यमुनेचा दिल्ली-एनसीआरला धोका! पावसामुळे अनेक घरे पडली, शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त

मागच्या चार दिवसांपासून, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

यमुनेचा दिल्ली-एनसीआरला धोका! पावसामुळे अनेक घरे पडली, शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त
heavy rain delhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 2:47 PM

नवी दिल्ली : संपूर्ण देशात मान्सून (monsoon update) यावर्षी उशिरा दाखल झाला, परंतु उशिरा दाखल झालेल्या पावसाने थैमान घातले आहे. चार राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे (heavy rain delhi) सगळीकडं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढली असल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यमुना नदीच्या किनारी असलेल्या शेतीचं (farmer) मोठं नुकसान होत आहे. मागच्या दोन दिवसांपासून शेतात पाणी असल्याचं दिसतं आहे.

यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याच्या उंबठ्यावर आहे. दिल्ली यमुना नदीच्या पाणी पातळीत मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. जुना पूल जो आहे, नदीच्या पाण्याच्या पातळीपासून काही मीटरवरती आहे. केंद्रीय पाणी आयोगाच्या माहितीनुसार, यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आज 205.33 मीटर पाणी वाढण्याची शक्यता आहे. सीडब्ल्यूसीच्या रिपोर्टनुसार, रविवारी दुपारी १ वाजता जुन्या रेल्वेच्या पूलावर पाण्याची पातळी 203.18 मीटर होती.

मागच्या ४१ वर्षाचा रेकॉर्ड तोडला

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मुसळधार पाऊस झाला, त्या पावसाने 41 वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 1982 नंतर जुलै महिन्यात इतका मोठा पाऊस झाला आहे. ४० वर्षापूर्वी 25 जुलै 1982 ला 169.9 मिमी पाऊस झाला होता. मागच्या चार दिवसांपासून, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नद्यांना पूर आल्यामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत.

काही भागात घरं पडली

पाऊस कायम असल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे. काही परिसरात घरं सुध्दा पडली आहेत. काही गरिबांच्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या आहे. सगळीकडं पाणी असल्यामुळे गाड्या रस्त्यात अडकून पडल्या आहेत. पूरस्थिती इतकी भयानक आहे की, इतर राज्यातील लोकांना फोटो पाहून धक्का बसला आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.