Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन नव्हती”; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार…

भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी एक गुन्हा पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता.

त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन नव्हती; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार...
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:50 AM

नवी दिल्लीः डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. या आंदोलनात एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणारी ‘अल्पवयीन’ कुस्तीपटू ही त्यावेळी अल्पवयीन नव्हती अशी सध्या चर्चा सुरु करण्यात आली आहे.

न्यायालयात आपले म्हणणे सादर करताना त्यांनी आपले मत बदललेले असल्याचीही चर्चा सुरु आहे. मुलीच्या वडिलांनी बुधवारी न्यायालयात जबाब नोंदवताना आपल्या मुलीच्या वयाबद्दलच मत विचारल्यानंतर तेव्हा वेगळे मत व्यक्त केले होते असंही त्यांनी यावेली सांगितले.

भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी एक गुन्हा पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता.

त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. 15 जूनपर्यंत दिल्ली पोलीस डब्लूएफआयच्या अध्यक्षांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.

ही माहिती शासनाकडून कुस्तीप्रेमींना देण्यात आल्याचेही स्पष्ट केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना फोन करुन त्यांच्याबरोबर सुमारे सहा तास चर्चा केली होती.

या बैठकीत कुस्तीगीरांच्या बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. हे कुस्तीगीर 23 एप्रिलपासून ब्रिजभूषणच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

तर 28 मे रोजी या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायतीचे आयोजनही केले होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना हे आंदोलन करण्यापासून थांबवले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपावरून अनेक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.