आणि ते विमान टेक ऑफ नंतर तब्बल 35 वर्षांनी लॅन्ड झालं? 

एअर ट्रॅफिक कंट्रोलरुमकडून सतत संपर्क केला जातो पण कोणीही प्रतिसाद देत नाही. विमान एअरपोर्ट हद्दीत प्रवेशतं आणि रन-वे वर लॅन्ड होतं. 

आणि ते विमान टेक ऑफ नंतर तब्बल 35 वर्षांनी लॅन्ड झालं? 
airplane
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 1:25 PM

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याचं पहिलं पाऊल उचललं आणि नंतर माणसाच्या डोक्यानं नियतीला डोकं खाजवायला लावलं. म्हणता म्हणता माणसानं केलेल्या उत्क्रांतीमुळे एव्हिएशन क्षेत्रानं टेकऑफ घेतला. कसं बसं वीस-बावीस फूटांवर उडणारं पहिलं विमान आता बावीस बावीस तास सलग हवेत राहू लागलं. पण नियतीही कधी कधी माणसाला डोकं खाजवायला भाग पाडते.

अशा काही सोकाॅल्ड अकल्पित गोष्टी घडतात की माणूस पुन्हा नियतीसमोर पुन्हा खुजा वाटायला लागतो. अशीच ही एक रहस्यमय घटना. 4 सप्टेंबर 1954 ला वेस्ट जर्मनीतल्या अचेन एअरपोर्टवरुन सॅन्टिॲगो एअरलाईनच्या विमान ५१३ नं टेक ऑफ घेतला ब्राझीलच्या पोरटो अल्गिर एअरपोर्टला.

विमानाचा प्रवास होता तब्बल 18 तास. 88 प्रवासी, 4 क्रू मेंबर. एका 18 तासांच्या दीर्घ प्रवासासाठी एकत्र आले होते. विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर अटलांन्टिक सागरानं विमानाचं स्वागत केलं. अथांग पसरलेल्या त्या महासागरात ठिपक्यासारखं दिसणारं ते विमान पुढे-पुढे सरकत होतं आपल्या नियोजीत ठिकाणाकडे.

काही वेळ गेल्यानंतर अचानक ए.टी.सी. म्हणजे एअर ट्रॅफिक कंन्ट्रोल रुमच्या रडारवरुन विमान गायब होतं. कंट्रोलरुनकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. पण कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अटलांन्टिक समुद्रात विमान दुर्देघटनाग्रस्त झाल्याची भीती व्यक्त केली जाते. सर्च पार्टीकडून शोध मोहिम सुरु होते. विमानाचे अवशेष जिथे विमान शेवटचं दिसून आलं तिथून कित्येक शे किलोमीटर ( नॉटीकल मैल ) पर्यंत घेतला जातो.

कित्येक दिवस शोध सुरु असतो पण काहीही मिळत नाही. सॅन्टिॲगो कंपनीचं विमान 513 कदाचित 88 प्रवासी आणि चार क्रू मेंबरसह अपघातग्रस्त झालेलं असतं. सहा महिने उलटतात शेवटी विमानाचा शोध थांबवला जातो, फाईल बंद केली जाते.

जर्मनीतल्या अचेन एअरपोर्टवरुन निघालेलं विमान ब्राझीलच्या पोरटो अल्गिर एअरपोर्टवर उतरु शकलेलं नसतं. वर्षे उलटतात. 12 ऑक्टोबर 1989 हा दिवस उजाडतो. ब्राझिलच्या पोरटो अल्गिर एअरपोर्टवर नेहमीची गडबड सुरु असते. अचानक कंट्रोल रुममधल्या लोकांना एक विमान रडार आणि डिसप्लेवर दिसू लागतं. हे कुठलंही नियोजित विमान नसल्यानं विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. विमान हळू हळू विमानतळाकडे येत असतं.

एअर ट्रॅफिक कंट्रोलरुमकडून सतत संपर्क केला जातो पण कोणीही प्रतिसाद देत नाही. विमान एअरपोर्ट हद्दीत प्रवेशतं आणि रन-वे वर लॅन्ड होतं.

एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलशी संपर्क न करता, परवानगी न घेता लॅन्ड झालेलं हे विमान सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का तर असतोच पण यापेक्षा मोठा धक्का बसतो जेव्हा हे विमान सध्याच्या काळातलं नसून जुन्या बनावटीचं असल्याचं लक्षात येतं. पुन्हा संपर्क केल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या विमानाकडे आता एअरपोर्ट सिक्युरिटी पाठवली जाते.

एअरपोर्ट सिक्युरिटी विमानतळावरील वरिष्ठ कर्मचारी विमानाजवळ पोहोचतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. जुनाट वाटणाऱ्या या विमानावर लिहिलेलं असतं “सॅन्टिॲगो फ्लाईट 513”. विमानतळावरील वरिष्ठांना सॅन्टिॲगो कंपनी 1956 सालीच बंद केली गेल्याचं माहिती असतं. विमानाच्या नंबर वरुन माहिती घेतल्यानंतर हे विमान अपघातग्रस्त झाल्याची नोंद विमान जगतातल्या रेकॉर्डवर असल्याचंही लक्षात येतं.

