Monkeypox HIV Covid : जगातील पहिलं प्रकरण, मंकीपॉक्ससोबतच HIV आणि कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती सापडला
आता कोविड आणि मंकीपॉक्समधून तो बरा झालाय. शरीरावर छोटे डाग कायम आहेत.
इटलीत (Italy) संशोधकांसमोर अनोखं प्रकरण समोर आलं. एका व्यक्तीला एकाचवेळी मंकीपॉक्स, कोविड 19 आणि एचआयव्ही पॉझिटिव्हची लक्षण दिसली. यामुळं संशोधकांना धक्काच बसला. स्पेनच्या (Spain) ट्रीपवरून परत आल्यानंतर या व्यक्तीला ही लक्षणं सापडली. पाच दिवस या व्यक्तीनं स्पेनमध्ये यात्रा केली. आठवडाभर या व्यक्तीची तब्ब्यत बरी नव्हती. तपासणी केली असता भयावह वास्तव पुढं आलं. कोरोनातून तो आता बरा झाला. पण, मंकीपॉक्सचा स्वॅब 20 दिवसांनंतरही सकारात्मक होता. मंकीपॉक्स विषाणू, कोविड 19 आणि एचआयव्हीचा संसर्ग एकाचवेळी झालेली ही पहिली व्यक्ती आहे. त्यामुळं या व्यक्तीच्या प्रकृतीकडं संशोधक (Researcher) लक्ष ठेऊन आहेत.
कोणती लक्षणं आढळली
जर्नल ऑफ इंफेक्शनमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार, एका 36 वर्षीय व्यक्ती हा स्पेनच्या ट्रीपवर गेला होता. परत आला तोपर्यंत त्याला ताप आला होता. गळा सुजलेला होता. थकवा जाणवत होता. शिवाय डोकेदुखी आणि सुजनही होती. ही लक्षणं जाणवू लागल्यानंतर तीन दिवसांत संबंधित व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह सापडला. शरीरावर तसेच चेहऱ्यावर भेगा पडल्यासारखं झालं. त्यानंतर तो व्यक्ती संसर्गजन्य आजार विभागात रुग्णालयात गेला. न्यूजवीकनं दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरीरावर ठपके आढळून आले. जननिंद्रीयावरही लालसर पट्टे दिसले. लिव्हरवरही सूज आली. त्यानंतर त्याला मंकीपॉक्सचाही संसर्ग झाल्याचं समोर आलं. शिवाय तो एचआयव्ही पॉझिटिव्हही सापडला. SARS-CoV-2 जिनोमसह ओमिक्रॉन सब व्हेरिएंट BA.5.1 चा संसर्गही झाला.
लसीकरणाचे दोन डोज घेऊनही पॉझिटिव्ह
या व्यक्तीनं कोरोना व्हायरस प्रतिबंधित लसीकरणाचे फायझरचे दोन डोज घेतले होते. 19 ऑगस्टच्या जर्नलमध्ये संसर्गाचा अहवाल देण्यात आलाय. एका आठवड्याच्या उपचारानंतर या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. आता कोविड आणि मंकीपॉक्समधून तो बरा झालाय. शरीरावर छोटे डाग कायम आहेत. मंकीपॉक्स आणि कोविड 19 ची लक्षणं एकाचवेळी एका व्यक्तीला झालीत. शिवाय एचआयव्हीची लागण त्या व्यक्तीला झाली होती. संशोधनासाठी या केसचा वापर केला जाणार आहे.