Working hours : 1 एप्रिलपासून नोकरदारांच्या कामाचे तास वाढणार?
औद्योगिक मजुरांकडून दिवसाला आठ तास तर आठवड्याला 48 तास काम करवून घेता येते. | working hours increases
मुंबई: देशात लवकरच नव्या कामगार नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची कमाल कालमर्यादा 12 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु होती. यावरुन अनेक उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात होते. सध्याच्या नियमांनुसार कामाची कमाल मर्यादा 10.5 तास इतकी आहे. (Government clerifies working hours increases or not)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांबाबत बोलायेच झाल्यास, औद्योगिक मजुरांकडून दिवसाला आठ तास तर आठवड्याला 48 तास काम करवून घेता येते. ज्याठिकाणी कामाच्या एका पाळीनंतर दुसऱ्या पाळीची (Shift) पद्धत आहे त्याठिकाणी ही कालमर्यादा 56 तास इतकी आहे. तीन आठवड्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासाची दैनंदिन सरासरी आठ तास इतकी असली पाहिजे.
केंद्र सरकारचे म्हणणे काय?
केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी नुकतेच कामगार कायद्याबाबत स्पष्टीकरण दिले. 1948च्या कारखाना कायद्यातील कामकाजाचे तास वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही. देशातील नोंदणीकृत कार्यालयांमध्ये 1948च्या कारखाना कायद्यानुसार कामाचे तास निश्चित केले जातात.
गेल्यावर्षी कोरोना काळात काही राज्यांनी केंद्र सरकारकडे कामकाजाचे तास वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावल्याचे संतोष गंगवार यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकारची अल्प उत्पन्न गटाला खुशखबर, खात्यात अधिक पगार जमा होणार
काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने अल्प उत्पन्न गटातील नोकरदारांना मोठा दिलासा दिला होता. ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’च्या (Atmanirbhar Bharat Rojgar Yojna) अंतर्गत सरकार दोन वर्षांपर्यंत रिटायरमेंट फंडात (EPF) कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या वतीने रक्कम जमा करेल. त्यामुळे नोकरदारांच्या हातात जास्त पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’चा लाभ 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. 1 ऑक्टोबर 2020 च्या आधी कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी (EPFO) संबंधित आस्थापनात नोकरी न करणारे, युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) किंवा ईपीएफ सदस्यत्व नसलेले कर्मचारीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
संबंधित बातम्या :
नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ
(Government clerifies working hours increases or not)