‘त्या’ व्यक्तीला भुंकण्याचा झाला फायदा, काय घडला होता नेमका प्रकार…
श्रीकांती यांची कुत्र्यासारखे ओरडणे, आणि त्याच भाषेत अधिकाऱ्यांना सांगणे हे त्यांच्या कामी आले. त्यामुळेच त्यांच्या नावात तात्काळ बदलही करुन मिळाले.
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधील श्रीकांती यांचे नाव रेशनकार्डवर चुकीच्या पद्धतीने लागले होते. श्रीकांती यांचे अडनाव दत्ता आहे, तर त्या जागी कुत्ता असे झाले होते. त्यामुळे श्रीकांती यांनी तो बदल करुन घेण्यासाठी शासकीय कार्यालयात खेटे मारायला चालू केले तरीही त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ते प्रचंड त्रस्त झाले होते.
नावात केलेल्या चुकीमुळे आणि त्यात बदल करुन घेण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळे श्रीकांत यांनी एक युक्ती शोधून काढली.
बंगाल: राशन कार्ड में Dutta की जगह लिखा ‘Kutta’ तो भड़का शख्स, अधिकारी के सामने भौंकने लगा| ?? pic.twitter.com/aFcWWxfhyS
— shrikant jain (@shrekantjain) November 21, 2022
रेशनकार्डवर दत्ताच्या जागी कुत्ता झालेले. त्यामुळे त्यांनी मग कुत्र्यासारखेच ओरडायला चालू केले. आपल्या नावात बदल करा असं सांगण्यासाठी त्यांनी बीडीओकडेही त्यांनी कुत्र्यासारखेच ओरडून ओरडून सांगायला सुरुवात केली.
त्यामुळे श्रीकांती यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यांची समस्या जाणून घेऊन बीडीओनीही मग त्यांच्या नावात तात्काळ बदल करण्याचे आदेश दिले.
बांकुरा जिल्ह्यातील बिकनामध्ये राहणाऱ्या श्रीकांती कुमार दत्ता यांच्या नावात घोळ झाला होता. रेशनकार्डवर दत्ताच्या जागी त्या कुत्ता असं छापण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा तक्रारी करुनही शासकीय यंत्रणानी त्यांनी दाद दिली नव्हती.
आपल्या नावात शासकीय कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेला बदलही अधिकारी लोक दुरुस्त करुन देत नाहीत म्हटल्यावर त्यांनी कुत्र्यासारखे ओरडणे, कुत्र्यासारखेच व्यवहार करणे अशी युक्ती शोधून काढली होती.
आपल्या नावात झालेली चूक दुरुस्त करुन घेण्यासाठी त्यांनी बीडीओंना भेटल्यानंतरही कु्त्र्यासारखेच ओरडून त्यांनी त्यांना समस्या सांगितली आणि त्यांनी अर्जही केला.
श्रीकांती यांनी आपल्या नावात झालेला बदल बीडीओंना दाखवल्यानंतर आणि कुत्र्यासारखे ओरडून सांगितल्यानंतर बीडीओनीही तात्काळ बदल करण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या.
त्यामुळे श्रीकांती यांची कुत्र्यासारखे ओरडणे, आणि त्याच भाषेत अधिकाऱ्यांना सांगणे हे त्यांच्या कामी आले. त्यामुळेच त्यांच्या नावात तात्काळ बदलही करुन मिळाले.
श्रीकांती यांनी कुत्र्यासारखे ओरडून आपल्या नावात बदल करुन घेतले तरी त्यांनी ही कल्पना फक्त शासकीय कार्यालयातच केली असं नाही तर ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी त्यांनी कुत्र्यासारखे चालणे, भुंकणे हा प्रकार केला होता.
त्यामुळे लोकांनाही आधी वाटले की, श्रीकांती यांना काही तरी आजार झाला आहे. त्यानंतर मात्र ज्यावेळी ही खरी गोष्ट लोकांच्या लक्षात आली त्यावेळी मात्र अनेकांना धक्का बसला.