पलंगावर झोपलेल्या मुलाच्या पँटमध्ये घुसला कोब्रा, प्रायव्हेट पार्टवर दंश अन्..

उत्तर प्रदेशच्या देवासमध्ये घरात झोपलेल्या एका किशोरवयीन मुलाला विषारी साप चावला. साप चावल्याचे समजताच घरात एकच कल्लोळ माजला. कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयातही दाखल केले. पण...

पलंगावर झोपलेल्या मुलाच्या पँटमध्ये घुसला कोब्रा, प्रायव्हेट पार्टवर दंश अन्..
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 10:35 AM

सध्या पावसाळ्याच्या ऋतूत साप चावण्याच्या अनेक घटना समोर येत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील देवासमध्येही घडल्याचे समोर आले आहे. तेथे एका लहान मुलगा घरात पलंगावर झोपलेला असताना अचानक एक कोब्रा आला आणि त्याच्या पँटमध्ये शिरला. त्या सापाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दंश केल्याने तो मुलगा कळवळला. मुलाला साप चावल्याचे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी त्यालाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. मुलाच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनांच मोठा धक्का बसला असून घरात शोकाकुल वातावरण आहे.

ही दुर्दैवी घटना कणकुंड खाटांबा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव चंदन मालवीय असून तो 15 वर्षांचा आहे. बुधवारी रात्री जेवण करून चंदन आपल्या खोलीत झोपायला गेला. पण थोड्या वेळाने त्याच्यासोबत काय घडणार आहे, याची कोणालाही कल्पनाच नव्हती. रात्री उशिरा अचानक चंदनने आरडाओरडा सुरू केला. आपल्या पँटमध्ये साप घसुल्याचे त्याने सांगितले. चंदनचा आरडाओरडा ऐकून त्याचे काक धावत त्याच्याकडे आले.

काकांनी त्याला मदत करत पँटमधून साप काढला आणि त्याला मारून टाकलं. त्यानंतर चंदनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत सापाचे विष शरीरात पसरले होते. यामुळे चंदनचा आधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यामुळे सर्वच शोकाकुल आहेत.

वडील वारले, आई सोडून गेली

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. तर चार महिन्यांपूर्वी चंदनची आई मुलीसह घरातून निघून गेली होती. तेव्हापासून तो त्याच्या मोठ्याकाकांकडे राहत होता. गावातील सरकारी शाळेत नववीत शिकत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रायव्हेट पार्टवर केला दंश

चंदनला चावलेला साप खूपच विषारी होता. त्यामुळेच साप चावल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. अर्थात, कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण तेवढ्यात त्याच्या तोंडातून फेस येत होता. शरीर निळे पडले होते. त्याच्या प्रायव्हेट पार्टला साप चावला होता. त्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.