Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सतार वाजवायचे, संगीत शिकायचे सोडा आणि तुम्ही लेखक व्हा, असा सल्ला रणजित देसाईंना दिला, अन् ते स्वामीकार झाले…

'स्वामी'कार रणजित देसाई अशी जरी त्यांची ओळख असली तरी रणजित देसाई यांनी मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक, ललित आणि अल्पप्रमाणात कविता लेखनही त्यांनी केले आहे. कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी, त्यांनी आपल्या साहित्याची सुरुवात केली ती कथेपासूनच.

तुम्ही सतार वाजवायचे, संगीत शिकायचे सोडा आणि तुम्ही लेखक व्हा, असा सल्ला रणजित देसाईंना दिला, अन् ते स्वामीकार झाले...
रणजित देसाई यांचा आज जन्मदिनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 8:28 AM

मुंबईः “आज मी हे गाव सोडून जात आहे. ह्या गावात आता माझं असं काहीच उरलं नाही. तरीही गाव सोडून जात असताना कसली तरी हुरहूर मनाला वाटत आहे. डोळे अकारण भरून येत आहेत. ह्या भावनेला आता फारसा अर्थ उरलेला नाही, हेही जाणवतं. हे सारं समजतं. तरीही मागं पाहायचं नाही, असं कितीही वेळा ठरवलं तरी, मागं पाहतोच आहे…” आपल्या गावाविषयी लिहिले आहे ते मराठी साहित्यातील, ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी मराठी वाड्.मय (Marathi Literature) समृद्ध केले त्या पद्मश्री रणजित देसाई (Ranjit Desai) यांच्या माझा गाव या कादंबरीत आपल्या गावाविषयी वाटणारी भावना त्यांनी माझा गाव या कादंबरीत मांडली आहे. गाव, प्रदेश, भाषा, रूढी, परंपरा ज्यांनी खूप बारकाव्याने मांडली अशा मराठी साहित्यातील थोर साहित्यिक रणजित देसाई यांचा आज जन्मदिन.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील कोवाड (Kowad) या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म जरी कोवाडसारख्या खेड्या गावात झाला तरी लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांचं सगळं बालपण आणि शालेय जीवन कोल्हापुरात त्यांच्या आजी सुंदराबाई घोरपडे यांच्याकडे झालं.

सुंदराबाई घोरपडे यांनीच घडवले

कोल्हापूर शहराला छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच अख्ख्या देशात कोल्हापूर शहराची ओळक ही पुरोगामी शहर म्हणून ओळखले जाते. रणजित देसाई यांचं बालपणही कोल्हापूरात गेलं. त्यांच्या आईचे निधन झाल्यावर त्यांना त्यांच्या आजी सुंदराबाई घोरपडे यांनी वाढवलं आणि संस्कार केले. त्याकाळात रणजित यांना संगीताची आवड निर्माण व्हावी, त्यांना कला, साहित्य आणि संस्कृतीची आवड जपता यावी यासाठी त्यांच्या आजीने त्यांना गायन शिकवण्यासाठी पाठवू लागल्या. त्या जुन्या काळातही त्यांच्या आजीने त्यांचे गुण हेरून त्यांना संगीतक्लास लावले. मात्र एकदा त्यांच्या आजीने रणजित देसाईंना सहज विचारले की, तुम्हाला कोण व्हायचंय? त्या प्रश्नावर रणजित देसाई यांनी उत्तर दिलं, मला लेखक व्हायचं आहे.

आजीचा मायेचा सल्ला

रणजित देसाई यांना त्यांच्या आजीने विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने त्या भारावून गेल्या आणि त्या आजीने त्यांना सांगितले की, तुम्ही सतार वाजवायचे, संगीत शिकायचे सोडा. तेव्हा त्यांनी आपल्या आजींचा सल्ला मानला आणि गायन-संगीत सगळं सोडून दिले. मात्र त्यावेळी त्यांना हेही सांगितले की, तुम्ही लेखक व्हा, पण तुमच्यासारखा दुसरा कोणी लेखक असता कामा नये. त्यामुळेच त्यांच्या मनात लेखक, कथाकार, नाटककार आणि ललित निबंधकार म्हणून जी काही बिजं त्यांच्या मनात पेरली गेली ती त्यांच्या आजीमुळेच. रणजित देसाईंना त्यांच्या आजींनी दिलेला सल्ला त्यांनी मानून ते साहित्याकडे वळले खरे, पण त्यांनी त्यांच्या मनात असलेली संगीताची आवडही त्यांनी सोडली नाही. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या रणजित देसाई यांचे कथाविश्व या ग्रंथात त्यांनी रणजित देसाईंच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

