आंबा खाताच महिलेचं डोकं दुखायला लागलं, मग रुग्णालयात नेलं पण सर्वच संपलं !

आंबा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचं फळ आहे. आंबा खायला आवडत नाही म्हणणारा क्वचितच भेटेल. पण याच आंब्याने एका महिलेचा घात केला.

आंबा खाताच महिलेचं डोकं दुखायला लागलं, मग रुग्णालयात नेलं पण सर्वच संपलं !
इंदूरमध्ये आंबा खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 2:13 PM

इंदूर : आंबा म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच आंबा खायला आवडतो. आंबा खाण्यासाठी कोणतीही प्रमाण वेळ ठरलेली नाही. मात्र हाच आंबा एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्री जेवणानंतर आंबा खाल्ल्याने महिलेची तब्येत बिघडली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. इंदूरमधील बिजलपूरमध्ये ही हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत होईल.

काय आहे प्रकरण?

अर्चना अटेरिया असे मयत महिलेचे नाव आहे. अर्चना नेहमीप्रमाणे काल रात्री उशिरा जेवली. जेवल्यानंतर तिने आंबा खाल्ला. आंबा खाल्ल्यानंतर काही वेळातच महिलेचं डोकं दुखायला लागलं. त्यानंतर महिलेने थोडा वेळ आराम केला. पण तिचं डोकं दुखायचं थांबतच नव्हतं. तिचा त्रास वाढू लागल्याने घरच्यांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा बीपी लगातार कमी होत होता. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण उलगडेल. अर्चनाच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही आंबा खाल्ल्यानंतर गावात अनेक लोक आजारी पडले होते.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.