‘हॉटेलात त्यांच्या बेडवर मी बसले होते तेव्हा बृजभूषण यांनी…,’ साक्षी मलिक हीचा पुस्तकात खळबळजनक आरोप

साक्षी मलिक हीने आपल्या आत्मकथनपर पुस्तकात जीवनातील अनेक कटु गोड अनुभवांवर लिहीले आहे.या पुस्तकातील काही अंश वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन खळबळ उडाली आहे.

'हॉटेलात त्यांच्या बेडवर मी बसले होते तेव्हा बृजभूषण यांनी...,' साक्षी मलिक हीचा पुस्तकात खळबळजनक आरोप
sakshi malik and brijbhushan singh
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 9:56 PM

साल 2016 चे रियो ओलम्पिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीच्या ‘विटनेस’ नावाच्या पुस्तकात तिने खळबळ जनक दावे केले आहेत. तिने भारतीय कुस्ती महासंघ ( WFI ) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक छळाचे आरोप लावले आहे. साक्षी हीच्या आत्मकथनपर पुस्तकात तिने साल 2012 मध्ये कझाकिस्तानच्या अल्माटी येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियन शिपमधील एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यात तिने बृजभूषण शरण सिंह यांनी हॉटेलच्या एका रुममध्ये आपल्या बोलावून आपला लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या पुस्तकात केलेला आहे. टाइम्स ऑफ इंडियात या ‘विटनेस’ या पुस्तकातील काही अंश प्रसिद्ध झालेला आहे. आपल्याला आई-वडीलांशी बोलण्याच्या बहाण्याने बृजभूषण यांच्या हॉटेलच्या रुममध्ये पाठवण्यात आले होते. तेथे जे झाले ते माझ्या जीवनातील सर्वात दु:खदायक घटनेपैकी एक बनले असे साक्षीने आपल्या पुस्तकात लिहीले आहे.

या पुस्तकात साक्षी मलिक हीच्या जीवनातील अनुभव लिहीले आहेत. यातील एक किस्सा खळबळजनक आहे.साक्षी लिहिते.. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये माझ्या पालकांशी बृजभूषण शरण सिंह यांनी माझे बोलणे करुन दिले. मी आरामात त्यांच्याशी बोलले. आई-वडीलांना मी आपली मॅच आणि पदकाच्या बद्दल सर्वकाही सांगितले. मला चांगले आठवतंय त्या क्षणापर्यंत कोणतेही अप्रिय काही घडणार आहे याची पुसटही शंका माझ्या मनात नव्हती. परंतू माझा कॉल संपताच माझ्याशी चाळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी त्यांना धक्का दिला आणि रडू लागले.त्यानंतर ते पाठी हटले.मला वाटतं त्यांना ही कल्पना आली की त्यांना जे हवं होते त्यासाठी मी राजी नाही.त्यानंतर त्यानी असे सांगणे सुरु केले की मी तिच्या डोक्यावर वडीलांसारखा हात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मला माहिती आहे ते असे काही नव्हते. मी रडत त्या रुममधून बाहेर पडले.

‘ट्यूशन देने वाले टीचर ने भी मेरे साथ…’

कुस्तीपटू साक्षी मलिक हीने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की असा लैंगिक छळाचा प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदा घडलेला नाही. लहानपणी ट्युशन देणाऱ्या टीचरने लगट करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मी आई वडीलांना काही सांगू शकले नव्हते. कारण मला ती माझी चूक वाटत होती. माझ्या शालेय दिवसात ट्युशन देणारा शिक्षक माझा छळ करायचा. तो मला क्लाससाठी वेळे अवेळी आपल्या घरी बोलवायचा. अनेकदा मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. मी क्लासला जायला घाबरायची. परंतू आपल्या आईला मी काही तक्रार करु शकली नाही. माझे कुटुंब सहकारी कुस्तीपटू सत्यव्रत कादियान सोबत नाते जुळविण्याचा विरुद्ध होता तरीही आपण त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे साक्षी हीने पुस्तकात लिहीले आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....