Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mother’s Day: निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी माया म्हणजे आई…तिच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ‘मदर्स डे’

आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मातृदिन अख्या जगात साजरा केला जातो. मात्र सगळ्या जगात एकाच दिवसात मातृदिन साजरा केला जातो असं नाही. कधी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात.

Mother's Day: निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी माया म्हणजे आई...तिच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच 'मदर्स डे'
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:13 AM

मुंबईः ज्यांना ज्यांच्या कामासाठी, योगादानासाठी कायम दुर्लक्ष केले जाते, अशा मातांचा सन्मान आणि गौरव करणारा दिवस म्हणजे ‘मदर्स डे.’ (Mothers Day) मदर्स डे असला की, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या निस्वार्थी योगदानाचा (selfless contribution) हा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस. या दिवशी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस. मराठीत फ. मु. शिंदे नावाच्या कवीने आपल्या आई कवितेत आईचं ममत्व सांगताना, म्हटलं आहे आई (Mother) एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. या दोनच ओळीतून त्यांनी आईचं ममत्व आणि महत्व सांगितलं आहे. आई म्हणजे जगातील एक सर्वश्रेष्ठ असं नातं आहे, ज्या नात्याची तुलना कशाबरोबरही केली जाऊ शकत नाही.

निस्सीम प्रेमाच्या, मायेच्या आईसाठीच

मानवी नातेसंबंधातील आणि जगातील वेगळ्या नात्यातील एक नातं माझं आईचं. आई आणि मुलांचं नात्याचे बंध म्हणजे अमूल्य प्रेमाची ठेव. आणि हीच ठेव ती आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये ठेवत असते. आईची माया, प्रेम तिच्या मुलांच्यावरील मायेची तुलना जगातील कुठल्याच, कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मुलं जन्माला आलं की, मग तिचं सगळं आयुष्य मुलासाठीच देऊन टाकते, तेही कोणताही स्वार्थ न ठेवता. या अशा निस्सीम प्रेमाच्या, मायेच्या आईसाठीच, तिचा गौरव करण्यासाठीच जगभरात साजरा केला जातो तो म्हणजे मदर्स डे.

प्रत्येक मुलाला हा डे विशेष

आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मातृदिन अख्या जगात साजरा केला जातो. मात्र सगळ्या जगात एकाच दिवसात मातृदिन साजरा केला जातो असं नाही. कधी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात. भारतात मात्र या वर्षी 8 मे रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे. जगातील प्रत्येक मुलाला हा डे विशेष असतो. कारण आताच्या सगळीच मुलं या दिवशी आपल्या आईचा गौरव, आणि सन्मान तर याच दिवशी करतात. इतर दिवशी त्यांच्या कामाकडे, त्यांच्या कष्टाकडे, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जात असले तरी आजच्या दिवशी मात्र आईसाठी त्यांची मुलं आनंदाचा महोत्सवच साजरा करतात.

मातृदिन साजरा करण्याची कल्पना 19 व्या दशका

भारतीय संस्कृतीत मातांना नेहमीच अनन्यसाधारण असे स्थान मिळाले आहे. तरी, मातृदिन साजरा करण्याची कल्पना मात्र 19 व्या दशकाच्या प्रारंभी मांडण्यात आली.

मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये

मदर्स डेबद्दल मिळालेल्या माहितीबद्दल असे सांगितले जाते की, मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये युनायटेड स्टेट्समधील अॅना जार्विस नावाच्या महिलेने तिच्या आईच्या सन्मानार्थ साजरा केला होता. जिचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. अॅनाने चालू केलेली ही परंपरा युनायटेड स्टेट्समधील अनेक भागांमध्ये करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या दिवसाबद्दल 1914 मध्ये या कार्यक्रमाला राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती.

प्रत्येक मुलाची इच्छा…

आपल्या आईसाठी एक दिवस तरी काढावा, तिला आनंदात ठेवावे, तिला हॉटेलमधील जेवूखाऊ घालावे अशी आता प्रत्येक मुलाची इच्छा असते. मदर्स डे निमित्त मात्र आईसाठी भेटवस्तू देणे, आणखी भेट देऊन तिला खूश करणे, आनंदी करणे असं प्रत्येक आईच्या मुलाला वाटत असते.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.