कुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही!

आज जगभरातले लोक हे गाव पाहायला येतात पण संध्याकाळी ६ वाजायच्या आधी इथून जावं लागतं. संध्याकाळी ६ नंतर इथे कुणीही राहू शकत नाही. काही राहीले ते "राहीलेच" नाहीत, काही आजारी पडले, आणि मग बाकीच्यांनी सूर्याबरोबर पळ काढला.

कुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही!
Rajasthan Kuldhara village
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 5:04 PM

सूर्य मावळल्यानंतर शांततेच्या त्या भयाण किंचाळ्या, अदृश्य हालचाली, एका विचित्र नकारात्मक वातावरणाची जाणीव आणि सोबतीला इतिहासातली एक सत्य कथा वा दंत कथा….!!

राजस्थान…जिल्हा जैसलमेर…जैसलमेरपासून १८ किलोमीटरवर असलेलं कुलधरा गाव. 1291 च्या आसपास पाली भागातून आलेल्या कधान नावाच्या व्यक्तीनं कुलधरा हे गाव वसवलं. तिथे उधानसर नावाचा तलाव खोदला, जमिनीवर आकाशाचं प्रतिबिंब दिसलं जणू भगवान शंकरांच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेचा एक छोटा ओघळ हळूवारपणे राजस्थानच्या त्या भयाण वाळवंटात अवतरला.

हळूहळू ८४ गावं वसली या भागात. हे लोक पाली भागातून आलेले ब्राम्हण. म्हणून यांना पालीवाल ब्राम्हण म्हणलं गेलं. कष्टाळू आणि तंत्रज्ञानात विकसित केलेल्या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली, ती एका विशिष्ठ पध्दतीनं केलेल्या पाणी सिंचन पध्दतीमुळे. हळूहळू चौफेर प्रगती होत होती. गाय-म्हशी पालन, मातीची भांडी बनवणे विविंध व्यापार यामुळे हे लोक राज्याला सर्वात जास्त कर देत होते.

जवळून जात असलेल्या त्या वेळच्या व्यापारी मार्गाचा कुलधरानं पुरेपुर उपयोग केला. इथून जाणारा मार्ग द.अफ्रीका, इराण, इराक, पेशावर, रावळपिंडी, महाराष्ट्र, कोकणापर्यंत मालाची देवाण-घेवाण करत होता आणि त्याचबरोबर कुलधरी गावात व्यापारामुळे बरसणाऱ्या लक्ष्मीचाही. लक्ष्मी कुलधरामध्ये पाणी भरत होती.

मग त्या दिवशीचा सूर्य असा का उगवला ज्यामुळे कुलधरा आणि आसपासच्या भागातल्या ८४ गावांमध्ये कायमचा अंधार तळपतोय. वाळवंटातही अविश्वसनीय शीतलता देणारी जणू विश्वकर्म्यानं बांधलेली ती मातीची अप्रतिम घरं ओस का पडली…? प्रसन्न असलेल्या लक्ष्मीच्या जागी आज हिडींबा थयथयाट करतीय भग्न वास्तूंसह काळ्याकुट्ट अंधाराबरोबर.

साधारण २०० वर्षांपूर्वी या गावाचा दिवाण ( राज्य करणारा ) सालीम सिंह याची कुलधरा गावातल्या एका पुजार्याच्या मुलीवर नजर पडते. हवस आणि सत्तेची ताकद आदेश देते की पुढच्या पोर्णिमेच्या आत त्या मुलीला हजर करावं. कुलधराबरोबर आजूबाजूला असेलेली ८४ गावं विभागलेली असली तरी एक होती. सगळ्या गावांची पंचायत बसली, धर्म संकट एका गावावर होतं पण सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला, जिथं आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या भागाचा त्याग करायचा.

शेतात काम करणाऱ्या हातांनी आपलं शेत सोडलं, व्यापार करणार्यांनी आपला व्यापार सोडला, जनावरं पाळणार्यांनी जेवढी जनावरं बरोबर घेता आली तेवढी घेतली बाकीची तिथेच सोडली, घरातल्या नेता येतील तेवढ्याच बरोबर घेऊन बाकीच्या अमुल्य वस्तू तिथेच सोडल्या, म्हातारी कोतारी जी येऊ शकली ती बरोबर नेली बाकीची तिथेच सोडली, वर्षांनुवर्ष काबाड कष्ट करुन मिळवलेलं ऐश्वर्य, संपत्ती, जमीनजुमला सगळ्याची राख-रांगोळी झाली.

कुलधरासह आसपासच्या ८४ गावातल्या गावकऱ्यांनी एका रात्रीत गाव रिकामं केलं ते कायमचं….फक्त एक शाप मागे ठेवून….!!

८४ गावांपैकी असं म्हणतात की यातलं ओस पडलेलं मुख्य कुलधरा आज एक शापित गाव आहे….उभी घरं-दारं, उद्योग, जमिनी सोडताना यातनांनी तळमळलेल्या गावकऱ्यांनी जाताना या भागात कुणीही परत वसू शकणार नाही असा शाप दिला म्हणे.

