नवी दिल्ली : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी केंद्र सरकारनं (Central Government) कोरोना रुग्णांसाठी काही सूचना (Corona Guidelines) जारी केल्या आहेत. ज्या लोकांना कोरोना झाला आहे आणि ते सध्या घरीच उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी केंद्रानं जारी केलेल्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत.
कोविडच्या रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही, तर तो आठव्या दिवसापासून तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. म्हणजे जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील, आणि त्यापैकी सलग 3 दिवस तुम्हाला ताप आलेला नसेल, तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मानलं जाईल.
दुसरी महत्वाची सूचना ही ऑक्सिजन पातळीबाबत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची पातळी 95 हून खाली गेली तरी अनेकांना भीती वाटायची. मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार जर कोरोना बाधिताची ऑक्सिजन पातळी ही 93 पर्यंत जरी खाली गेली, तरी चिंतेची गरज नाही. म्हणजे तुम्हाला श्वसनाचा त्रास नसेल, आणि घरातल्या बंद खोलीत तुमची ऑक्सिजन पातळी 93 वर गेली असेल, तरी ती सामान्य पातळी म्हणून समजली जाईल. याचा अर्थ अश्या रुग्णाची सुद्धा
सौम्य लक्षणं असलेला रुग्ण म्हणून नोंद होईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी घरात आयसोलेट होण्याचा काळ 15 दिवसांचा होता. त्या पंधरा दिवसानंतर अनेकांना कोरोना चाचणी करावी लागत होती. जर ती चाचणी निगेटिव्ह आली, तरच त्या रुग्णाची नोंद कोरोनामुक्त म्हणून होत होती. मात्र यावेळी होम आयसोलेशन कार्यकाळ फक्त 7 दिवसांचा करण्यात आला आहे. त्यातही सलग 3 दिवस ताप आला नाही, तर आठव्या दिवसांपासून तुम्हाला पुन्हा कोरोना चाचणी बंधनकारक असणार नाही.
केंद्राच्या कोरोना गाईडलाईन्समध्ये इतकी शिथीलता देण्यामागचं कारण ओमिक्रॉन व्हेरियंट आहे. एका माहितीनुसार सध्या देशात रोज जितके रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी 60 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे आहेत. आतापर्यंतच्या बहुतांश ओमिक्रॉन बाधितांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळेच गाईडलाईन्समध्येही शिथिलता देण्यात आली आहे.
इतर बातम्या :