Marathi News Photo gallery 15th President Draupadi took oath as Murmu; First tribal woman to hold highest constitutional post
President Draupadi Murmu : 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ; सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला
द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
1 / 10
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. येथे निवर्तमान राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
2 / 10
निवर्तमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि निर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनाकडे कूच करत आहेत. द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
3 / 10
एकेकाळी शिक्षक असलेले द्रौपदी मुर्मू हे परिसरातील आमदाराच्या सांगण्यावरून राजकारणात आले. 25 वर्षांपूर्वी 1997 मध्ये पहिली निवडणूक लढवली. ही निवडणूक नगरसेवक पदासाठी होती. मुर्मू यांनी निवडणूक लढवली, जिंकली आणि येथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
4 / 10
द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
5 / 10
उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अनेक देशांचे राजदूत आणि तिन्ही सेवांचे प्रमुख या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.
6 / 10
द्रौपदी मुर्मू यांचा हा प्रवास तितकासा सोपाही नाही.त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे. या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागला. यासगळयात एवढा त्रास सहन करावा लागला कि अनेकदा माघार घ्यावी असेही त्यांना वाटले.
7 / 10
मात्र द्रौपदी मुर्मू यांनी केवळ संघर्ष सुरूच ठेवला नाही, तर देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. आज मुर्मू केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी एक उदाहरण बनल्या आहेत.
8 / 10
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात झाला. द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. द्रौपदीला दोन भाऊ आहेत.
9 / 10
द्रौपदीचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली होत्या. 1984 मध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. द्रौपदीचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले. पण आपल्या कष्टाच्या आड त्यांनी परिस्थिती येऊ दिली नाही.
10 / 10
द्रौपदी मुर्मू भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. द्रौपदी मुर्मू या मुलीला शिकवण्यासाठी शिक्षिका बनल्या .