हॅकर्सची कुरापत! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक; चॅनलवर काय झळकलं?

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP चा जाहिरात व्हिडिओ दाखवला जात आहे.

हॅकर्सची कुरापत! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक; चॅनलवर काय झळकलं?
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:24 PM

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP चा जाहिरात व्हिडिओ दाखवण्यात येत आहे. युट्यूब वर बनावट खाते उघडून सुप्रीम कोर्टाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या युट्यूब चॅनेलवर नियमित सुनावणी होत असतात. काही काळापूर्वीच कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली. हॅकर्सना रोखण्यात YouTube अपयशी ठरल्याचा रिपल कंपनीचा दावा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या शेवटच्या सुनावणीचा व्हिडिओ हॅकर्सनी प्रायव्हेट केला आणि ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी’च्या $2 बिलियन फाइन ! एक्सआरपी प्राइस प्रेडिक्शन’ या नावाचा एक ब्लँक व्हिडीओ चॅनेलवर लाईव्ह करण्यात आला. हॅकर्सनी या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात दाखवण्यास सुरुवात केली. या चॅनलवर सुप्रीम कोर्टाच्या व्हिडीओंच्या ऐवजी क्रिप्टोशी निगडीत व्हिडीओ दाखवले जात होते.

‘ नक्की काय झालं हे निश्चितपणे आम्हाला समजलेलं नाही, पण वेबसाईटसोबत छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. ‘शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर झालेली ही समस्या उघडकीस आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने ही समस्या सोडवण्यासाठी एनआयसीकडे (National Informatics Centre) मदत मागितली’, असेही त्यांनी नमूद केलं.

हल्ला कसा झाला ?

सुप्रीम कोर्टाचे युट्युब चॅनल नेमके कुठून हॅक करण्यात आलं, याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.

जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.