बाईकवरुन जाताना महिलेची ओढणी चेनमध्ये अडकून भयानक अपघात, कोपरापासून हातच निखळला

महिलांना मोटारसायकलीवरुन प्रवास करताना किती सावधानता बाळगावी याचा धडा देणारा दुर्दैवी प्रकार घडला आहे. एका महिलेची ओढणी बाईकच्या चेनमध्ये अडकल्याने तिला आपला हात गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बाईकवरुन जाताना महिलेची ओढणी चेनमध्ये अडकून भयानक अपघात, कोपरापासून हातच निखळला
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 10:13 PM

महिलांना मोटर सायकलवर बसताना किती सावध राहीले पाहीजे याचा धडा शिकविणारी दुर्दैवी घटना घडली आहे. एक महिला आपल्या सहा महिन्याच्या मुलीला डॉक्टरांना दाखविण्यासाठी आपल्या एका नातलगाच्या मोटरसायकलवर मागे बसली होती. परंतू या महिलेची ओढणी अचानक मोटर सायकलच्या चेनमध्ये अडकून मोठा अपघात घडला आहे. या महिलेचा हात कोपरापासून निखळून तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या अपघातात दुर्दैवी रक्षा हीचा डावा हात कायमचा निकामी झाला आहे.

या अपघातात दुर्दैवी रक्षा हीचा डावा हात कायमचा निकामी झाला आहे.

झांसी येथील हंसारी -राजगढ मार्गावर हा धक्कादायक अपघात घडला आहे. आपल्या मुलीच्या उपचारासाठी एक महिला एका नातेवाईकाच्या बाईकवरुन जात असताना अचानक तिची ओढणी बाईकच्या चेनमध्ये अडकल्याने तिचा हात चेनमध्ये अडकून कोपरापासून तुटला आहे. या महिलेने तिचा हात गमावला आहे. या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राजगढ येथे रहाणारे जयराम अहिरवार यांची मुलगी रक्षा माहेरी भाऊबि‍जेनिमित्त आली होती. तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला बरे वाटत नसल्याने ती एका नातलगाच्या बाईकवरुन डॉक्टरांकडे निघाली होती. या दरम्यान तिची ओढणी बाईकच्या चाकात अडकली. ओढणी हाताला गुंडाळलेली असल्याने तिचा डावा हात चेनमध्ये अडकल्याने कोपरापासून तुटल्याचा भयानक प्रकार घडला आहे. जयराम हे मजूर असून त्यांच्या मुलीचे गेल्यावर्षीच लग्न झाले होते. ती दिवाळी भाऊ बिजेनिमित्त माहेरी आली असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

महिलांनी बाईकवर बसताना सावध राहावे

बाईकवर बसताना महिलांनी सावधान बसावे आपले कपडे मोटार सायकलमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाईक सुरु होण्यापूर्वी आपले कपडे मोटार सायकलीच्या चाकात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावली. साडी किंवा ओढणी घट्ट अंगाभोवती बांधून घ्यावी , साडीचा पदर लटकता हवेत सोडू नये असे आवाहन ट्रॅफीक पोलिसांनी केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.