Opinion : हैदराबादचा निकाल, शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?

हैदराबादचा निकाल महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेला (Shivsena) धोक्याची घंटा आहे.

Opinion : हैदराबादचा निकाल, शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?
BMC elections
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 11:57 AM

(BMC election 2022) मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या हैदराबाद निवडणुकीचा (hyderabad election result final 2020) अंतिम निकाल हाती आला आहे. 150 जागांच्या महापालिकेत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) सर्वाधिक 56 जागा जिंकल्या. असं असलं तरी गेल्यावेळी 99 जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या टीआरएसला यंदा भाजपने (BJP hyderabad result) मोठा दणका दिला. मागील निवडणुकीत केवळ 4 जागी विजय मिळवणाऱ्या भाजपने यंदाच्या हैदराबाद मनपा निवडणुकीत तब्बल 48 जागा जिंकल्या आहेत. ( Hyderabad result alarm bell for Shiv Sena)

भाजपचा हाच निकाल महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेला (Shivsena) धोक्याची घंटा आहे. कारण जवळपास तीन दशकं मुंबई महापालिकेवर (BMC Election 2022) भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेला भाजपने आधीच थेट आव्हान दिलं आहे. “सेनेचा भेसळ असलेला भगवा उतरवून भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार आहे” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याधीच सांगितलं आहे. (Hyderabad election result, why alarm bell for Shiv Sena?)

हैदराबादचा निकाल, मुंबईत धाकधूक

हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरली होती. एका महापालिका निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री उतरण्याची बहुधा पहिलीच घटना असावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह आजूबाजूच्या राज्यातील महत्त्वाचे भाजप नेते हे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हैदराबादेत तळ ठोकून होते. त्याचीच परिणीती म्हणून भाजपने अवघ्या 4 जागांवरुन तब्बल 48 जागांपर्यंत मजल मारली. भाजपची ही मुसंडी म्हणजे मुंबईतील सत्ताधारी शिवसेनेला थेट इशारा आहे.

फडणवीस-शेलार जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर

देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार ही जोडगोळी महाराष्ट्रात रणनीती आखते हे एव्हाना अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे. मात्र आता त्यांच्या रणनीतीचा फायदा भाजप राष्ट्रीय स्तरावर घेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचं प्रभारीपद भूषवलं, तिथे भाजपने विजय मिळवला. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हैदराबाद मोहिमेवर गेले.

वाचा :  GHMC Election : शेलार-फडणवीस जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर, मनपा जिंकण्याची जय्यत तयारी

बिहारप्रमाणेच हैदराबाद ( Hyderabad Election ) जिंकण्यासाठी भाजपानं जोरदार रणनीती आखली. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणूक 1 डिसेंबरला (hyderabad municipal elections 2020 ) झाली. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी होते. महत्त्वाचं म्हणजे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाला. त्यावरुन या निवडणुकीतील त्यांचं महत्त्व काय असू शकतं याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

Ashish Shelar Hyderabad

हैदराबादेतील मराठी मतं टार्गेट

आशिष शेलार (Ashish Shelar) हे भाजपचे सहप्रभारी म्हणून हैदराबादेत दाखल झाले. त्यांनी हैदराबादमध्ये विजयासाठी कंबर कसली. हैदराबादमधील विविध भागात जाऊन शेलार यांनी मराठी भाषिकांशी संवाद साधला. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती, तर आशिष शेलार यांच्याकडे सहप्रभारी म्हणून कार्यभार सोपवला होता.

वाचा : आशिष शेलारांनी कंबर कसली, हैदराबादेतील मराठी मतं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न

हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं?

हैदराबाद महापालिकेच्या 150 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने 56, भाजपः 48, एमआयएमः 44 आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या. हैदराबाद जिंकण्यासाठी भाजपने सर्वशक्ती पणाला लावली. प्रत्येक प्रभागात जाऊन मायक्रो प्लॅनिंग केलं. महत्त्वाच्या नेत्यांच्या नेतृत्त्वात टीम बनवून प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. त्यामुळेच भाजपने 4 वरुन 48 पर्यंत मजल मारली.

