM

दिल्ली : पावसाळा सुरु झाला असून साचलेल्या पाण्यामुळे अनेकांचा दरवर्षी बळी जात असतो. त्यामुळे पावसात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मॅनहोल ( Manhole ) उघडे असणे, किंवा नाला न दिसणे, झाडे किंवा बांधकाम पडल्याने अनेकांचे हकनाक जीव जात असतात. मुंबईतही ( Rainy Season Mumbai ) अनेकदा असे भयानक अपघात झाले आहेत. नवी दिल्ली रेल्वे ( New Delhi railway station ) स्थानक परिसरात एका महिलेचा इलेक्ट्रीक पोल हात लावल्याने इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यात खुल्या वीजेच्या तारा आणि डीपी पासून लांबच रहायला हवे, पावसाच्या सुरुवातीला खुल्या सोडलेल्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह वाहत असल्याने अनेकांचे अपघाती मृत्यू दरवर्षी होत असतात. रविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात दिल्लीच्या प्रीत विहार परिसरात राहणारी साक्षी आहुजा ही महिला जात असताना तिने आधारासाठी इलेक्ट्रीक पोलला हात लावला आणि तिला वीजेचा जबर धक्का बसला. त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह लेडी हार्दींग रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.

साचलेल्या पाण्यापासून बचाव करायला गेल्या

भोपाळ शताब्दी एक्सप्रेस पकडण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी साक्षी आहुजा आपल्या पती सोबत येत होत्या. त्यावेळी स्थानक परिसरात पाणी साचलेले होते. साचलेल्या पाण्यापासून आपला बचाव करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रीक पोलला हात लावला आणि त्यांचा घात झाला. त्यांना वीजेचा जबर धक्का बसला आणि जागीच त्यांचे प्राण गेल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

वडीलांनी केला प्रशासनावर आरोप

“आम्ही चंदीगडला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी येत होतो. मी गाडी पार्कींग परिसरात होतो. तेव्हा माझ्या मुलीचा असा अपघात झाल्याचे मला कळाले. हा तर प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, “असा आरोप साक्षीचे वडील लोकेश कुमार चोपडा यांनी केला आहे. या प्रकरणात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 287 आणि 304 ( अ ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीसांची एफएसएल आणि रोहीणी टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरु आहे.

बालासोरमध्येही वीजेचा शॉक

अलिकडेच 2 जून रोजी ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडळ एक्सप्रेसच्या भीषण टक्करीत मृत्यू पावलेल्या चाळीस जणांच्या शरीरावर जखमेचा एकही निशान नसल्याने त्यांच्या डब्याला ओव्हरहेट वायरचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा बालासोर लोहमार्ग पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे. या अपघातात आतापर्यंत 278 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.