BLOG | फेसबुकवर Couple Challenge चे फोटो, नव्या संकटाची चाहूल

‘फेसबुक'वर सध्या ‘कपल चॅलेंज'ने नेटकऱ्यांवर भुरळ घातली आहे. यानंतर आता वेगवेगळे ‘चॅलेंज' पुढे येत आहेत. मात्र, यातून नव्या सामाजिक संकटाची चाहूल लागत आहे (Facebook Couple Challenge trend).

BLOG |  फेसबुकवर Couple Challenge चे फोटो, नव्या संकटाची चाहूल
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 8:48 PM

‘फेसबुक’वर सध्या ‘कपल चॅलेंज’ने नेटकऱ्यांवर भुरळ घातली आहे. यानंतर आता वेगवेगळे ‘चॅलेंज’ पुढे येत आहेत. मात्र, यातून नव्या सामाजिक संकटाची चाहूल लागत आहे (Facebook Couple Challenge trend). नेटकऱ्यांचे वेड ‘डेअर टू डू चॅलेंज’पर्यंत गेल्यास ते ‘ब्लू व्हेल गेम’सारखे धोकादायक ठरण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

सोशल मीडियावर विशेषतः ‘फेसबुक’वर सातत्याने वेगवेगळे ‘ट्रेंड’ दिसून येत आहेत. केवळ मनोरंजन म्हणून काही ट्रेंड दिसून येतात. त्यात आता ‘कपल चॅलेंज’ची भर पडली. त्यानंतर लगेच ‘सिंगल चॅलेंज’, ‘ब्युटीफूल डॉटर चॅलेंज’, ‘ट्रान्सफर मनी टू माय अकाऊंट चॅलेंज’ असेही काही ट्रेंड नेटकऱ्यांनी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

यानंतर आता ‘नीड अ पार्टनर चॅलेंज’ आणि`‘शेअर डेथ’ असले विकृत प्रकार यायलाही वेळ लागणार नाही. यात पुढे ‘डेअर टू डू चॅलेंज’सारखा ट्रेंड सुरु झाल्यास मोठी सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे घरात विलगीकरणात असलेले नेटकऱ्यांच्या मनस्थितीचा लाभ घेत असमाजिक तत्त्वांकडून सोशल मिडियावर हे ट्रेंड सुरु करण्यात आल्यास नवल वाटायला नको.

सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण निराश झाले आहेत. त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत समाजात विकृती पसरविण्यासाठी सोशल मीडियावर असामाजिक तत्त्व कार्यरत आहेत. सोशल मीडियावर कुठल्या ट्रेंडला प्रतिसाद द्यायचा, याबाबत प्रत्येकाने शहाणपणा बाळगण्याची आवश्यकता आहे. यात उंच बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत, उंच मनोऱ्यांवर चढून सेल्फी काढणे किंवा जिवाला धोकादायक ठरतील, अशा ‘सेल्फी‘`काढण्याची स्पर्धा लागण्याची शक्यता बळावली आहे.

तीन वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खेळताना अनेक नेटकऱ्यांनी आत्महत्या केली. ब्लू व्हेल गेमचा ‘टास्क’ पूर्ण करताना नागपूरमध्येही तरुणीने आत्महत्या केल्याचे ताजे उदाहरण आहे. ‘डेअर टू डू चॅलेंज’चा ट्रेंड सुरु झाल्यास हिंमत दाखविणे किंवा आव्हान स्वीकारुन काहीही करण्याची मानसिकता पुढे आल्यास प्राणाशीच गाठ पडू शकते.

सोशल मीडियातील कुठल्या ट्रेंडला किती प्रतिसाद मिळेल, याचा काही नेम राहीला नाही. त्यातही चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्याचे तरुणाईला नेहमीच वेड राहिले आहे. त्यामुळे ‘डेअर टू डू चॅलेंज’मध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर काय टाकावे, कशाला प्रतिसाद द्यावा, याबाबत शहाणपण दाखविण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. ‘कपल चॅलेंज’ स्पृहनीय असलं तरी त्यानंतर विडोव चॅलेंज, डायव्हर्सी चॅलेंजसारखे काही पुढे आल्यास समाजासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टीप – संबंधित मतं लेखकाची व्यक्तिगत मतं आहेत.

Facebook Couple Challenge trend

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.