सलग 50 वर्षे संसद गाजवून विक्रम नोंदविणारा नेता म्हणजे ‘जगजीवन राम’;पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असूनही अन्याय…

जगजीवन राम म्हणजे भारतातील एक असा नेता ज्याच्या नावावर संसदेत सलग 50 वर्षे जाण्याचा जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. जो असा नेता की, भारतातील दलित, शोषित आणि वंचित समाजातून येऊनही राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा लाभलेली. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून ते स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या पहिल्यावहिल्या सरकारमध्ये महत्वाची खाती सांभाळली. संरक्षण मंत्री असताना 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. आणि यांच्याच कार्यकाळात बांगलादेशाची निर्मितीही झाली, मात्र या दिग्गज नेत्याला भारतरत्न पुरस्कारापासून कायमच वंचित राहावे लागले.

सलग 50 वर्षे संसद गाजवून विक्रम नोंदविणारा नेता म्हणजे 'जगजीवन राम';पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असूनही अन्याय...
जगजीवन रामImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:13 AM

मुंबईः भारतातील एक असा नेता ज्याच्या नावावर संसदेत सलग 50 वर्षे जाण्याचा जागतिक विक्रम (World record) नोंदविला गेला. तो असा नेता होता की, भारतातील दलित, शोषित आणि वंचित समाजातील प्रतिष्ठा लाभलेला एक मोठा चेहराही होता. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून ते स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारामध्ये त्यांनी कायमच महत्वाची भूमिका बजावली. ते संरक्षण मंत्री (Minister of Defense) असताना भारताने 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री अशी महत्वाची खाती सांभाळूनही ज्यावेळी ते पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार ठरु लागले तेव्हा मात्र काँग्रेसच्याच बड्या नेत्यांनी त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आणि कालांतराने त्यांचे राजकारण संपवण्याचाही विचार केला. भारतीय राजकारणात वेगळा ठसा उमठविलेल्या या दिग्गज नेत्याला भारतरत्न पुरस्कारापासून मात्र कायमच वंचित राहावे लागले. तो नेता म्हणजेत जगजीवन राम (Jagjivan Ram), आज त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने…

जगजीवन राम ज्यावेळी आपल्या कुटुंबियांसोबत जगन्नाथ मंदिरात गेले, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, आपण मंदिरात जाऊ शकता कारण तुम्ही मोठे नेते आहात, मात्र आपली पत्नी आणि तुमच्यासोबत असलेले बाकीचे लोक मंदिरात प्रवेश करु शकत नाहीत, कारण दलितांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. त्यावेळी त्यांनी मंदिरात जाणे टाळले. उत्तर प्रदेशाच ते ज्यावेळी मुख्यमंत्री राहिले होते, त्यावेळी त्यांनी संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते, त्यानंतर तेथील पारंपरिक लोकांनी त्या पुतळ्याला गंगाजलाची अंघोळ घातली होती. त्यानंतर ते जेव्हा जम्मूमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आणि ती त्यांची व्यथाही होती, ते म्हणाले की, ‘रोटी और बेटी बराबरी में मिलती है, बिरादरी में नहीं’. आणि हिच खरी भारतातील दाहकता होती. हे सगळं ज्यांच्या वाट्याला आलं त्या नेत्याचं नाव आहे, जगजीनव राम. 5 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असतो.

शाळेतील व्यथा आणि व्यवस्था मांडली

जगजीवन राम यांचा जन्म बिहारमध्ये 5 एप्रिल 1908 मध्ये आरामध्ये झाला. आरा म्हणजे तेच आरा ज्याच्या नावावरुन अनारकली ऑफ आरा हा चित्रपट आला होता. जगजीवन राम यांचे वडील ब्रिटीश सैन्य दलात होते, त्यानंतर ते शेतीकडे वळले. मात्र त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही, सैन्यदलातून शेती करत असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला. जगजीवन राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे प्रचंड झाले आहे. या काळात जगजीवन राम हे त्याकाळात इंग्लिश मीडियममध्ये शिकत होते. मात्र शालेय जीवनात त्यांना जातियतेचे आणि अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. जगजीवन शाळेत असताना दलितांना पाणी पिण्यासाठी वेगळे ग्लास, पाण्याचे साहित्य ठेवले जात होते. शाळांमधून हिच परिस्थिती होती, त्यावेळी मदन मोहन मालवीय त्यांच्या शाळेत आले होते, त्यावेळी जगजीवन राम यांनी शाळेतील व्यथा त्यांना सांगितली. जगजीवन राम यांची व्यथा ऐकून त्यांना बनारस हिंदू विद्यापीठात येण्याचे आमंत्रण देण्यात आले.

