दाढी कापली तरच नवरी मिळेल, प्री वेडिंग शुटिंगवरही बंदी; ‘या’ राज्यात लग्नासाठी अनोखं फर्मान
हिंदू संस्कृतीत दाढी राखण्याची प्रथा नाही. त्यामुळे वराला जर घोड्यावर बसायचे असेल तर त्याने क्लिन शेव्ह करावी असा ठराव या बैठकीत बहुमताने घेण्यात आला आहे.
देशात अनेक समाजात विविध जाती आणि चालीरीती प्रचलित आहेत. या समाजाच्या जात पंचायतीत रोज नवनवीन फर्मान निघत असतात. आता राजस्थानातील उदयपूर येथील एका गावातील मेनारिया समाजातीत बांधवांची महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत समाजातील अनेक प्रमुख मंडळी हजर होती. या जात पंचायतीच्या बैठकीत समाजातील सध्या बदललेली दिशा आणि दिशा यावर मोठे मंथन घडले. समाजातील काही मंडळीनी आपली संस्कृती वाचविण्यासाठी वेगवेगळ्या बाबींवर चर्चा केली. यावेळी लग्नाच्या वेळी वराने ( क्लीन शेव ) दाढी केल्याशिवाय त्याला घोड्यावर बसू न देण्याचा ठराव करण्यात आला. तर संस्कृती वाचविण्यासाठी प्री-वेडिंग शुटिंगवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
उदयपूरातील गिर्वा चोखले ( गिर्वा येथील समाज ) च्या मेनारिया समाजाच्या समाजाची बैठक पानेरियाच्या मादडी गावाच्या भट्ट तलाई नोहरे गावात आयोजित केली होती. येथे नऊ गावाच्या समाजातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या बैठकील 1500 हून अधिक लोक सामील झाले. या बैठकीत समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दशा णि दिशेवर चर्चा झाली.
वराला क्लीन शेव्ह करावी लागणार
समाजालील धुरिणांनी अनेक ठराव केले.त्यात समाजातील तरुणांनी दाढी केल्याशिवाय बोहल्यावर चढु नये. लग्न समारंभात दाढी राखणे ही फॅशन असू शकते. परंतू समाज हा फॅशनवर नाही तर संस्कारावर उभा आहे. त्यामुळे वराने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी गुळगुळीत दाढी करावी. समाजात दाढी राखण्याची प्रथा नाही. हिंदू संस्कृतीत दाढी राखण्याची प्रथा नाही. त्यामुळे वराला जर घोड्यावर बसायचे असेल तर त्यासा क्लिन शेव्ह करावी लागणार आहे.
प्री वेडिंग शूटला परवानगी नाही
अवास्तव खर्च रोखण्यासाठी आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी वधू आणि वराच्या प्री- वेंटिग शूटवर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला. जेव्हा लग्नााधीच फोटोशुट करतात तेव्हा वधू आणि वर यांच्यासोबत केवळ फोटोग्राफ असतात त्यावेळी अनेक प्रकार गैरप्रकार असंजमस स्थिती तयार होण्याची शक्यता असते.त्यामुळे साखरपुडा तुटल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे प्री-वेडिंगला देखील बंदी घालण्यात आली आहे.
समाज तोडगा काढणार
या बैठकी तेराव्याचं जेवण घालण्याची कुप्रथा देखील बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर समाजातील अनेक लोकांनी यावर पाठींबा दिला. तसेच लग्नानंतर नवरिमित जोडप्यात काही भांडण तंटा झाल्यास समाज त्यावर बैठक घेईन यातील दोन्ही पक्षाशी बोलून तोडगा काढेल.असे वाद कोर्टाबाहेर परस्पर निवाडा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.