Matrimonial Sites : कमावत्या स्त्रियांना लग्नासाठी फारशी पसंती नाही! सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

Working Women : या सर्वेक्षणसाठी त्यांनी 20 बनावट प्रोफाईलही मॅट्रीमोनिअल साईट्सवर तयार केले होते.

Matrimonial Sites : कमावत्या स्त्रियांना लग्नासाठी फारशी पसंती नाही! सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर
इंटरेस्टिंग बातमी..
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 7:24 AM

मुंबई : नोकरी (Working women) करणाऱ्या महिलांना मॅट्रिमोनिअल (Matrimonial Sites) वेबसाईट्सवर मॅच (Life partner) किंवा जोडीदार सापडण्याची शक्यता कमी असते, असं एका अभ्यातासून समोर आलं आहे. तर उलटपक्षी काम न करणाऱ्या स्त्रियांना किंवा नोकरी न करणाऱ्यांना स्त्रियांना 15 ते 22 टक्के अधिक पसंती असल्याचंही दिसून आलं आहे. एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत लग्नसाठी 78-85 पुरुष हे कधीही काम किंवा नोकरी केलेल्या स्त्रियांना अधिक पसंती देतात, असंही समोर आलंय. एका डॉक्टरने केलेल्या या सर्वेक्षणातून काही धक्कादायक बाबींचा खुलासाही झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन लग्न जुळवणाऱ्या साईट्सवर महिलांकडे पाहण्याचा नेमकी दृष्टीकोन कसा असतो, याबाबतही अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत, असा दावा सर्वेक्षणातून केला गेलाय. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलंय.

सर्वेक्षणातील महत्त्वाच्या नोंदी

  1. लग्नानंतर काम सुरु ठेवू इच्छिणाऱ्या महिलांचा पगार हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो. जास्त पगार घेणाऱ्या महिलांना पुरुषांची पसंती मिळण्याचं प्रमाण अधिक आहे. काही काम न करणाऱ्या किंवा नोकरी न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत जास्त कमावणाऱ्या महिलांना पसंती देण्याची शक्यता 10 टक्के कमी आहे. तर पुरुषांपेक्षा कमी कमावणाऱ्या महिलांना जास्त पसंती मिळण्याची शक्यता 15 टक्के आहे.
  2. 99 टक्के महिला या वयाच्या 40 व्या वयापर्यंत लग्न करतात. आपलं काम हे जर लग्नात बाधा ठरणार असेल, तर महिला ते सोडण्याला पसंती देतात, असंही समोर आलं.
  3. नोकरी न करणाऱ्या किंवा काम करुन पैसे न कमावणाऱ्या महिलांना पुरुषांची अधिक पसंती आहे. काम करणाऱ्या महिलांना मॅट्रिमोनिअर वेबसाईटवर मिळणारा प्रतिसाद हा फारचा चांगला नाही, असंही समोर आलंय.

कुणी केलं सर्वेक्षण?

डॉक्टरल कॅन्डिडेड असणाऱ्या दिवा धर यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. दिवा धर या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ब्लावात्निक स्कूल ऑफ गव्हर्नमेन्टमध्ये डॉक्टरल कॅन्डिडेड आहेत. त्यांना नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांबाबत आणि नोकरी न करणाऱ्या महिलांबाबत अभ्यास करायचा होता. या अभ्यासाद्वारे त्यांना लग्न जुळवताना नेमकी पसंती कुणाला मिळते, त्यामागची कारणं काय आहेत, नोकरी करणाऱ्याय महिलांना मॅट्रिमोनिअल साईट्सवर लग्न जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो, नेमक्या नोकरी करणाऱ्या महिलांसमोरील अडचणी काय आहेत, याबाबत अभ्यास करायचा होता. त्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केलं होतं.

कसं केलं सर्वेक्षण?

या सर्वेक्षणसाठी त्यांनी 20 बनावट प्रोफाईलही मॅट्रीमोनिअल साईट्सवर तयार केले होते. यात त्यांनी वय, लाईफस्टाईल, आवडी, निवडी या सगळ्या गोष्टी सारख्या ठेवून फक्त तीन बाबींत फरक केला. तुमच्या जोडीदाराने नोकरी करणारा हवा का, त्यानं भविष्यातही नोकरी करावी का, त्याने किती पैसे कमवावेत, या तीन प्रश्नांबाबतची माहिती बनावट प्रोफाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भरली. यामुळे नेमका कोणत्या प्रोफाईलला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर दिवा धर यांच्या परिचयाच्या अनेक महिलांना नोकरी सोडावी लागली होती. लग्नामुळे त्यांना आपलं करिअर सोडावं लागल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे हा एक प्रकारचा दंड असल्याची भावना महिलांमध्ये निर्माण होत असल्याचं त्यांना जाणवलं, त्यामुळे त्यांनी हे सर्वेक्षण केलं होतं.

हे सुद्धा वाचा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.