मदन मोहन मालवीयाचे विद्यापीठात आमंत्रण

मदन मोहन मालवीय यांच्या अमंत्रणावरुन जगजीवन हे बनारस विद्यापीठीत शिकायला गेलेही मात्र तेथेही त्यांना जातियतेचे चटके सहन करावे लागलेच. बनारस हिंदू विद्यापीठातील त्यांना आलेला जातियतेचा अनुभवच त्यांना नास्तिकतेकडे घेऊन गेला. त्यावेळी ते म्हणायचे की, हा असा कसा देव आहे, एक दुसऱ्यामध्ये असा भेदभाव करतो. बनारस विद्यापीठात त्यांनी जास्त काळ राहिले नाहीत. त्यानंतर ते कोलकत्ता विद्यापीठात शिकायला गेले. कोलकत्ता विद्यापीठातच त्यांना अस जातीभेदाविरुद्ध काम करण्याची संधी मिळाली. कोलकत्ता विद्यापीठात असतानाच त्यांची ओळख सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर झाली, आणि त्यांना महात्मा गांधींच्या चळवळीला येथे समजून घेता आले. सुभाषचंद्र बोस यांनी 1929 मध्ये कामगार रॅली काढली, त्यावेळी त्या रॅलीत जगजीवन राम यांचा महत्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर जेव्हा 1934 मध्ये जेव्हा नेपाळ आणि बिहारमध्ये भूकंप झाला त्यावेळी जगजीवन राम यांनी केलेली मदत आणि त्यांच्या कामाची खूप चर्चा झाली.

राज्यात सरकार स्थापन करण्याचा कायदा

आणि त्याचा फायदा त्यांना झाला तो 1935 मध्ये जेव्हा भारत सरकारने प्रत्येक राज्यात सरकार स्थापन करण्याचा जो कायदा केला त्याचा त्यांच्या पुढील कारकीर्दीस फायदा झाला. कायदा आला आणि त्यानुसार केंद्र आणि राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रथा सुरू झाली.

विधानसभेवर बिनविरोध

त्यानंतर 1936 मध्ये, वयाच्या 28 व्या वर्षी जगजीवन राम यांना बिहार विधान परिषदेसाठी त्यांचे नाव सूचित करण्यात आले. आणि 1937 मध्ये, डिप्रेस्ड क्लासेस लीगचे नेते म्हणून ते शहााबाद ग्रामीणमधून बिहार विधानसभेवर बिनविरोध निवडून गेले. एवढेच नाही तर त्या निवडणुकीत या पक्षाचे 14 आमदार भरघोस मतांनी विजयीही झाले. या घटनेमुळे ते बिहारचे मोठे नेते झाले आणि त्यानंतर काही दिवसातच काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडण्याचे काम केले.

आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला

त्या काळात भीमराव रामजी आंबेडकर नावाची गोष्ट काँग्रेससाठी मोठे आव्हान म्हणून होते. दलित, शोषित आणि वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक करुन त्यांनी त्यांच्यासाठी काम केले होते. त्या काळात ज्या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित, वंचित समाजाला ज्या प्रकारे समजून घेत होते, त्याप्रकारे त्या काळात कोणताही नेता असं समजून घेत नव्हते. त्यामुळे समाजातील एक मोठा वर्ग त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता होती. यामुळेच राजकारण खूप मजेशीर आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. कारण दलित-शोषित समाजाचे गंभीर प्रश्न एका बाजूला, स्वातंत्र्य चळवळ दुसऱ्या बाजूला आणि परस्पर राजकारण एका बाजूला होते. या परिस्थितीत मात्र जगजीवन राम यांनी सिंचनावरील कर, अंदमानमधील राजकीय कैदी आणि दुसरे महायुद्ध हे मुद्दे घेऊन त्यांनी त्या काळात बड्या नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.

हिंदू महासभेतच केली मागणी

त्याच वेळी ते ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगच्या स्थापनेत पुढे आले. तेव्हा एक महत्वाची घटनाही घडली. जातीयवादी राजकारण करणाऱ्या हिंदू महासभेच्या एका अधिवेशनात जगजीवन राम यांनी दलितांसाठीही मंदिरे आणि विहिरी उघडण्याचा प्रस्ताव मांडला. हा मोठा कार्यक्रम होता. त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नावर प्रचंड टीका केली, त्याच काळात जगजीवन राम यांनी आपल्या पदाचा वापर करुन विरोधी बाकावरच्या लोकांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी मंदिरे आणि विहिरी खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडला.

