World Water Day: जल है तो कल है..! जागतिक जल दिनाचा नेमका उद्देश काय?
पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय सजीवसृष्टी याची कल्पानाही करता येणार नाही. हे सर्व असतानाही 30 वर्षापासून पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. काळाच्या ओघात जलस्त्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय हा सुरुच आहे. त्यामुळेच 21 व्या शतकातही पाण्याचे संकट हे सर्वांसमोरच आहे. पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाचा कसा उपयोग करुन घेता येईल याची संकल्पना या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडली जाते.
मुंबई : पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय (living things) सजीवसृष्टी याची कल्पानाही करता येणार नाही. हे सर्व असतानाही 30 वर्षापासून पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. काळाच्या ओघात (Water resources) जलस्त्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय हा सुरुच आहे. त्यामुळेच 21 व्या शतकातही पाण्याचे संकट हे सर्वांसमोरच आहे. पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाचा कसा उपयोग करुन घेता येईल याची संकल्पना या (World Water Day) जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडली जाते. किमान यामधून का होईना पाण्याचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल आणि पाण्याचा सदउपयोग केला जाईल. पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण हे अत्यंल्प आहे. त्याचा जपून वापर करणे हीच काळाची गरज आहे. एवढेच नाही तर पाणी टंचाई आणि पाण्याचा अपव्यय असाच झाला तर तिसरे युध्द हे देखील पाण्यासाठीच होईल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी हा 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जनजागृतीचे कार्यक्रमही राबवले जातात.
जल दिन साजरा करण्याची मूळ संकल्पना
जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. काळाच्या ओघात पाण्याचे महत्व तर सर्वांच्या लक्षात आले पण जल संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती केली जात नाही. तहान लागल्यावरच विहीर खोदून प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी नियोजन हाच महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जल संवर्धनाची सुरवात स्वत:पासून व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जल स्त्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी अशी ही तरतूद
पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तरतूदींचा समावेश असलेल्या कायद्याचा मसुदा केंद्र शासनाने सर्व राज्यांना सन 1968 मध्ये देऊ केला होता. भूजल वापराच्या विविध बाबी, त्याच्या उपलब्धतेसंबंधी तांत्रिक, शास्त्रीय आणि सुयोग्य विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा स्रोत संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूजल अधिनियम-1993’ तयार केला. 1993 सालच्या या कायद्याचा मुलभूत हेतू पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर आधारित स्त्रोत सुरक्षित ठेवणे हा आहे.
तर तिसरे महायु्ध्द पाण्यासाठी
तिसरे महायुध्द देखील पाण्यासाठीच होईल अशी भविष्यवाणी संयुक्त राष्ट्राच्या सहाव्या सरचिटणीस, बुतरस घाली यांनी केली होती. जर लोकांना वेळीच पाण्याचे महत्त्व कळले नाही तर पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल. एवढी दाहकता असतानाही पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. मात्र, आजच्या दिनाचे औचित्य साधताना पाण्याचा योग्य वापर करण्यासंदर्भात ज्या सूचना आवाहन केले जाते त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली तर या जागतिक जल दिन साजरा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
यंदाची थीम काय?
दरवर्षी नवीन थीम घेऊन जलसंवर्धनाचे धडे दिले जातात. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात किंवा बॅनरद्वारे याची प्रसिध्दी केली जाते. जागतिक जल दिन 2022 ची थीम आहे “Groundwater : making the invisible visible”- भुजल : अदृश्याला दृश्यमान करणे ही आहे. पाणी हे जरी अदृश्य असले तरी त्याचे मानवी जीवनात एवढे महत्व आहे की, त्याच्या अस्तित्वाने सर्वकाही दृश्यमान होईल. पाण्याचे महत्व विषद करण्यासाठी असे घोषवाक्य घेऊन जनजागृती केली जाते.
Groundwater is critically important to the healthy functioning of ecosystems, such as wetlands & rivers. As well as playing a critical role in adapting to #ClimateChange.
We must work together to sustainably manage this precious resource.#WorldWaterDay: https://t.co/JYRsyTyJA6 pic.twitter.com/Xi4gqHjXNG
— UN Environment Programme (@UNEP) March 20, 2022