Bulldozer Model : दंगलखोर, उपद्रव माजवणाऱ्यांविरोधातील यूपीचं बुलडोझर मॉडेल आता प्रत्येक राज्यात?

शंभूनाथ शुक्ल : नवी दिल्ली : देशात सध्या बुलडोझर (Bulldozer)राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. याच्या आधी देशात बुलडोझर हे कायम रस्त्यांच्यी कामात, ग्रामीण भागात शेत जमीनीच्या कामात आणि विविध कामात वापरले जात होते. तर कधी कधी प्रशासनाकडून याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर (Encroachment) हातोडा चालविण्यासाठी केला जात होता. मात्र आता हाच बुलडोझर देशातील विरोध […]

Bulldozer Model : दंगलखोर, उपद्रव माजवणाऱ्यांविरोधातील यूपीचं बुलडोझर मॉडेल आता प्रत्येक राज्यात?
यूपीचं बुलडोझर मॉडेल Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:54 PM

शंभूनाथ शुक्ल : नवी दिल्ली : देशात सध्या बुलडोझर (Bulldozer)राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. याच्या आधी देशात बुलडोझर हे कायम रस्त्यांच्यी कामात, ग्रामीण भागात शेत जमीनीच्या कामात आणि विविध कामात वापरले जात होते. तर कधी कधी प्रशासनाकडून याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर (Encroachment) हातोडा चालविण्यासाठी केला जात होता. मात्र आता हाच बुलडोझर देशातील विरोध मोडून काढण्यासाठी वापरला जात आहे. याच्याआधी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) वापरण्यात आलेले बुलडोझर मॉडेल हे देशाच्या इतर राज्यातही वापरले जात असल्याचेच समोर येत आहे. उत्तर प्रदेशनंतर हे बुलडोझर मॉडेल मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंड येथे वापरण्यात येत आहे. येथे संशयाच्या आधारावर एखाद्याचे घर-दुकान पाडण्यासाठी किंवा राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी आता हे बुलडोझर मॉडेल वापरले जात आहे.

योगी आदित्यानाथ यांना श्रेय

देशात सध्या सुरू असलेल्या बुलडोझर मॉडेलचे सगळे श्रेय हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जातं. त्यांनीच हे मॉडेल सगळ्यात आधी उत्तर प्रदेशमध्ये वापरले असं म्हटलं जातं. मात्र हे सत्य नाही. मात्र त्यांच्याही आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बाबू लाल गौर यांनी ते मांडले होते. मात्र त्याच्याही आधी उत्तर प्रदेशमध्ये महानगरपालिकांमध्ये १९७० च्या दशकात बुलडोझरचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाप्रशासनाडूनच याचा वापर केला जात होता. त्यावेळी जिल्हाप्रशासनाडूनच एक मोठी मोहिम आखली जात असे आणि मोठ्या फौजफाट्यासह त्याठिकाणावर कारवाई करून सगळं तोडफोड करण्यात येत असे. तर एखाद्या गुन्हेगाराविरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले असतील तर त्याची संपत्ती जप्त करण्यात येत असे किंवा त्याच्या घरावर हातोडा चालवला जात असे.

अतिक्रमण तोड अधिकारी अशी ख्याती

उत्तर प्रदेशमध्ये काही असे अधिकारी आहेत, ज्यांची ख्याती ही अतिक्रमण तोड अधिकारी अशीच आहे. जेव्हा मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा होत्या, तेव्हा एक पीसीएस अधिकारी एस सी रस्तोगी मोठ्या चर्चेत होते. त्यांनी आपल्या भागातील अतिक्रमण मोठ्याप्रमाणात हटवले. विशेष बाब त्यांना स्थानिकांचा सपोर्ट होता. त्यावेळी बुलडोझरचा वापर होत नव्हता. तर जिल्हाप्रशासनाचे कर्मचारी हे काम करत होते. तर त्याच्या आधी सुचना ही देण्यात येत होती. त्यामुळे आधीच लोक आपले साहित्य काढुन घेत होते. रस्तोगी यांच्यानंतर बाबा हरदेव सिंह यांचा नंबर लागतो. त्यांचे नावच अतिक्रमण विरोधी बाबा असे पडले होते. ते ज्या शहरात जातील तेथे लोक आधीच आपले अतिक्रमण काढुन घेत असत.