आता मात्र समोर उभं असलेलं विमान हा एक चमत्कार असल्याचं कर्मचाऱ्यांना लक्षात आलेलं असतं. विमानातून कोणीही बाहेर येत नाही किंवा कोणतीही हालचाल नाही हे बराच काळ पाहिल्यानंतर विमानात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला जातो. विमानाचा दरवाजा बाहेरुन उघडला जातो.

एअरपोर्ट सिक्युरिटी आणि सिनियर स्टाफ विमानात प्रवेशतात आणि अंगावरती काटा उभा राहतो आणि त्यांची बोबडी वळते, थरकाप उडतो.

विमानातल्या सीटवर माणसांचे हाडांचे सापळे दिसून येतात. 4 सप्टेंबर 1954 ला जर्मनीवरुन टेक ऑफ घेतलेले विमानातले प्रवासी हाडांचे सापळे होऊन राहिलेले असतात.

हा नक्की काय प्रकार आहे हे विमानतळ स्टाफच्या लक्षात येत नाही, त्यातले काही जण घाबरुन विमानातून खाली उतरतात.

काही जण धाडस करुन काॅकपिटच्या दिशेने जातात, दरवाजा उघडतात पायलटशी बोलण्यासाठी. दरवाजा उघडला गेल्यानंतर जे दृश्य दिसतं त्यानं स्टाफचं डोकं चक्रावून जातं. दोन्ही पायलट म्हणजे प्रवाशांप्रमाणेच हाडांचे सापळे असतात. त्यातील एकानं आपल्या एका हातात कंन्ट्रोल स्टिक पकडलेली असते.

Plane land news

Plane land news

एक असं विमान जे तब्बल 35 वर्षांपूर्वी अचानक नाहीसं झालं, एक अशी कंपनी जी कंपनी तब्बल 33 वर्षांपूर्वी बंद झाली तिचं विमान अचानक एअरपोर्टवर लॅन्ड होतं, नुसतं लॅन्ड होत नाही तर विमानात प्रवासांचे, वैमानिकांचे सापळे सापडतात…??

संपूर्ण ब्राझीलमध्ये हाहाःकार उडतो. प्रसारमाध्यमांची पानंच्या पानं या घटनेच्या वृतांकनानं भरुन जातात.

धावपट्टीवरच्या एका घटनेमुळे हजारो प्रश्नांनी ब्राझिलमध्ये टेक आॅफ घेतलेला असतो.  आकाशातल्या हजारो तारकांप्रमाणेच. सरकारला प्रश्न विचारले जात असतात. संपूर्ण जगात या घटनेची चर्चा होते.

पॅरानाॅर्मल ॲक्टिव्हिटीवाले आता यामध्ये उडी घेतात. या घटनेबाबत असा आरोप केला गेला की सरकारनं या घटनेबाबत बरीच लपवा-लपवी केली. पॅरानाॅर्मल ॲक्टिव्हिटी एक्सपर्ट डाॅक्टर केलसो अटेलो यांनी ही घटना सत्य असून विमान टाईम ट्राव्हलच्या चक्रात अडकल्याचं सांगत निष्कर्ष दिला. संपूर्ण ब्राझिल मात्र हादरून जातं.

अजूनही ही घटना नक्की काय आहे….?? का ही एक बनविलेली कहाणी आहे याचं नक्की उत्तर मिळू शकलेला नाही. याबाबत असं म्हणतात की ज्या वृत्तपत्रानं ही गोष्ट छापली ते वृत्तपत्र अशा रंजक आणि रहस्यमय गोष्टी छापण्यासाठीच प्रसिध्द होतं. तर काही जण ही सत्य घटना असल्याचं ठासून सांगतात.

यात एक गोष्ट मात्र नक्की, की 35 वर्षांपूर्वी जर्मनीतून ब्राझिलकडे टेक ऑफ घेतला तो याच फ्लाईट 513 या विमानानं. पण ते उडालेलं विमान जितकं खरं होतं तितकंच लॅन्ड विमान आणि नंतर घडलेली ती घटना तितकीच खरी होती का…?? की वृत्तपत्र खपाच्या ईर्षेपायी त्यातल्या रंजक कहाणीनंच बसल्या-बसल्या पत्रकारिता जमीनीवर आणत वृतांकनाचा सांगाडा केला…?? हे देव जाणे.

(Story of plane that landed after 35 years blog by Journalist Prashant Kuber )

(लेखक प्रशांत कुबेर मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी टीव्ही मीडियात अनेकवर्ष काम केलं आहे. सध्या सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या विविध प्रोजेक्टवर काम करतात. त्यांनी अनेक डॉक्युमेंटरीजही केल्या आहेत.)

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....