कोण आहेत खुशबू सुंदर? ज्यांनी वडिलांवरच लैंगिक शोषणाचे आरोप केलेत?

मी कोणत्या मनःस्थितीत होते, याची आता कल्पनाही करू शकत नाही. आईला सांगावं तर आई विश्वास ठेवणार नाही, अशी भीती सतत वाटायची, असा गौप्यस्फोट खुशबू सुंदर यांनी केला आहे. 

कोण आहेत खुशबू सुंदर? ज्यांनी वडिलांवरच लैंगिक शोषणाचे आरोप केलेत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 2:01 PM

नवी दिल्ली : महिला दिनाच्या (Women’s Day) एक दिवस आधीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. आयोगाच्या सदस्या, दाक्षिणात्य अभिनेत्री, भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी हा खुलासा केलाय. मी 8 वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी मी कोणत्या मनःस्थितीत होते, याची आता कल्पनाही करू शकत नाही. आईला सांगावं तर आई विश्वास ठेवणार नाही, अशी भीती सतत वाटायची, असा गौप्यस्फोट खुशबु सुंदर यांनी केला आहे.

गंभीर आरोप काय?

खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीदरम्यान, खासगी आयुष्यातील घटनांचा खुलासा केला. मी आठ वर्षांची असल्यापासून वडिलांनी माझं लैंगिक शोषण करणं सुरु केलं होतं. पत्नीला, मुलांना मारणं आणि मुलींचं लैंगिक शोषण करणं हा जणू आपला अधिकारच आहे, असं त्यांना वाटायचं. पण अशा घटना मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या असतात. माझ्या आईने सर्वात अपमानास्पद वैवाहिक जीवन जगलं. मी 8 ते 15 वर्षांपर्यंत त्यांचे अत्याचार सहन केले. १५ व्या वर्षी त्यांच्याविरोधात बोलण्याचा धडस माझ्यात आलं. पण आई विश्वास ठेवेल की नाही, अशी शंका होती. अखेर मी बोलले. पण या घटनेनंतर वडिलांचं निधन झालं. त्यावेळी घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती.. असा प्रसंग खुशबू सुंदर यांनी सांगितला.

कोण आहेत खुशबू सुंदर?

खुशबू सुंदर या एक दाक्षिणात्य सिने अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट द बर्निंग ट्रेनमधून एका बाल कलाकाराच्या भूमिकेतून चित्रपटांतील कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं. त्यात नसीब, लावारिस, कालिया, दर्द का रिश्ता आणि बेमिसाल यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अनेक तेलगु, कन्नड, मल्याळम चित्रपटांतूनही भूमिका केली. १९८५ मध्ये त्यांनी जॅकी श्रॉफसोबत जानू चित्रपटात अभिनय केला होता.

२०२० मध्ये राजकारणात प्रवेश

खुशबू सुंदर यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला. करुणानिधी यांच्या उपस्थितीत त्यांनी डीएमकेत प्रवेश केला.  २०१४ पर्यंत त्या डीएमके यांच्या पक्षात होत्या. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव पडल्याने त्यानी भाजपात प्रवेश घेतला.

नुकतंच महिला आयोगात सदस्यत्व

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने खुशबू सुंदर यांना राष्ट्रीय महिला आय़ोगाच्या सदस्यपदी नियुक्त केलं. खुशबू या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत आहेत. खुशबू सुंदर यांचा एक मोठा चाहता वर्ग भारतात विशेषतः दक्षिण भारतात आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं मंदिरदेखील बांधलंय.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.