हैदराबाद निवडणूक निकाल 2020 (hyderabad election result final 2020)

  • तेलंगणा राष्ट्र समितीः 56
  • भाजपः 48
  • एमआयएमः 44
  • काँग्रेस: 2
  • एकूण जागाः 150

हैदराबादचं भाग्यनगर करण्याची घोषणा

या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी हैदराबादेत रोड शो केले. इतकंच नाही तर हैदराबादचं भाग्यनगर करण्यासाठी आलो आहोत, अशी घोषणा करुन, आदित्यनाथांनी आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी पाहायला मिळाली.

मागील निवडणुकीत काय झालं होतं?

यापूर्वी 2015 च्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तब्बल 99 जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी MIM 44 जागांसह दुसऱ्या आणि भाजप 4 जागांसह तिसऱ्या स्थानावर होती. मागील निवडणुकीतही काँग्रेसला 2 जागाच होत्या.

2015 मधील हैदराबाद निवडणुकीचा निकाल

  • तेलंगणा राष्ट्र समितीः 99
  • एमआयएमः 44
  • भाजपः 4
  • काँग्रेस: 2
  • एकूण जागाः 150

शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?

हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षापूर्वी केवळ 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत 48 जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरु शकतात, तर आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरु शकतं याचा अंदाज बांधता येईल.

फडणवीस-शेलारांची रणनीती

जे देवेंद्र फडणवीस बिहार आणि हैदाराबादच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरु शकतात, ते मुंबई महापालिका निवडणुकीत पायाला भिंगरी बांधणार हे निश्चित आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस दुसरीकडे आशिष शेलार आणि नव्याने जबाबादीर सोपवलेले अतुल भातखळकर अशी भाजपची फौज ग्राऊंडवर असेल. त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रातील 105 आमदार, भाजपचे खासदार, आजूबाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, अमित शाह, योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा हे असतीलच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर आश्चर्य वाटायला नको.

वाचा : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती 

मुंबईत कोणाचं बळ किती?

मुंबई महापालिका निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. मागील निवडणुकीत म्हणजेच 2017 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. शिवसेना आणि भाजपने प्रचाराची कोणती पातळी गाठली होती हे साऱ्या देशाने पाहिलं होतं. त्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला भाजपने घाम फोडला होता. त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी शिवसेनेला 84 तर भाजपला तब्बल 82 जागा मिळाल्या होत्या.

त्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सेना-भाजप वेगळे लढले असले तरी त्यावेळी शिवसेना राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत होती. त्यामुळे सरकार कोसळण्याच्या भीतीने भाजपने एक पाऊल मागे घेत महापौर निवडणुकीत बाजूला राहून, महापौरपद शिवसेनेलाच दिलं होतं.

सध्या कुणाची ताकद किती?

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. शिवसेनेचं संख्याबळ हे 92 पर्यंत पोहोचलं आहे. अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचं संख्याबळ वाढलं आहे. शिवसेना राज्यात सत्तेत आहे हे त्यांची जमेची बाजू आहे. मात्र सत्ता गेल्यामुळे आणि धोका दिल्याच्या भावनेने भाजप नेते चवताळून उठले आहेत. त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत भाजपकडून कोणकोणती ‘ताकद’ वापरली जाऊ शकते याची झलक हैदराबादेतून पाहायला मिळालीय.

सेनेचा भगवा उतरवण्याचा निर्धार

काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली होती. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार, अशी घोषणा केली. “आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला आहे” असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केला होता.

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला.

अतुल भातखळकरांकडे जबाबदारी 

फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने, प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची निवड केली आहे. “आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू”, असा निर्धार भातखळकरांनी केला आहे.

वाचा :  ठाकरे सरकारचा माज उतरवणार; मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार  

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल 

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1
  • एकूण – 227

(Hyderabad election result, why alarm bell for Shiv Sena?)

संबंधित बातम्या 

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना   

एकदा भाजपला संधी द्या, हैदराबादमधील सगळी बेकायदेशीर कामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही : अमित शाह 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.