BLOG : कोरोनाशी लढताना मानसिक स्वास्थ्याची जपवणूक गरजेची

राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूविषयक संस्था बेंगलोर यांच्या एका अहवालानुसार भारतामध्ये कमीत कमी 15 कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सामान्य किंवा गंभीर मानसिक स्वास्थ्याचे आजार आहेत.

BLOG : कोरोनाशी लढताना मानसिक स्वास्थ्याची जपवणूक गरजेची
आरोग्य
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 5:14 AM

सध्या जगभरात कोरोना विषाणूचे अभूतपूर्व संकट आहे. भारतासारख्या विकसनशील देशात बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, डॉक्टर्स, मेडिसिन्स आदींची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतोय. राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूविषयक संस्था बेंगलोर यांच्या एका अहवालानुसार भारतामध्ये कमीत कमी 15 कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सामान्य किंवा गंभीर मानसिक स्वास्थ्याचे आजार आहेत. त्यातील 80 ते 85 टक्के लोकांना कोणतेही मानसिक उपचार मिळत नाहीत. कोरोना काळात यात निश्चितच भर पडली आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे (Adv Deepak Chatap write on Mental health amid Corona infection lockdown).

“माझ्या नोकरी व करिअरचे काय होईल ? कुटुंबातील आर्थिक सुबत्ता नष्ट होईल का?”

माझ्या नोकरी व करिअरचे काय होईल ? कुटुंबातील आर्थिक सुबत्ता नष्ट होईल का? ईएमआय कसे भरू? या जगातून मनुष्याचा विनाश होईल का? कोरोना नंतरचे जग कसे असेल? अशा नानाविध प्रश्नांनी मनात भीतीचे काहूर निर्माण केले आहे. घाबरून (panic) जाण्यापेक्षा सावधगिरी (cautious) महत्त्वाची असते. ज्या बाबी आपल्या हातात नाही त्याकडे आपण अधिकचे लक्ष केंद्रित करतो आणि त्यातून मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होतात.

महामारीची परिस्थिती म्हणजे अल्पविराम असून पूर्णविराम नाही हे समजून घेतले पाहिजे. संकट काळात एखादी जवळची व्यक्ती निवर्तल्याने दुःख होणे स्वाभाविक आहे. उद्भवलेल्या परिस्थितीसाठी दुसऱ्याला अथवा बाह्य घटकांना जबाबदार ठरवल्यास त्यातून नैराश्य येऊ शकते. म्हणूनच ज्या बाबी आपल्या हातात आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा ज्या प्रश्नांवर आपले नियंत्रण नाही त्याकडे दुर्लक्ष करा.

“वय 88, स्कोअर 25, मधुमेह, तरीही कोरोनावर मात”

आपण काय बोलतोय, काय बघतोय काय विचार करतोय आणि काय कृती करतोय या साऱ्याकडे आपले लक्ष असणे महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्याबाबत गंभीर होताना आवश्यकतेनुसार आंतरिक बदल (Paradigm Shift) केला पाहिजे. परवाच वृत्तपत्रात मथळा वाचला की, “वय 88, स्कोअर 25, मधुमेह, तरीही कोरोनावर मात”. एका 100 वर्षे आजीने देखील कोरोनावर मात मिळवली. हे शक्य झाले ते मानसिक इच्छाशक्तीच्या मदतीने. त्यामुळे भीती ऐवजी सावधगिरी आणि नैराश्या ऐवजी मानसिक इच्छाशक्ती वाढवली तर कोव्हिडचा आजार लवकर बरा होण्यास मदत होईल.

अनेक कोविड रुग्ण चिंता, एकटेपणा, सततची काळजी, भीती, नैराश्य, नकारात्मक विचार, अस्वस्थता या मानसिकतेतून बाहेर न निघू शकल्यामुळे खचून जातात आणि मृत्यूला जवळ करताना दिसतात. डॉक्टर्स, पोलीस, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचारी, शेतकरी, वकील, पत्रकार या कोव्हिड योद्ध्यांना मानसिक स्वास्थ्य जपणे निकडीचे झाले आहे.

