नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर रविवार 28 मे 2023 रोजी कुस्तीपटूंचे आंदोलन बळजबरीने आणि हुकुमशाही पद्धतीने संपवले आहे. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या महिलांच्या ‘महापंचायत’ची सुरक्षा कवच तोडून त्यांच्या अमानुषपद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याची भावना आता क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून व्यक्त केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचे चित्र आणि व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
ज्यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग यांनीही कुस्तीपटूंना दिलेल्या या वागणुकीबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानेही आता कुस्तीपटूंच्या समर्थनाथ ट्विट केले आहे. त्याने सांगितले की, भारतीय कुस्तीपटूंचे असे फोटो पाहिल्यानंतर आता त्यांची झोप उडाली आहे.
अभिनव बिंद्राने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या सहकारी भारतीय कुस्तीपटूंचे आंदोलन करतानाचे त्यांचे भयानक फोटो पाहल्यामुळे काल रात्री माझी झोप उडाली.’ असं त्यांनी भावूक होऊन सांगितले आहे.
Last night was sleepless, haunted by the horrifying images of my fellow Indian wrestlers protesting. It’s high time we establish independent safeguarding measures across sporting organizations. We must ensure that if such situations arise, they are dealt with utmost sensitivity…
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) May 29, 2023
अभिनव बिंद्राने असेही लिहिले की, ‘आता सर्व क्रीडा संघटनांमध्ये स्वतंत्र सुरक्षा उपाय स्थापित करण्याची वेळ आली आहे. आपण हे निश्चित केले पाहिजे की अशी परिस्थिती उद्भवल्यास, अत्यंत संवेदनशीलतेने आणि आदराने त्यांचा सामना करावा लागले. प्रत्येक खेळाडूला सुरक्षित आणि सशक्त वातावरण मिळायला पाहिजे अशी इच्छाही ्तयांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, 28 मे रोजी पोलिस कोठडीतून सुटलेले पैलवान आता त्यांच्या पुढील वाटचालीवर विचार करत आहेत. त्याला आता क्रीडा जगताकडून पाठिंबा मिळत आहे. राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी रविवारी अव्वल कुस्तीपटूंवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही निषेध व्यक्त केला आहे.
बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आमचे पुढचे पाऊल आता काय असणार आहे, ते आम्ही लवकरच जाहिर करणार आहे. मात्र काल जे घडले त्यातून आम्ही अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. मला रात्री 11 वाजता सोडण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना जंतरमंतरवर परत येऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. निदर्शक कुस्तीपटूंना त्यांच्या निषेधाच्या ठिकाणाहून काढून टाकल्यानंतर एका दिवसानंतर, दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले की त्यांना जंतर-मंतर व्यतिरिक्त योग्य ठिकाणी निषेध करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.