झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा
मुंबई : ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पॅरेंटल पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी ब्लॉग लिहून याबाबतची माहिती दिली. “कुटुंबाचा सांभाळ करता यावा यासाठी नव्याने पालक होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी 1,000 डॉलरचा (जवळपास 69,262 रुपये) मदत निधी देणार आहे, जेणेकरुन […]
मुंबई : ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पॅरेंटल पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी ब्लॉग लिहून याबाबतची माहिती दिली.
“कुटुंबाचा सांभाळ करता यावा यासाठी नव्याने पालक होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी 1,000 डॉलरचा (जवळपास 69,262 रुपये) मदत निधी देणार आहे, जेणेकरुन ते त्यांच्या बाळाचं या जगात स्वागत करु शकतील”, असं दीपेंद्र गोयल यांनी म्हटलं.
“बाळाचं या जगात स्वागत करण्यासाठी महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या सुट्ट्या ही व्यवस्था असंतुलित नाही”, असंही ते म्हणाले.
पुरुषांनाही ही सुविधा मिळणार
सरकारच्या नियमांनुसार, आम्ही जगभरात आमच्या महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देत आहोत. पुरुष कर्मचाऱ्यांनाही ही सुविध देण्यात येईल. ही सुविधा केवळ बाळाला जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर सेरोगसी, दत्तक घेणे किंवा समलिंगी जोडप्यांनाही लागू होईल.
100 नव्या झोमॅटोचा विस्तार
झोमॅटोने सोमवारी देशातील 100 नव्या शहरांमध्ये विस्तार करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता झोमॅटो देशातील 300 शहरांमध्ये लोकांना अन्न सेवा पुरवणार आहे. यामध्ये भूज, जूनागड, ऋषिकेश, शिमला, अयोध्या आणि बेगुसराय या शहरांचा समावेश आहे.