Russia-Ukraine war: रशिया – युक्रेन युद्धाचे 100 दिवस…
रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.
1 / 10
युक्रेनच्या सैन्याने राजधानी कीवच्या आसपासच्या रशियन सैन्याला हुसकावून लावले आहे आणि रशियन सैन्याने ताब्यात घेतलेले अनेक भाग पुन्हा ताब्यात घेतले आहेत
2 / 10
युक्रेनवर रशियाचे आक्रमण 100 दिवसांहून अधिक काळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांत, रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात हल्ले तीव्र केले आहेत आणि डोनबास आणि लुहान्स्क प्रदेशांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
3 / 10
या युद्धामुळे युक्रेनचे लोक विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले असून त्यांना भीती पोटी अनेक नागरिकांनी देश सोडला आहे. युद्धाची युक्रेनमधून आलेली छायाचित्रे खूपच अस्वस्थ करणारी आहेत.
4 / 10
युद्धामुळे शहराच्या शहर उध्वस्त झाली आहेत. अनेक लोक शहर सोडून स्थलांतरित झाले आहेत अनेक स्थानकांवरही गाड्यांच्या, लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या दिसून येतात.
5 / 10
अनेक ठिकाणी रशियन सैन्य पूर्ण ताकदीनिशी युक्रेनमधील परिसर ताब्यात घेत आहे. रशियन सैन्याने अनेक शहरांच्या 70 टक्क्यांहून अधिक भागावर कब्जा केला आहे
6 / 10
युद्धात मारले जाण्याच्या भीती पोटी नागरिक बंकरमध्ये वास्तव्यास गेले आहेत. शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक शहरे ओसाड पडलेली पाहायला मिळत आहेत
7 / 10
गोळीबार , रणगाड्यांच्या हल्ल्याने घरांची शहरांची झालेली अवस्था युद्धाची भीषणता दर्शवताना दिसत आहे.
8 / 10
युद्धामुळे शहराची झालेले छिन्न विच्छिन्न अवस्था ,गमावलेला आप्तेय हे सगळं बघून युक्रेन नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत.
9 / 10
रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.
10 / 10
युक्रेनमधील अनेक युद्ग्रग्रस्त भागात पुन्हा नागरिक येऊन आपल्या विखुरलेल्या संसाराहकडं खिन्नपणे पाहता, अश्रू ढाळताना दिसत आहेत.