जनावराची शिकार केली आणि करी बनविली…लाईक्स, कमेंटच्या नादात युट्युबरला झाली जेल
या आरोपींना आता वन विभागाचे कायदे आणि वन्य जीवांची सुरक्षा संदर्भात जनप्रबोधन करण्यास सांगितले आहे. वन संरक्षण कायद्याचे किंवा प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते असे यावेळी वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
युट्युबवर लाईक्स मिळविण्यासाठी नसते धाडस करणे एका तरुणाला महागात पडले आहे. आंध्रप्रदेशच्या पार्वतीपुरम मन्यम जिल्ह्यात एका युट्युबरने एक असा व्हिडीओ बनवून शेअर केला की त्याला जेलची वारी घडली आहे. पोलिसांनी युट्युबर आणि त्याच्या मित्रांना दुर्मिळ जनावराची हत्या केल्याच्या आरोपात अटक केली आहे. आरोपींनी आधी दुर्मिळ जनावराला पकडले आणि नंतर त्याची हत्या केली. त्यानंतर त्या प्राण्याला शिजवून त्याचे मटण खाल्याचा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला होता.
आंध्रप्रदेशच्या पार्वतीपुरम मन्यम जिल्ह्यात बांदीदोरावलसा येथील हे प्रकरण आहे. येथील एक युवक नागेश्वर राव यांचे एक युट्युब चॅनल आहे. वीज विभागात इलेक्ट्रीक ज्युनिअर लाईनमॅनच्या रुपात काम करणाऱ्या नागेश्वर राव याने काही दिवसांपासून युट्युब चॅनल उघडले होते. मान्यम जिल्हा हा एक आदिवासी जिल्हा आहे. त्यामुळे तो आदिवासी क्षेत्रातील शेती, पिकं आणि अन्य विषयांवरील व्हिडीओ बनवून अपलोड करीत असे. त्याला त्याच्या विभागाने नोकरी करीत असताना व्हिडीओ अपलोड करण्यास मनाई केली होती.
नागेश्वर याला एके दिवशी जंगला कोमोडो ड्रॅगनला पाहीले. त्याने त्याचा मित्र नानीबाबू याच्या मदतीने या ड्रॅगनची शिकार केली. त्यानंतर त्या प्राण्याच्या सोबतच सेल्फी घेतली आणि त्याचे मटण बनवतानाची रेसिपी युट्युबरवर टाकली. त्याचे तुकडे केले, मीठ,काळी मिरी आणि मसाले टाकून त्याची करी बनविली आणि खाल्ली. याचा व्हिडीओ त्याने लाईक्स मिळविण्यासाठी टाकला.
स्टे एनिमल फाउंडेशन ऑफ इंडियाची तक्रार
या व्हिडीओला पाहून स्टे एनिमल फाऊंडेश ऑफ इंडीयाने पार्वतीपुरम मान्यम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली.त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागेश्वर राव आणि नानी बाबू यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली.त्यांनी जनावराची हत्या करुन त्याचा व्हिडीओ बनविण्याची कबूली दिली.त्यानंतर दोघा जणांच्या विरोधात वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कारवाई झाली आहे. आरोपी हे शिकलेले तरुण असून देखील त्यांनी हा प्रकार केला आहे हे खुपच दुदैर्वी असल्याचे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.