नामांतर चळवळीतील एक ठळक नाव म्हणजे प्रा. जोगेंद्र कवाडे; ऐतिहासिक लाँग मार्चचे प्रणेते
दलित, वंचित, आदिवासी आणि मागास महिलावर्गासाठी त्यांनी काम केले असले तरी त्यांनी येथील शिक्षणव्यवस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी आंदोलनाचा आवाज त्यांनी कायमच बुलंद ठेवला.
मुंबईः डोक्यावर पांढरे केस, भरगच्च दाढी, अंगात निळ्या रंगांचा कोट आणि खांद्यावर चॉकलेटी अशी लांब शाल आणि भर सभेत खड्या आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांचे संदर्भ देत, सामाजिक चळवळीचा जे इतिहास मांडतात ते म्हणेज प्रा. जोगेंद्र कवाडे. (Jogendra Kawade) त्यांच्या सभेत ते माईक समोर बोलताना ते एक शेअर सादर करतात, त्यात ते म्हणतात, अरे मरणाची भीती कुणाला आहे, हम तो कफन लेके घुमते है असं म्हणून ते जेव्हा आपल्या भाषणाला सुरुवात करतात, तेव्हा महाराष्ट्रातील चळवळींचा इतिहास जागा झालेला असतो. मराठवाडा नामांतर आंदोलनामध्ये (Marathwada Namantar Andolan) ज्यांचा सक्रियच असा नाही तर त्या ऐतिहासिक लाँग मार्चचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त…
महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे प्रा. जोगेंद्र कवाडे. प्रा. जोगेंद्र कवाडे असं जरी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येत असला तरी ते विविधांगाने महाराष्ट्राला परिचित आहेत. प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी आणि समाजसेवक अशा जबाबदार पार पाडत असताना त्यांनी त्यांच्या अंगभूत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला समाजापासून आणि स्वतःपासून कधी दूर ठेवले नाही. म्हणून ज्या ज्या वेळी राज्यात कधी, कुठे अन्याय, अत्याचार झाला तर न्यायाची हाक दिली जाते ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या खड्या आवाजातून.
राजकीय चळवळीतही ते सक्रीय
प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा जन्म 1 एप्रिल 1943 रोजी नागपूर येथे झाला. बौद्ध धर्मीय असणाऱ्या कवाडे यांनी सामाजिक चळवळीबरोबरच राजकीय चळवळीतही ते सक्रीय होते. समाजकारण आणि राजकारणात ते जेव्हा पासून सक्रीय झाले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका काय आहे ते त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. प्राध्यापक असणाऱ्या कवाडे यांनी पीपल्स रिपब्लिक पक्षाची त्यांनी स्थापना करुन राजकारणात आपली स्वतंत्र बाजू आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केला.
नामांतर आंदोलनात सक्रीय
पीपल्स रिपब्लिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ते राहिल्याने त्यांनी चिमूर लोकसभा मतदार संघातून 12 व्या लोकसभेवर ते निवडून गेले होते. तर महाराष्ट्र विधान परिषदेवर ते 2014 मध्ये ते निवडून गेले होते. राजकारणात येण्याआधीच त्यांनी आपली सामाजिक बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून त्यांनी जो नामांतरासाठी ऐतिहासिक लाँगमार्च काढला त्याचे ते प्रणेते राहिले आहे. नामांतर चळवळीच्या घटनेत कवाडे नेहमीच सक्रीय राहिले आहेत. म्हणून ज्या ज्यावेळी नामांतर चळवळीचा इतिहास सांगितला जातो त्यामध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे यांचं नाव आधी असते.
आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी
प्रा. जोगेंद्र कवाडे हे उच्च विद्या विभूषित, त्यांनी एम.कॉम ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही वर्षे शिक्षण क्षेत्रात घालवली आहेत. एम. कॉम पदवीधर असणाऱ्या जोगेंद्र कवाडे यांनी आपले आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठीच म्हणून दिले. सामाजिक चळवळीत त्यांनी काम करत असताना आंबेडकरवादी हीच भूमिका त्यांनी आपली कायम ठेवली.
विद्यार्थी आंदोलनाचा आवाज
दलित, वंचित, आदिवासी आणि मागास महिलावर्गासाठी त्यांनी काम केले असले तरी त्यांनी येथील शिक्षणव्यवस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी आंदोलनाचा आवाज त्यांनी कायमच बुलंद ठेवला. दलित समाजातील स्त्रिया, त्यांचे प्रश्न, दलित साहित्य, साहित्यात होणारे प्रयोग, वाड्.मयीन कार्यातही त्यांनी सक्रीय पाठबळ दिले आहे.
बुलंद आवाजाचे कवाडे सर
मागास आणि दलित समाजातील समस्या आणि चिंता देशातील नागरिकांना समजू देत यासाठी त्यांनी जय भीम या मराठी साप्ताहिकाचे संपादक, प्रकाशक म्हणून वेगळी बाजू मांडली आहे. त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम केले असले तरी त्यांनी आपला आवाज बुलुंद ठेवण्यासाठी अनेक वृत्तपत्र आणि मासिकांतून आपली बाजू मांडत राहिले आहे.
कवाडे सिर्फ नाम काफी है
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा मागास समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तेव्हापासून त्यांनी दलित चळवळीसाठी योगदान देत राहिले आहेत.1976 मध्ये जेव्हा नवबौद्ध समाजातील नागरिकांसाठी त्यांनी जेव्हा सवलतींसाठी आंदोलन केले त्या आंदोलनानंतर त्यांना तिहार जेलमध्ये दहा दिवसाचा कारावास भोगावा लागला होता. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जोगेंद्र कवाडे यांनी हजारो आंबेडकरवादी युवकांना एकत्र घेऊन त्यांनी दीक्षाभूमी (नागपूर) ते औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला होता. त्यांनी त्याकाळी छेडलेल्या आंदोलनामुळे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची दखल महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागली होती.
सत्तेच्या राजकारणाची गणित
जोगेंद्र कवाडे हे राजकारणातही सक्रिय असले तरी त्यांनी सामाजिक चळवळीचा वसा सोडला नाही, आणि सत्तेच्या राजकारणाची गणित घालत त्यांनी चिमूर लोकसभा मतदार संघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावरच ते निवडून आले होते. त्यानंतर त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन हाच पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक राहिला होता. कालांतराने पक्षाचे मतभेत चव्हाट्यावर आले तरी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आपली सामाजिकतेची नाळ तुटू दिली नाही.
संबंधित बातम्या
Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा
अविश्वास ठरावाबद्दल इमरान खान म्हणतात, शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार; पण राजीनामा देणार नाही
पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता गेल्यास पंतप्रधान कोण? शाहबाज शरीफ यांचं नाव आघाडीवर