कमी वयातच मंत्री

याच काळात भारत छोडो आंदोलन सुरु झाले आणि अनेक नेत्यांसोबतच जगजीवन राम यांना तुरुंगात जावे लागले, मात्र त्या तुरुंगावासानंतर एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी घडली, की 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांचे सरकार बनले. नेहरु सरकारच्या काळात जगजीवन राम कमी वयातच मंत्री झाले. नेहरुंच्या मंत्रीमंडळात त्यांना कामगार मंत्री पद त्यांना देण्यात आले. त्यानंतर कामगारांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन कामगारांसाठी स्वतंत्र कायदे तयार करण्याचे काम सुरु झाले. इतिहासात असं खूप कमी वेळा घडलं आहे जे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहे. कारण कम्युनिस्टांचे नेते आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेत्यांनीही कामगारांसाठी झोकून देऊन काम केले. मात्र पगार, विमा आणि बोनस आणि कामगारांच्या इतर समस्यासंबंधित कायदे बनवण्याचे श्रेय मात्र एका दलित नेत्याला जाते. आणि त्याच्या समाजाचा कामगार हा एक अविभाज्य भाग होता, आणि हे काम म्हणजे लोकशाहीचे एक सौंदर्य होते. त्यानंतर पुढे जगजीवन राम यांची आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या अध्यक्षपदीही निवड झाली.

विमान अपघातातही सहीसलामत

पंडित नेहरुंच्या मंत्रीमंडळात त्यानंतर दळणवळण, वाहतूक आणि रेल्वे मंत्रीही ते झाले होते. 16 जुलै 1947 रोजी ते जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेतून परतत असताना इराकमधील बसराजवळ त्यांचे विमान कोसळले, तो अपघात इतका भयानक होता की, विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर जगजीवन राम मात्र त्या अपघातातून वाचून परतले होते. 1952 मध्ये त्यांनी सासाराममधून निवडणूक लढवली होती. पूर्वीही येथून लढाई होत असे, परंतु त्यास पूर्व शहााबाद असे म्हणत. येथून ते मरेपर्यंत खासदार राहिले.

भारतात हरितक्रांतीही झाली

राजकारणात आपल्या कामाने ठसा उमटविल्यानंतर ते भारताच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सक्रिय झाले, मात्र त्यावेळी 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्या मंत्री मंडळातही जगजीवन राम मंत्री झाले. त्यांचा मंत्री पदाचा प्रवासही थक्क करुन सोडणारा होता, कारण त्यांनी आपल्या कामावर राजकारणात आपले स्थान निर्माण केले होते. आधी ते कामगार, रोजगार, नंतर अन्न आणि कृषी मंत्री झाले. आणि याच काळात भारतात हरितक्रांतीही झाली. कृषी क्षेत्रातील ही भरारी जगजीवन राम यांचेच हे यश होते. 1969 मध्ये काँग्रेस फुटली आणि जगजीवन राम इंदिरा गांधींसोबत गेले. त्यानंतर इंदिराजी गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षही केले. याच काळात ते संरक्षण मंत्री झाले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांना जे स्थान होते, ते आज नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अमित शहांचे आहे, असे म्हटले जात होते. त्याच वेळी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, म्हणून भारताच्या इतिहासात संरक्षणमंत्री म्हणून जगजीवन राम यांची ही मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे.

बांगलादेशकडून जगजीवन यांचा गौरव

जगजीवन राम यांच्या कामाची दखल म्हणून बांगलादेशने आपल्या स्वातंत्र्याच्या 41 वर्षांनंतर भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम मोठ्या मनाने त्यांचा गौरव केला होता. भारत आणि बांगलादेशच्या लष्कराची संयुक्त कमांड तयार झाली होती त्यानंतरच अंतिम लढाई झाली आणि त्यातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली, हा त्यांचा पराक्रम आजही बांगलादेश आणि भारतातही सांगितला जातो.

जगजीवनःएक बडा नेता

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी पुकारल्यानंतरच्या काळात जगजीवन राम यांना पुन्हा कृषी मंत्री पद देण्यात आले. पण आणीबाणीच्या काळात राजकारणाची दिशा बदलली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जगजीवन राम यांनी त्यांचा काँग्रेस फॉर डेमोक्रसी हा पक्ष स्थापन केला. जनता पक्षाची साथ सोडली. जनता पक्षाला ज्या काँग्रेसची सर्वात जास्त भीती वाटत होती त्या काँग्रेसमधील एक बडा नेता जगजीवन राम त्यांच्यासोबत होता. जानेवारी 1977 मध्ये मार्च महिन्यात निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली, आणि जनता पक्षाच्या नेत्यांची निराशा झाली. मात्र या काळात त्यांच्याबाबतीत एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जगजीवनराम त्यांच्या पक्षात येताच त्यांच्यात पुन्हा जीव संचारला कारण एक मोठी व्होट बँक त्यांच्यासोबत आली होती.

