World Heritage Day 2023 : एखादे ठिकाण हेरिटेज घोषित केल्यामुळे त्याचा काय फायदा होतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतातील आतापर्यंत 40 वारसा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. जागतिक वारसा स्थळ घोषित केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
मुंबई : 18 एप्रिलला जागतिक वारसा दिवस (World Heritage Day 2023) साजरा केला जातो. जगात असलेली ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा यांचं लोकांकडून संरक्षण व्हावं, त्याच्या जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. युनेस्कोने (UNESCO) भारतातील 40 वारसा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. एखाद्या ठिकाणाला हेरिटेज जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो. जाणून घ्या त्याबाबतची संपूर्ण माहिती. युनेस्कोने एखाद्या जागेला समजा जागतिक हेरिटेज जाहीर केल्यानंतर काय होते? त्याचा सगळ्यात मोठा फायदा ती जागा संपूर्ण जगाला (WORLD) माहित होते. असे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने जगभर प्रसिद्ध होते.
कोणत्याही ठिकाणाला जागतिक वारसा ठिकाण म्हणून एखदा घोषित केल्यानंतर त्याची देखरेख करण्याची जबाबदारी अधिक वाढली जाते. समजा एखादा देश गरीब आहे, आणि त्या देशाला ठिकाणाची देखरेख करण्यास अडचण निर्माण होत असल्यास युनेस्को त्याची संपूर्ण जबाबदारी घेते.
अशी ठिकाणं आंतरराष्ट्रीय नकाशात फक्त मिळतात. त्याबरोबर अशा ठिकाणाची संपूर्ण जगात चर्चा केली जाते. त्याचबरोबर जगातील अनेक लोकांची ते ठिकाण पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे तिथं पर्यटकांची सुध्दा अधिक संख्या वाढते. पर्यटक तिथं वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला सुध्दा त्याचा अधिक फायदा होतो.
जागतिक हेरिटेज ठिकाणं कसं निवडलं जात ?
वारसा जतन करण्यासाठी, दोन संस्थांचे मूल्यांकन आंतरराष्ट्रीय स्मारक आणि साइट्स परिषद आणि जागतिक संरक्षण संघाद्वारे केले जाते. त्यानंतर जागतिक वारसा समितीकडे याची तात्काळ शिफारस केली जाते. संबंधित समिती वर्षातून एकदा बैठक घेते, त्यानंतर त्या जागेला वारसा स्थळ म्हणून घोषित करायचं की नाही यावर विचार करते.
याची सुरुवात कधी झाली ?
18 एप्रिल 1982 रोजी पहिला जागतिक वारसा दिवस ट्यूनिशियामध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक आणि साइट्स परिषदेने साजरा केला. त्याच्या पुढच्यावर्षी त्याला युनेस्कोकडून मान्यता देण्यात आली आहे. जगभरातून लोकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव होईल या हेतूने जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो.