इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेने इंग्लंडच्या या भारत दौऱ्याची सांगता होणार आहे. या वनडे मालिकेत टीम इंडियाच्या रोहित शर्मा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या 3 खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा. टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. यानंतर तो टी 20 मालिकेतही खेळणार आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगली खेळी करण्याचा दबाव आहे. त्यामुळे टी 20 सीरिजनंतर रोहितला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
रिषभ पंत. भारताचा विकेटकीपर आणि मॅच विनर फलंदाज. पंत तिनही फॉर्मेटमध्ये खेळतो. पंतही टेस्टनंतर टी 20 मध्ये खेळणार आहे. पंत गेल्या महिन्यांपासून सलग खेळतोय. यामुळे टीम मॅनेजमेंट रिषभला विश्रांती देऊ शकते.
वॉशिंग्टन सुंदर. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू. सुंदरलाही एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुंदरची टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील 5 सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.