महिला युट्युबरचा कारनामा, ‘हनी ट्रॅप’ करून व्यापाऱ्याला 80 लाखांनी लुटले, कोण आहे ही युट्युबर?
लाखो फॉलोवर्स असलेल्या युट्युबरच खरा चेहरा समोर आला आहे. एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅप करून तिने 80 लाख उकळले.
मुंबई, एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) फसवणाऱ्या युट्यूबर (Youtuber) नमरा कादिरला (Namra Qadir) पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. तर पती विराट बेनिवाल याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नमराला अटक केली. ज्या प्रकारे या यूट्यूबरने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात अडकविले ते अत्यंत धक्कादायक आहे.
कोण आहे ही युट्युबर?
नमरा कादिर हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध नाव आहे. युट्यूबवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. दिसायला सुंदर असलेल्या या युट्यूनबरचे कारनामे मात्र अत्यंत धक्कयाक आहे. 24 नोव्हेंबर रोजी एका व्यावसायिकाने गुरुग्राममधील सेक्टर-50 पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केल्यावर तिचा खरा चेहरा समोर आला.
नमराने आपल्याकडून 80 लाख रुपये उकळल्याचे व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले. यामध्ये तिचा पती विराट बेनिवालचाही समावेश आहे. दोघांनी त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळले.
व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, “मी कामानिमित्त सोहना रोडच्या रॅडिसन हॉटेलमध्ये नम्रा कादिर नावाच्या मुलीशी भेटलो होतो. ती एक YouTuber आहे, तिचा व्हिडिओ मी पाहिला होता. तिने माझी विराट बैनीवालशीही ओळख करून दिली जो एक YouTuber देखील आहे आणि तिचा मित्र असल्याचे तिने सांगितले. त्यांनी माझ्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी होकार देत दोन लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली.
असे अडकविले प्रेमाच्या जाळ्यात
व्यावसायिकाने सांगितले की, “मी तिला त्याच दिवशी दोन लाख रुपये दिले कारण मी नमराला काही काळापासून ओळखत होतो. नंतर, जेव्हा मी तिच्याकडे जाहिरातीचे काम आणले आणि तिला समजावून सांगितले तेव्हा तिने हो म्हटले आणि आणखी 50,000 रुपये मागितले, जे मी त्याला त्याच्या खात्यात दिले.
त्यानंतर त्याने माझे काम केले नाही. नमरामला म्हणाली की काम फक्त एक निमित्त आहे, ती मला आवडते आणि तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. बहिणीच्या लग्नानंतर ती मला माझे पैसे परत करेल. मला पण ती आवडली आणि आम्ही एकत्र फिरू लागलो. विराट नेहमीच तिच्यासोबत असायचा. एके दिवशी आम्ही क्लबमध्ये पार्टी करायला गेलो असताना नम्रा आणि विराटने मला जबरदस्ती दारू पाजली.
धमकी देऊन 70-80 लाख उकळले
व्यावसायिकाने पुढे सांगितले की, आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि झोपलो. सकाळी उठल्यावर नमराने माझ्याकडे माझे कार्ड मागितले आणि मी पाहतो आणि मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मी नकार दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे सांगितले. मी घाबरलो आणि तिला विनंती केली की, आपण मित्र आहोत आणि मी काही चुकीचे केलेले नाही.
त्यानंतर विराट बनीवालने शस्त्र काढून धमकाविले की तो तिचा नवरा आहे आणि तिला चांगला ओळखतो. मी त्याचे ऐकले नाही तर तो मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवेल. या घटनेनंतर ते जसे म्हणत गेले तसं मी करत गेलो आणि आत्तापर्यंत एकूण 70-80 लाख रुपयांचा माल आणि रोख रक्कम गमावून बसलो. या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.