Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात

येस बँकेने कर्ज थकवणाऱ्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं (ADAG) मुख्यालय ताब्यात घेतलं आहे (Yes Bank take over Anil Ambani group headquarter).

Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 12:27 PM

नवी दिल्ली : येस बँकेने कर्ज थकवणाऱ्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं (ADAG) मुंबईतील मुख्यालय असलेलं रिलायन्स सेंटर ताब्यात घेतलं आहे (Yes Bank take over Anil Ambani group headquarter). अनिल अंबानी यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने हा निर्णय घेतला. बुधवारी (29 जुलै) येस बँकेने फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत सांगितलं, की “बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा घेतला आहे.

रिलायन्स सेंटरचा सिक्युरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अ‍ॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अ‍ॅक्टनुसार (SARFESI) 22 जुलैला ताबा घेण्यात आला. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचं 2,892 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने हे पाऊल उचललं आहे. या वर्षी मार्चमध्ये अनिल अंबानी यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, “येस बँकेच्या कर्जासाठी अंबानी ग्रुपने दिलेली हमी सुरक्षित आहे आणि सर्व कायदेशीर-आर्थिक गोष्टींचं पालन केलं जात आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अनिल अंबानी ग्रुपचा राणा कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुली यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संपर्क झालेला नाही. तसेच त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या कोणत्याही संस्थेशी देखील काही संपर्कात नाही, असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. मे महिन्यात अंमलबजावणी संचलनालयाने राणा कपूर, त्यांची मुलगी रोशनी कपूर, राधा कपूर आणि राखी कपूर यांच्या विरोधात येस बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं आहे. याशिवाय या आरोपपत्रात मॉर्गन क्रेडिट्स, येस कॅपिटलचंही नाव आहे. सध्या येस बँकेचे संचालक म्हणून प्रशांत कुमार काम पाहत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनिल अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, टेलिकॉम, पॉवर आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढताच आहे.

हेही वाचा :

Jio Glass | मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचे अनुभव देणारा ‘जियो ग्लास’, इशा-आकाश अंबानी यांचे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट

RIL AGM 2020 | Jio चा धमाका, पुढील वर्षी आत्मनिर्भर 5G, तर गुगलची 33 हजार कोटीची गुंतवणूक

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं

Yes Bank take over Anil Ambani group headquarter

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.