आज जगभरातले लोक हे गाव पाहायला येतात पण संध्याकाळी ६ वाजायच्या आधी इथून जावं लागतं. संध्याकाळी ६ नंतर इथे कुणीही राहू शकत नाही. काही राहिले ते “राहिलेच” नाहीत, काही आजारी पडले, आणि मग बाकीच्यांनी सूर्याबरोबर पळ काढला.

रात्री या गावातल्या ओस पडलेल्या दगड-मातीची घरं तिथे थांबणार्याला अनुभव देतात जो फक्त अनुभवायला लागतो. आसपासच्या गावकर्यांनी, पर्यटकांनी अनुभवलेले वेगवेगळ्या अनुभवांचे कित्येक किस्से इथे सांगितले जातात. संध्याकाळनंतर रात्रीच्या साम्राज्यात इथे कुणीही नसताना दूरवरुन येणारा बोलण्याचा आवाज, कुणीतरी चालत आपल्याकडे येत आहे असा पायांचा आवाज, अचानक जवळून कुणीतरी केल्याचा भास, घुंगरुंचा, भांड्याचा आवाज असे विविध आणि विचित्र अनुभव, किस्से इथे ऐकायला मिळतात.

पॅरानाॅरमल ॲक्टीव्हिटी तज्ञांनी आणि मीडियानंही या गावात अनेकदा पाहणी केली तपासणी केली. काहींनी विविध आधुनिक यंत्र घेऊन या ठिकाणी खरं-खोटं खंगाळलं. कधी कधी त्या आधुनिक यंत्रांनी कुणाची अदृश्य चाहुल असल्याचा होकार दिला तर कधी नकार. रात्रभर त्या उजाड पडलेल्या गावात औत्सूक्य म्हणून काही जण फिरले वावरले, हवेच्या आणि झाडांच्या पानांच्या आवाजानंही भेदरले तर कधी धीर गंभीर होऊन वाट पाहात राहिले एखाद्या अनपेक्षित घटनेची.

Rajasthan Kuldhara village

Rajasthan Kuldhara village

खरंच या गोष्टी असतात का…?? आत्मा, भूत, अदृश्य शक्ती वावरतात का…?? का लोकांच्या मनात, पुस्तकांच्या पानावरच त्यांचं अस्तित्व आहे…..?? पृथ्वीवर मानवाच्या जन्मापासूनच सुख-दु:खांच्या अनंत घटनांचा महासागर प्रत्येक युगात जीवनाच्या किनार्यावर आदळतोय, साहजिकच अगणित अतृप्त आत्म्यांच्या भटकंतीनं पृथ्वीवरचं जीवन हलाल झालं असतं. मग काही विशिष्ठ ठिकाणीच या प्रचिती कशा…??

गीतेमध्ये आत्मा एका शरीरातून दुसर्या शरीरात प्रवेश करतो असं भगवान श्री कृष्णानं सांगितलंय, मग तरीही आत्म्यांचं शरीराशिवायचं अस्तित्व कितपत खरं…?? आपल्या संस्कृतींत पितृ पंधरवडा म्हणजे महाळ असतो, या दिवसांत पितरं येतात असं म्हणटलं जातं. पण मग भगवान कृष्णानं सांगितलेला पुर्नजन्म खरा की पितृ पंधरवड्यातलं पितरांच्या आत्म्यांचं येणं…?? दोन्ही कसं खरं असेल…?? कारण गेलेल्या पितरांचे आत्मे तर भगवद् गीतेच्यानुसार दुसर्या शरीरात प्रवेशले असले पाहिजेत. ( पितृ पंधरवड्याचा खरा उद्देश पितरांचं स्मरण आहे, इतकंच ).

या पलिकडे जाऊन मेडिकल शास्त्रात मृत्यूची व्याख्या ब्रेन हा अवयव पूर्ण डेड झाल्यानंतरची अवस्था म्हणजे “मृत्यू” अशी केली आहे न की शरीरातून तथाकथित आत्मा निघून गेल्यानंतर. असो.

कुलधरा गाव एकदा तरी आयुष्यात पाहण्यासारखं आहे, राजस्थान सरकारनं या गावाला पर्यटनाच्या प्रमुख स्थळांच्या यादीत ॲड केलंय. कुलधरामध्ये आता पूर्वीची लक्ष्मी नांदत नसली तरी या गावाच्या इतिहसामुळे राजस्थान सरकारकडे लक्ष्मी चालून येतेय, इतका पर्यटकांचा ओघ कुलधराकडे असतो.

कुठलीही स्टोरी जी न्यूज चॅनलची असो, सिनेमाची असो, सिरियलची असो वा लेख मनुष्य अशा दंत कथांचा आधार घेत आणखीन आणखीन रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण केवळ रंजकतेकडे पाहून लोकांना भ्रमीत आणि भयभीत करणे हा विवेक नव्हे.

(ब्लॉगमधील मते लेखकाची वैयक्तिक आहेत)

प्रशांत कुबेर यांचे याआधीचे ब्लॉग 

जगातल्या कुठल्याही कुत्र्यासाठी आपला ‘मालक’ हेच जीवन….!!    

जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी भिंत आपल्या भारतात…! 

(Prashant Kuber blog on Rajasthans Kuldhara village interesting story of superstition)

'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.