Blog: ग्रामीण भागातील लोकांसाठी टेलिमेडिसिन आशेचा नवीन किरण…

covid-19 च्या काळात भारतामध्ये आरोग्य क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडून आल्या आहेत आणि आता त्यावर एक पर्याय म्हणून टेलिमेडिसिन पुढे येत आहे. (telemedicine is new hope for people of rural area)

Blog: ग्रामीण भागातील लोकांसाठी टेलिमेडिसिन आशेचा नवीन किरण...
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 7:12 PM

कोरोनाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे सगळेच खूप हतबल झाले आहेत. ग्रामीण भागातही संसर्ग पसरला आहे. लस उपलब्ध होण्यासाठी उशीर होत आहे, यावरती कोणताही उपचार नाही, जास्त लोकसंख्या असल्यामुळे दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटरची सुविधा पण सगळ्यांना मिळत नाहीये, कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल काय? तो कसा थांबवला जाऊ शकतो? असे खूप साऱ्या विचारांनी डोक्यात थैमान घातले आहे. covid-19 च्या काळात भारतामध्ये आरोग्य क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडून आल्या आहेत आणि आता त्यावर एक पर्याय म्हणून टेलिमेडिसिन पुढे येत आहे. (telemedicine is new hope for people of rural area)

भारताची लोकसंख्या 135.26 कोटी आहे, त्यामध्ये 65% लोकसंख्या ही ग्रामीण भागातील आहे तर 35%लोकसंख्या ही शहरी भागात आहे. भारत हा जरी प्रगतीशील देश असला तरी आरोग्यच्या बाबत आपण युरोपियन देशांच्या तुलनेत खूप मागे आहोत कारण भारतातील लोकसंख्या.आपला डॉक्टर आणि रुग्ण यांचे गुणोत्तर 1:1000 इतका आहे त्यामुळे प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीयेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे तर हा प्रश्न खूपच आव्हानात्मक झाला आहे, कारण एवढ्या लोकांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे ही एक तारेवरची कसरत आहे, त्यामुळे यावरती एकच उपाय तुम्ही तुमच्या घरी राहूनच वैद्यकीय सेवा घेण्यासाठी प्राधान्य देणे. शहरी भागात टेलिमेडिसिनला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तो ग्रामीण भागातही यशस्वीपणे पोहचवला पाहिजे.

टेलिमेडिसिन ग्रामीण भागात राबवण्याची गरज

ग्रामीण भागात टेलिमेडिसिनला प्रतिसाद मिळेल काय? कसा मिळेल? असे खूप सारे प्रश्न आहेत कारण ग्रामीण भागातील डॉक्टर आणि पेशंट यांची मानसिकता, अशिक्षितपणा, स्मार्ट फोन, संगणक न हाताळता येणे, मोबाईल नेटवर्कची समस्या असे खूप सारे प्रश्न आहेत. ग्रामीण भागातील डॉक्टर आणि पेशंटची मानसिकता बदलवली तर तिथेसुद्धा टेलिमेडिसिनला चांगला प्रतिसाद मिळेल, मोबाईल आणि संगणकचा नेटवर्क स्पीड यावरतीच टेलिमेडिसिन अवलंबून असते. त्यामुळे ते व्यस्थितरित्या राबविण्यात आले तर तिथल्या लोकांना पण चांगली सुविधा मिळेल. भारताची शहरी भागापेक्षा ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. तोच भारताचा कणा आहे. त्यामुळे टेलिमेडिसिन ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यात येणे खूप गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील बरेच लोक वाड्या, वस्तीवरती राहतात, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा वाहनाची सोय नसते. त्यामुळे एखाद्याला अत्यावशक सेवा पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला शहरापर्यंत किंवा तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो, यामुळे शारीरिक त्रास तर होतोच पण मानसिक त्रासही होतो. कारण दवाखान्यातील गर्दी आणि डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे या सगळ्या फेऱ्यात अडकून रुग्ण खूप थकून जातो आणि डॉक्टरांना पण कामाचा ताण पडतो, त्यामुळे घरी राहून टेलिमेडिसिनद्वारे वैद्यकीय सेवा घेणे डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही  हितावह आहे.

ग्रामीण भागातही covid -19चा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे या कोरोनाच्या काळात टेलिमेडिसिन ग्रामीण भागात राबविण्यात येणे खूप गरजेचे आहे. कारण येथील आरोग्यबाबतचे गैरसमज आणि अपुरे ज्ञान, पेशंटला योग्य उपचार न मिळणे त्यामुळे खूप लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागल्याने त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन वाढला आहे त्यामुळे टेलिमेडिसिनद्वारे डॉक्टरांनी त्यांच्या पेशंटला योग्य मार्गदर्शन केले तर पेशंटचा हा सगळा त्रास वाचून त्यांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनही वाढेल. यामुळे ग्रामीण भागातील टेलिमेडिसिन हा तिथल्या लोकांसाठी आशेचा एक नवीन किरणच आहे ,असे म्हणायला हरकत नाही.

 (ब्लॉगमधील सर्व मते वैयक्तिक आहेत, ही टीव्ही 9 ची निर्मिती नाही)

(telemedicine is new hope for people of rural area)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.