ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने; उड्डाणपुलावरुन श्रेयवाद, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

| Updated on: Jan 15, 2022 | 10:11 PM

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असली. तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांमध्ये खटके उडाल्याचं या आधीही पाहायला मिळालंय. आता पुन्हा ठाण्यात तशीच झलक पाहायला मिळाली. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवादावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले.

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने; उड्डाणपुलावरुन श्रेयवाद, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Follow us on

मुंबई : राज्यात शिवसेना (Shiv Sena) , काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP)  अशी महाविकास आघाडी असली. तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांमध्ये खटके उडाल्याचं या आधीही पाहायला मिळालंय. आता पुन्हा ठाण्यात तशीच झलक पाहायला मिळाली. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवादावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे ठाण्यातला थेट शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, असा सामना फक्त ठाणेकरांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला कळवा येथील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवादाची अशी काही लढाई झाली, की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थिती कार्यक्रम सुरु होण्याआधीच हा राडा झाला. सुरुवात बॅनरबाजीवरुन झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचेच बॅनर दिसल्यानं, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर पुलावरुन चालत येत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झेंडे हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

आव्हाडही नाराज

अखेर कार्यक्रमस्थळी शिंदे आणि आव्हाड आले, एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोर्कापण सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यामध्ये आव्हाडांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. महापौर किंवा शिवसैनिकांवर राग धरु नका. पक्ष वाढवण्याचा किंवा मिशन ठरवण्याचा तुम्हालाही अधिकार आहे, असं सांगून एकनाथ शिंदेंनी आव्हाडांना यावेळी शांत करण्याचा प्रयत्न केला.

‘कार्यकर्त्यांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात’

श्रेयवादावरुन ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीरपणे खटके उडाले. मात्र शिंदेंना ही छोटं गोष्ट वाटतेय. यावेळी बोलतान शिंदे यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांमध्ये अशा छोट्या-मोठ्या गोष्टी होतच असतात. अशा छोट्या गोष्टी मनावर घेऊन चालत नाही. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तीनही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. ठाण्यातही पुन्हा तेच दिसून आले. या वादानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.

संबंधित बातम्या

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

Up Elections 2022 : उत्तर प्रदेशात भाजपला हरवणे येऱ्यागबाळयाचे काम नाही, आठवलेंना फुल्ल कॉन्फिडन्स

परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?; दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचे मोठे वक्तव्य