मानसिक आजाराची कारणे :कुटुंबापासून अलिप्तता, अनिश्चितता, माहिती व संपर्काचा अभाव, सुरक्षा साधने न मिळणे व संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची भीती अधिक कारणांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

मानसिक आजाराची लक्षणे कोणती?

मानसिक आजाराची लक्षणे: अवतीभवतीचे भान न राहता विचारात गर्क होऊन जाणे, कार्यक्षमता पूर्वीपेक्षा कमी होणे, अचानक राग येणे अथवा रडू येणे, मनाचा कल (मुड) जलदगतीने बदलणे, विसरभोळेपणा वाटणे, झोप न लागणे, सतत कशाचीतरी चिंता व भीती ग्रस्त वाटणे, एकटेपणाची भावना येणे, आत्महत्येचे विचार येणे, कशातही मन न लागणे, आपण निरुपयोगी आहोत असे वाटणे, प्रक्षुब्द वर्तन, आत्महत्येचे विचार येणे, चिडचिड करणे, अकारण वाद करणे यातील एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणांमुळे मानसिक आजार उद्भवतो.

ज्याप्रमाणे शारीरिक आजार असेल तर आपण वैद्यकीय सल्ला घेतो त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मानसिक स्वास्थ्याच्या समस्या उद्भवू नये ही सामान्य बाब असून आपण दररोज छोटी छोटी पावले उचलून त्यावर उपचार करू शकतो. जसे की, कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांना सहाय्य करणे व सामायिकरण (शेअरिंग) करणे यालाच इंग्रजीत buddy system विकसित करणे असेही म्हणतात. जर वर्क फ्रॉम सुरू असेल तर जिथून काम करत आहात तिथे टेबल-खुर्ची आधी ऑफिस सारखी रचना करावी, घरगुती कपडे न वापरता ऑफिसचा गणवेश परिधान करून काम करावे.

कामाच्या दरम्यान विश्रांती घ्या. नाडी शुद्धी, चक्रासन, भ्रामरी आदी योगासनं किमान 15 मिनिटे नियमित करावी. मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मते ” आपली दिवसाची दिनचर्या ठरवतांना त्याची विभागणी स्वतःसाठीचा वेळ, कौटुंबिक वेळ, सामाजिक वेळ, प्रसार माध्यम व सोशल मीडियासाठीचा वेळ आणि विरंगुळा यामध्ये विभागणी करावी. त्यानंतर कोणत्या बाबीला किती वेळ द्यायचा ते ठरवा, मग त्यातील कोणत्या गोष्टी हळू मध्यम आवेगाने करावयाचे आहे त्याबाबतची गती ठरवा. छोट्या कृतीतूनच मन व शरीर सुदृढ होत जाईल व कोरोना संकटाला हरवण्याची इच्छाशक्ती वाढेल.

सातत्या शिवाय सवय लागत नाही. त्यामुळेच आपल्याला मानसिक आजारांपासून दूर राहात कोरोनाविषाणू विरोधात लढण्याची इच्छा शक्ती वाढवायची असल्यास छोट्या छोट्या कृतीतून ज्ञान कौशल्य व इच्छा यातील सातत्यातून निर्माण होणाऱ्या सवयीत सकारात्मक बदल घडवणे महत्त्वाचे झाले आहे. पुरेशी झोप लागत नसल्यास योग्य आहार घेतोय का? झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी जेवण करतोय का? सिगारेट, कॉफी, चहा आधी झोपेआधी टाळतोय का? आपला झोपण्याचा बेड आपण जेवण, वाचन वा अन्य कामासाठी देखील वापरतोय का?

