५० वर्षांची प्रतिक्षा पूर्ण होणार, कश्मीर उर्वरित देशाला जोडले जाणार,जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन केव्हा ?
नंदनवन काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान मोदी उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटनही करणार आहेत..

काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. भारतीय रेल्वे १९७२ मध्ये जम्मूला पोहोचली होती. मात्र तिला कश्मीर खोऱ्याशी जोडण्यासाठी तब्बल ५० वर्षे वाट पहावी लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी उधमपूर येथे जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते कटरा येथे पोहोचतील आणि वंदे भारत ट्रेनला श्रीनगरला रवाना करतील. जम्मू रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर वंदे भारत ट्रेन सध्या काही महिने कटरा येथून चालविली जाणार आहे. काश्मीर खोऱ्याला रेल्वेने देशाच्या इतर भागाशी जोडण्याचा हा क्षण ऐतिहासिक असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सध्या काही काळ कटरा येथून धावणार आहे. कारण जम्मू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला येत आहेत. ते आधी उधमपूरमध्ये येणार असून त्यानंतर ते जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची ( चिनाब ) पाहणी करतील आणि त्याचे उद्घाटन करतील. नंतर ते कटरा येथे पोहोचतील आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.




कश्मीरमध्ये ट्रेन पोहचायला ५० वर्षे वाट पहावी लागली
पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्टेशनचे लोकार्पण केले होते. भारतीय रेल्वे १९७२ मध्ये जम्मूला पोहोचली असली तरी, कश्मीरमध्ये ट्रेन पोहचविण्यासाठी तिला ५० वर्षांची वाट पहावी लागली. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचे काम झाल्यानंतर आता जम्मूतून कश्मीर खोऱ्यापर्यंत ट्रेन धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.