अतिक्रमण विरोधी बाबांची दहशत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या आधी येथे अतिक्रमण विरोधी बाबांची दहशत होती असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर हा १९९६-९७ मध्ये आला. तेव्हा तेथे बाबा हरदेव सिंह हेच अधिकारी होते. त्यांची पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरचा वापर केला आणि अतिक्रमण हटवले. त्यांनंतरच त्यांचे नाव बुलडोझर बाबा असं पडलं. ते जेथे गेले बुलडोझर सोबत घेऊन गेले. असं असलं तरिही सिंह हे मानतात की आधी नोटीस ही द्यायलाच हवी.

राजकारणात बुलडोझरचा वापर

देशात ज्यावरून राजकारण तापले ते बुलडोझर पुराण आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वापरले. त्यांनी याचा वापर गुन्हेगारांविरोधात वापरले. तर गुन्हेगार विकास दुबे याच्या घरावर करण्यात आलेली कारवाई त्यावेळी चांगलीच गाजली होती. यानंतर अतीक अहमद आणि मुख्तार अंसारी यांच्या घरांवर देखील बुलडोझर चालवला गेला. त्यानंतरच देशात बुलडोझर मॉडेलवनरून अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रश्न चिन्ह उभे केले. तसेच त्यांच्यावर एका विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात असल्याचा अरोप करण्यात आला.

युपीत बुलडोझर प्रचाराचा भाग

उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या निवडणूकांवेळी बुलडोझर प्रचाराचा भाग बनला होता. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख बुलडोझर बाबा असा करण्यात आला. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री योगी यांना राज्यात गुन्हेगार, भू माफियांवर अशीच कारवाई केली जाईल. त्यांची घरे अशीच तोडली जातील असं म्हटलं होतं. त्यावेळी जनतेनेच त्यांचे स्वागत केलं होतं. त्यावेळी जनतेला ही हाच मार्ग असल्याचे वाटलं होतं.

रामनवमीनंतर बुलडोझर घेतली अधिक गती

रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगे झाले. मशीदींसमोर जमाव आला आणि हिंसाचार झाला. गोळीबार ही करण्यात आला. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेशमधील खरगौन, गुजरातमधील खंभात, कर्नाटकमधील काही ठिकाणी असे प्रकार झाले. त्यानंतर तेथे जे या दंगतील सहभागी होते. त्यांची घरे पाडण्यात आली. त्यात बुलडोझर वापरण्यात आला. त्यावेळीही एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

अतिक्रमणांची माहिती प्रशासनाकडे असते

बुलडोझर मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाले यावर येथील काही अधिकारी मौन बाळगून आहेत. तर इलाहाबाद मध्ये आपल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेले अधिकारी आर विक्रम सिंह यांच्यानुसार महानगरपालिका आणि विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे अतिक्रमणची माहिती असणारी फाईलही असते. मात्र कारवाई करणार कोण म्हणून डोळे झाक केली जाते. त्यातजर कोणी बड्या नेत्याने किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने कारवाईचे आदेश दिले तरच अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाते. त्यातच काल जे जहांगिरपूरीमध्ये कारवाई करण्यात आली त्याची नक्कीच फाईल ज्युनियर इंजिनीअरकडे फाईल असावी, असेही ते म्हणाले. कोणताही अधिकारी उगाच अंगाला खाज कशासाठी लावून घेईल. तर सध्या उत्तर प्रदेश सरकार बुलडोझरला आपले हत्यार बनवत आहे. मात्र याला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वापरले जाऊ शकत नाही. अन्यथा याचे बुमरँग होईल.

(सदर लेखातील मत हे लेखकाचे आहे.)

इतर बातम्या :

Corona : कोरोनामुळे 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू! माईल्ड लक्षणं असूनही मृत्यू झाल्यानं खळबळ

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या स्थिर दरामुळे सामान्यांना दिलासा, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

PM Narendra Modi : ‘असा भारत घडवायचा आहे जो जगाला नव्या उंचीवर घेऊन जाईल’, गुरु तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वात पंतप्रधान मोदींचं विधान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.