बीड : ऊसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना फडातील ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक घटना या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्या तरी गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटनेचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.लुखमसला शिवारातील गणेश देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा तब्बल 12 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये लाखोंचे नुकासान झाले असून इतर शेती साहित्याची देखील राखरांगोळी झाली आहे. बीड जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून अंतिम टप्प्यात असलेला ऊस कारखान्याच्या ऐवजी बांधावरच फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.