यातील एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रश्नांची उत्तर ‘ होय ‘ असे येत असल्यास स्वतः च्या सवयीत बदल घडवला पाहिजे, तरच पुरेशी झोप येईल व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यसनाधीनता मानसिक ताणतणाव व दडपण यातून बाहेर पडायचे असल्यास केवळ गोळ्या घेऊन बरे होता येणार नाही तर त्यासोबतच स्वतःचे विचार, भावना व कृती याकडे लक्ष ठेवत आवश्यकतेनुसार सकारात्मक बदल केले पाहिजे.

मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काय करावे: पुरेशी चांगली झोप घेणे, स्वतःची काळजी घेणे, नियमित योगासने/ व्यायाम करणे, कुटुंब मित्र समाजाच्या संपर्कात राहणे, छंद जोपासणे, कौशल्याचा विकास करणे, पौष्टीक आहार घेणे याबाबी प्रत्येकानी नियमित केल्या पाहिजे.

मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काय टाळावे?

मद्य आणि उत्तेजक पदार्थ व्यसन, सोशल- डिजिटल मीडिया- दूरदर्शन आदींचा जास्त वापर करणे, मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे, नकारात्मक बाबींकडे लक्ष केंद्रित करणे या बाबी प्रत्येकाने टाळल्या पाहिजे.

ओसीडी म्हणजेच ‘ओबसेसिव कम्पल्सिव डीसऑर्डर’ या मानसिक आजारात आपले विचारांवर नियंत्रण राहात नाही. मानसिक दडपण, मानसिक ताण, बायपोलर मूड डीसऑर्डर आधी मनोविकाराने आपल्याला ग्रासलेले असू शकते. म्हणून विकारांना निश्चित असे निदान वा उपचार नाही. अनेक कोरोना रुग्णांचा ऑक्सीजन स्तर नॉर्मल असतो, योग्य वैद्यकीय उपचार देखील सुरू असतात आणि तरी देखील त्यांचा जीव जातोय.

यातून असे दिसते की, बरेच रुग्ण कोरोना पेक्षाही मानसिक स्वास्थ्य उत्तम नसल्याने आणि मानसिक आधार मिळत नसल्याने दगावत आहे. आपल्या अवतीभवती असलेल्या कोरोना रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारे संवाद साधा, त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तेवढा मानसिक आधार द्या. आपल्या कृतीतून अनेक कोरोना रुग्ण सुखरूप बरे होऊ शकतात. त्यामुळे केवळ पाहिजे घटकांना दोष देत राहण्यापेक्षा स्वतः जबाबदार नागरिक म्हणून छोट्या छोट्या कृतीतून मोठा सकारात्मक मानसिक स्वास्थ्याचा बदल घडविण्यास सज्ज व्हा.

आपल्याला परिस्थिती बदलवायची असेल तर सुरुवातीला स्वतः बदल घडवावा लागतो आणि स्वतः बदल घडवायचा असेल तर त्या आधी स्वतःच्या मानसिकतेत बदल घडवावा लागतो असे म्हणतात. प्रत्येक आजार हा वैद्यकीय उपचार आणि केवळ गोळ्या घेऊनच बरा होतो असा नाही, त्यासोबत मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक असते. या अभूतपूर्व संकट परिस्थितीत मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुकता बाळगत एकमेकांना आधार दिला पाहिजे.

मानसोपचार तज्ञांचा सल्ला, निदान आणि उपचार याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रो-ऍक्टिव्ह झालो तर कोरोना संकटावर मात मिळवण्यासाठी मनोबल वाढेल, हे मात्र निश्चित. चला तर मग छोट्या छोट्या कृतीतून मोठा बदल घडवायला सज्ज व्हा. मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा.

– अॅड. दीपक चटप (लेखक हे पाथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेने मानसिक स्वास्थ्य जागृतीची मोहीम सुरू केली आहे) संपर्क क्रमांक : 9130163163

टीप : लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.