संगीत कलेविषयी जाण

रणजित देसाईंच्या आजीमुळे त्यांना जशी साहित्याची आवड गोडी निर्माण झाली तशीच आवड संगीत कलेविषयी निर्माण झाली. म्हणून त्यांच्या काळातील लेखक, कवी आणि त्यांच्या मित्रांनी ज्या आठवणी लिहून आहेत त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रणजित देसाई यांना गाणी व भजन म्हणण्याचाही छंद होता तो त्यांच्या आजीमुळेच. रणजित देसाई यांनी संगीताची आवड जोपासताना त्यांनी एकतारीवर भजनं म्हणण्याची त्यांना सवय होती असा उल्लेख त्यांच्या मित्रांनी लिहिलेल्या आठवणीत आहे.

साहित्यात चौफेर लेखन

‘स्वामी’कार रणजित देसाई अशी जरी त्यांची ओळख असली तरी रणजित देसाई यांनी मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक, ललित आणि अल्पप्रमाणात कविता लेखनही त्यांनी केले आहे. कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी, त्यांनी आपल्या साहित्याची सुरुवात केली ती कथेपासूनच. त्यांच्या साहित्यात रणजित देसाई यांनी वाचकांबरोबर तीन प्रकारचे करार केले पहिला करार होता तो म्हणजे सांगण्याचा करार, त्यांच्या साहित्यातून कोणतीही गोष्ट सांगताना ते ज्या पद्धतीने सांगतात ती गोष्ट वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहते. दुसरा करारा होता दाखविण्याचा सांगण्याची आणि दाखवण्याची हातोटी त्यांच्या साहित्यातून येते म्हणूनच त्यांनी नाटकंही उत्तम लिहिली आणि कादंबरीवर आधारित नाट्यलेखनही केले. तर तिसऱ्या प्रकारचा करार होता, तो भावविण्याचा. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृत्तीतून त्यांनी या तीन गोष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.

स्वामीकार रणजित देसाई ही ओळख

रणजित रामचंद्र देसाई यांचा जन्म  ८ एप्रिल १९२८ रोजी झाला. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते ते यामुळेच. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्यासाठी त्यांनी भारतातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यांनी मोजक्याच ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या असल्या तरी त्यांनी त्या कादंबऱ्यांचा एक वेगळा पायंडा पाडला. त्यांच्या या साहित्यसेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित ‘नाच गं घुमा’ हे आत्मचरित्रही खूप गाजले. रणजित देसाई यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमी, राज्य शासनाच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

रणजित देसाई यांची साहित्य संपदाः

कादंबरीः

अभोगी,पावनखिंड,प्रतीक्षा,बारी,माझा गांव,राजा रविवर्मा,राधेय,शेकरा, श्रीमान योगी, लक्ष्यवेध,समिधा, स्वामी,

कथासंग्रह

आषाढ,आलेख,कमोदिनी,कातळ,कालवा,गंधाली,कणव,जाण,प्रपात,बाबुल मोरा,मधुमती,मेखमोगरी,मेघ,मोरपंखी सावल्या, रूपमहाल, वैशाख,संकेत

नाटक

कांचनमृग,गरुडझेप,तुझी वाट वेगळी ,धन अपुरे, पंख जाहले वैरी, पांगुळगाडा ,रामशास्त्री, लोकनायक,वारसा,सावली उन्हाची,संगीतसम्राट तानसेन,स्वामी, हे बंध रेशमाचे

ललित लेखन

संचित, स्नेहधारा

संबंधित बातम्या 

वसंत मोरे यांची ‘फिलिंग’ इमोशनल;शहराध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे यांची फेसबूक पोस्ट; राजकीय वातावरणात रंग भरणार

Yashwant Jadhav | यशवंत जाधवांना मोठा झटका, 40 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सूत्रांची माहिती

देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा ! सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.