बाबुने बॉबीला हरवले

इंदिरा गांधींसाठी हा मोठा धक्का होता, निवडणुकीच्या काही दिवस आधी जगजीवन राम यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर जनतेसमोर भाषण केले. त्यावेळी खूप लोक येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्या त्यांच्या सभेसाठी त्यानंतर एक राजकीय खेळी खेळली गेली ती म्हणजे इंदिरा गांधी यांनी ऋषी कपूर यांचा बॉबी नुकताच प्रदर्शित झालेला नवा चित्रपट दूरदर्शनवर लावला होता. कारण नवा चित्रपट दूरदर्शनवर येणं ही नवी गोष्ट होती म्हणून चित्रपट पाहण्यासाठी जनता घरीच थांबतील असा एक ढोबळ अनुमान लावण्यात आले होते.

पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा

ठरल्याप्रमाणे निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जनता पक्षाचा विजय झाला, त्यानंतर मोरारजी देसाई नवे पंतप्रधान झाले तर जगजीवन राम उपपंतप्रधान झाले. या काळातील राजकारणात पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते ते जगजीवन राम हेच. मात्र त्यामध्ये वेगळे राजकारण खेळले गेले. दलित चेहरा असल्याने जगजीवन राम यांचे पंतप्रधान होणे भारताच्या लोकशाहीसाठी आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. म्हणूनच 27 मार्च 1977 रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात ते सहभागी झाले नाहीत. पण जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरून ते नंतर सरकारमध्ये स्वतः सहभागी झाले, आणि त्यांना पुन्हा संरक्षण मंत्री पद देण्यात आले. हे असे झाले असले तरी जनता पक्षाचा प्रयोग फसला होता. जगजीवन राम यांनी त्यांना सोडून काँग्रेस जे नावाचा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता.

 मुलगी मीरा कुमारःलोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

1986 मध्ये जगजीवन राम यांचे निधन झाले. तोपर्यंत त्यांनी सलग 50 वर्षे संसदेत राहण्याचा विश्वविक्रम केला. त्यांचा वारसा फक्त बिहारच्या सासाराम जिल्ह्यात आहे, त्यांची मुलगी मीरा कुमार तिथूनच राजकारण करतात. 2009 मध्ये, त्या भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. 1978 मध्ये सूर्या मासिकात ज्या वेळी त्यांच्या मुलाचा आणि एका मुलीचा नग्न अवस्थेतील फोटो छापून आला आणि त्यांच्या राजकारणाला एक उतरती कळा लागली. त्यांच्या मुलाचा ज्या मासिकात फोटो छापून आला होता, त्या मासिकाची मालकी ही संजय गांधी यांची पत्नी मेनका गांधी यांच्याकडे होती.

मुलाच्या फोटोने राजकारणाला उतरती कळा

असंही म्हटलं जातं की, जगजीवन राम यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीच त्यांच्या विरोधकांनी हे काम केले होते. ज्या मुलीचा आणि त्यांच्या मुलाचा जो नग्न अवस्थेतील फोटो छापून आला त्याची फक्त चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुरेश आणि सुषमा या दोघांनी पुढे जाऊन विवाहही केला. या प्रकरणात अनेक राजकारणी, शस्त्र विक्रेते, प्रसारमाध्यमांची नावे समोर आली होती. सुरेश त्यावेळी मर्सिडीज बेंझने प्रवास करत होता असं सांगितलं जाते. जगजीवन राम यांनी 1937 पासून काँग्रेसचे प्रत्येक पद भूषवले आहे 1940 ते 1977 पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्यही होते. त्यानंतर 1950 ते 1977 पर्यंत त्यांनी केंद्रीय संसदीय मंडळात काम केले होते, ही काँग्रेस पक्षासाठी ही मोठी गोष्ट होती. त्याहूनही मोठी गोष्ट ही की जगजीवन राम हे नेहरूंच्या प्रचंड बहुमतातून मोरारजी देसाईंच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते.

सगळे विक्रम पार केले गेले

आज प्रचंड बहुमतासाठी नरेंद्र मोदी आणि आघाडी सरकारसाठी अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक केले जाते पण जगजीवन राम यांनी हे खूप वर्षापूर्वीच केले होते. त्या काळात त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार केले नसल्यामुळे काँग्रेसने आधीच आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली होती. त्यानंतर त्यांनी ज्या पक्षाला साथ दिली त्या जनता पक्षानेही तेच केले. त्या काळात ते पंतप्रधान झाले असते तर देशातील एका मोठ्या वर्गाचा आत्मविश्वास आणखी वाढला असता. पण ज्या नेत्याने संसदेतील अनेक खाती हाताळली, काम करताना देशहित जपले, ज्या माणसाने देशाच्या संसदेसाठी 50 वर्षे काम केले अशा जनमाणसातील नेत्याला मात्र भारतरत्न पुरस्कारापासून कायमच वंचित ठेवण्यात आले.

संबंधित बातम्या

राज ठाकरे यांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्याची सोशल मिडियावर भावूक पोस्ट

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना वेग, कामाच्या चित्रफिती सादर करणे कंत्राटदारांना बंधनकारक

भाजपच्या काळात मंदिराच्या अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.