जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या IPS वैभव गायकवाडांची प्रेरणादायी गोष्ट

लोकसेवा आयोगा परीक्षा देऊन पोलीस अधीक्षक बनलेला वैभव गायकवाडचा शैक्षणिक प्रवास अगदी सामान्य विद्यार्थ्यासारखा आहे. अभ्यासाचा कोणताही बडेजाव न सांगता तो आपल्या शैक्षणिक कारकीर्दीचा आलेख मांडतो तेव्हा तो आयपीएस झाला यावर विश्वास बसत नाही.

जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या IPS वैभव गायकवाडांची प्रेरणादायी गोष्ट
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 7:13 AM

मुंबईःअहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून आलेला, जिल्हा परिषद शाळेतून (school) शिकलेला आणि ग्रेस मार्क (Mark) नसतानासुद्धा दहावी परीक्षेत 83 टक्के घेऊन प्रथम आलेल्या वैभव गायकवाड याचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास भन्नाट आहे. यासाठी भन्नाट की, शाळेत असताना पहिला नंबरही मिळवला आहे, आणि शाळेतल्या उनाडक्या करत बारावीला त्याला 53 टक्क्यावर समाधानही मानावं लागलं आहे. म्हणून गड्यानं जिद्द सोडली नाही. त्याच जिद्दीच्या जोरावर तो आज खाकी वर्दीत आणि रुबाबात आयपीएस झाला आहे.

लोकसेवा आयोगा परीक्षा देऊन पोलीस अधीक्षक बनलेला वैभव गायकवाडचा शैक्षणिक प्रवास अगदी सामान्य विद्यार्थ्यासारखा आहे. अभ्यासाचा कोणताही बडेजाव न सांगता तो आपल्या शैक्षणिक कारकीर्दीचा आलेख मांडतो तेव्हा तो आयपीएस झाला यावर विश्वास बसत नाही. एवढं तो आपल्या शैक्षणिक वाटचालीची साधी सरळ सोपी व्याख्या सांगतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांचं भाषण ऐकताना एक लक्षात येतं की, प्रयत्न किती प्रामाणिक असतात, ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी कष्ट आणि आपार मेहनत स्वतःशिवाय कुणालाच माहिती नसते हेच ते आपल्या मनोगतातून प्रामाणिकपणे सांगतो.

कष्टाला चार चाँद लागले

वैभव गायकवाड शाळेचा प्रवास सांगताना एक मजेशीर किस्सा सांगतात, ते म्हणतात की दहावीत 83 टक्के गुण पडले पण कॉलेजला गेल्यावर बारावीच्या परीक्षते मात्र 53 टक्क्यावरच समाधान मानावं लागलं. मग कसंबसं अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर मग पुन्हा वर्ग, लेक्चर यांचा प्रवास सुरु झाला. वर्गात न बसणं, लेक्चर चुकवणं हा प्रवास त्यांचा अगदी बॅक बेंचर असल्यासारखा आहे, पण तरीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खेड्यातून येऊन मजल मारणं म्हणजे सहजसोपी गोष्ट नाही. तरीही मग इतर सांगतात म्हणून यूपीएससीचा अभ्यास करतात आणि त्याच्या कष्टाला चार चाँद लागतात.

अभ्यास ही एक कला

अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतरही त्यांनी नियमित वर्गात बसलेत आणि अभ्यास केला असं झालं नाही. हेच ते त्यांच्या भाषणात सांगतात. वैभव गायकवाड म्हणतात, की कॉलेज करताना असा कोणताच माझ्यात वक्तशीरपणा नव्हता, पण यूपीएससी करायचं ठरलं आणि मग ते प्रयत्न करण्यात मागे पडले नाहीत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा किस्सा सांगताना ते अभियांत्रिकीचीही आठवण सांगतात. ते म्हणतात की, मी कधी नियमित लेक्चर केलं नाही. सतत लेक्चर चुकवणं हे ठरलेलं असायचं. कॉलेजच्या दिवसात एकदाच लेक्चरला बसलो, तेही मी वर्गात असताना तास घेण्यासाठी शिक्षक आले मी वर्गात अडकलो. जशा त्यांच्या कॉलेज आणि शाळेच्या आठवणी आहेत तशाच अभियांत्रिकीच्या अभ्यासाच्याही अफाट आठवणी आहेत. ते म्हणतात, मित्रा मित्रांनी दोघांमध्ये एक पुस्तक घेऊन आम्ही अभ्यास केला दिवसा तो आणि रात्री मी किंवा हे उलटं व्हायचं. असा अभ्यास करणं ही एका कलाच आहे, ते त्यांचा मित्र आणि वैभव गायकवाड यांच्या अभ्यासावरुन लक्षात येतं.

घरच्यांनी यूपीएससीचं खूळ डोक्यात घातलं

लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आपण अधिकारी व्हायचं हे त्यांचं खरं स्वप्न नव्हतं, अभियांत्रिकी करुन नोकरी करताना घरच्या माणसांनी आणि मित्रांनी त्यांच्या डोक्यात हे यूपीएससीचं खूळ डोक्यात घातलं. त्यानंतर त्यांना वाटू लागलं की, अरे आयुष्यात बदल पाहिजे तर ती दोन वर्षं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दिली पाहिजे. त्यानंतर आयुष्यातील बदलासाठी म्हणून आणि घरच्यांनी सांगितलं म्हणून परीक्षेच्या तयारीला लागले. अभ्यासासाठी दिल्ली गाठल्यावर ते इंग्रजीची आठवण करुन देताना म्हणतात, की मराठी शाळेची पार्श्वभूमी होती त्यामुळे इंग्रजीतून अभ्यास करताना त्रास हा झालाच पण त्या त्रासामुळेच इंग्रजीची तयारीही चांगली झाली. हिंदू वृत्तपत्र वाचताना त्यातील अडकळणारे शब्द बघण्यासाठी शंभर वेळा डिक्शनरी बघायला लागायची त्यानंतर पेपरमधील लिहून काढलेले शब्द सातत्याने त्यांच्या वाचनात आणि लिहिण्यात येऊ लागले मग इथूनच त्यांच्या इंग्रजी अभ्यासाला खरी सुरुवात झाली आणि आयपीएस होण्याकडे वाटचाल चालू झाली.

मागच्या चुका पुढं टाळत गेलो

अभ्यास सुरु ठेवला असला तरी यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळत असले तरी ते सगळ्यानाच मिळत नाही, हे वैभव गायकवाड ओळखून होता म्हणूनच पहिल्या प्रयत्नात ते नापास झाले. म्हणून त्यांनी जिद्द सोडली नाही दुसऱ्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षेला पुन्हा अपयश पदरात आले. तिसऱ्या प्रयत्नाचा त्यांचा किस्सा वैभव गायकवाड जिगरबाज आहेत म्हणूनच ते सहन करु शकले, कारण तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य आणि मुलाखत देऊनही त्यांचं अंतिम यादीत नाव नव्हतं. या प्रसंगाची आठवण सांगताना ते म्हणतात, की, यादीत नाव नव्हतं तरीही मग मागच्या पेक्षा अधिक, मागच्या परीक्षेत झालेल्या चुका टाळत मी पुढची परीक्षा दिली आहे हे ते अगदी खुल्या दिलाने सांगतात, कारण त्या पाठीमागे आहे तो त्यांचा संघर्ष.

स्वतःवर आत्मविश्वास बाळगा

आज वैभव गायकवाड यांना यश मिळालं असलं तरी ते यश सोपं नव्हतं आणि सहजपणे आलेलंही नव्हतं. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं तेही आयपीएस पद पदरात आलं तेव्हा. आयुष्यात परीक्षा अनेक येतात पण त्यातून खचून जाऊ नका म्हणतात. परीक्षा देतानाचा प्रसंग सांगताना ते म्हणतात की चौथ्या प्रयत्नात यश मिळालं असलं तरी , नापास झालो अपयश आलं म्हणून खचून गेलो नाही. मला हे करायचं हे नक्की करुनच परीक्षा देत राहिलो, म्हणून लोकसेवा आयोगानं त्यांच्या गळ्यात अधिकार पदाची माळ घातली. आपलं मनोगताच्या शेवटच्या टप्प्यात सांगतात, की, यूपीएससी द्यायचं फायनल झालं की, स्वतःवर आत्मविश्वास बाळगा आणि तो कायम ठेवा, परीक्षेच्या अभ्यासात सातत्य ठेवा आणि सगळ्यात मोठा मनावर संयम ठेवा कारण हे क्षेत्रच असं आहे की, यश नाही तर अपयश हे ठरलेलं आहे, म्हणून या परीक्षेत संघर्ष जितका मोठा आहे, तितकच यशही मोठं आहे हे ते अगदी प्रांजळपणे सांगतात.

संबंधित बातम्या

Promise day : ‘या’ सहा वचनांनी वाढवा प्रेमातील गोडवा, मग जोडीदारासोबतचं नातं होईल आणखी घट्ट

Video: गुमराह तो वो है जो घर से निकले नही, चुकीचे निर्णयही का अनमोल असतात ऐका IPS तेजस्वी सातपुतेंकडून !

‘डार्क सर्कल’ने त्रस्त आहात? हा आहे रामबाण उपाय…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.